मी संगणकावर १९८४ मधे ही काम केले होते. तेव्हा मी खाजगी कंपनीत कामाला होतो. कंपनी ने प्रशिक्षण देण्यासाठी खास व्यवस्था केली होती. म्हणून मी स्वतःला भाग्यवंत मानत होतो. पण मला सरकारी नोकरी हवी होती.
सरकारी नोकरी १९८५ मधे मिळाल्यावर १९९१-९२ मधे पुन्हा संगणक हाताळायला मिळाला. तेव्हा सर्च इंजिन होते का? काही आठवत नाही. मुळात तेव्हा विंडो बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती. आक्टोबर १९९८ मधे मी जापानला गेलो होतो. एक महिना राहिलो तेथे. दररोज रात्री तेथे संगणक चालवायचो. अर्थात स्वखर्चाने. भारतातील बातम्या वाचायचो. मुंबईतील मिडडे, टाईम्स हे पेपर वाचत होतो.
हे सर्व सर्च इंजिन वरून शोधता येते.
पण आठवत नाही तेव्हा कोणते सर्च इंजिन होते. मला वाटते याहू असावे. (हो याहूच होते. लिहिता लिहिता सर्च केले तर कळले याहू १९९४ ची कंपनी आहे.)
नंतर आले ते गुगल.
सुमारे २२ वर्षांपूर्वी सेप्टेंबर १९९८ मध्ये अमेरिकेत स्थापित झालेली गुगल ही कंपनी. माझ्या माहिती प्रमाणे मुळ काम “गुगल सर्च इंजिन”.
असो. पण आज गुगल खूप मोठी झाली आहे. माझ्या माहिती प्रमाणे तेव्हा फक्त सर्च इंजिन पुरवणारी कंपनी विविध प्रकारचे प्रोडक्ट पुरवित आहे. जसे गुगल मैप, गुगल ट्रांसलेटर, इ.
त्यातील एक छान से प्रोडक्ट नुकतेच हाती आले आहे. नाव आहे “गुगल लेंस”.
आपल्या पैकी कदाचित काही मंडळींना याबद्दल माहिती असेल ही. किंबहुना काही तर वापर ही करित असावे. तरीही मला जे समजले ते मी थोडक्यात येथे सादर करित आहे.
प्ले स्टोर वरून गुगल लेंस चे एप (app) डाऊनलोड करून घ्यायचे. बस्स.
आपल्या मोबाईल मधील लेंस एपवर क्लिक करावे. कैमेरा उघडतो. खाली विविध ऑप्शन्स दिसतात. Translate, text, search, homework, shopping, places आणि dining.
आपल्याला मासिकातील जाहिरातीतील एखादी वस्तू आवडली असेल. तिच्यावर केमेरा घेऊन जा. नंतर तुम्हाला शॉपिंग वर जावे लागेल. आता एप स्वतः काम करेल. फोटोतील वस्तू बघून संबंधित सर्व लिंक उघडतील. ही वस्तू कोठे मिळेल हे तो लगेच सांगेल. अर्थात संबंधित लिंक जसे अमेझॉन, इ. उघडतील.
समजा समोर एखादे झाड आहे. त्याचा किंवा पानाचा फोटो काढायचा. फोटो काढला कि ती एप स्वतः सर्चिंग सुरू करते. क्षणार्धात तुम्हाला त्या फोटोतील माहितीशी तत्सम सर्व माहिती गुगल उपलब्ध करून देते.
तुम्ही कोणाच्या घरी गेला. त्यांच्या कडील एखादी वस्तू आवडली. लगेच फोटो काढा. लेंसवर सर्च करा.
इतकेच काय विविध भाषेतील शब्दाचा फोटो काढा. लगेच ट्रांसलेट करून मिळते. अहो समोरची भाषा कोणती आहे हे ही तो ओळखतो आणि इंग्रजी मधे भाषांतर करून समोर ठेवतो. याचा फायदा असा होऊ शकतो कि आपल्याला हे पुस्तक कोणत्या भाषेत आहे हे माहिती नसेल तरीही हरकत नाही. गुगल लेंस स्वतः ती भाषा ओळखते आणि तुम्हाला भाषांतर करून देते.
पूर्वी ऑनलाइन भाषांतर इतके चांगले होत नसे. आता मात्र खूप छान होते.
अस्तित्वात असलेल्या कोणत्याही वस्तू चा फोटो काढून त्याची माहिती इंटरनेट वर शोधता येते.
एक गंमत आहे. जे त्याला समजले नाही तेथे ‘समथिंग वेंट राँग’ असा संदेश देऊन ते मोकळे होते. अजिबात अंगाला लावून घेत नाही. असा भास होतो कि ते आपल्याला म्हणत आहे “तुझं तू बघ बाबा. मला हे समजत नाही.’😊😊
असो, पण ही एप खूप छान आहे. मला तरी आवडली. एकदा नक्की वापरून बघा. नाही आवडले तर ‘मेरी मर्जी’ म्हणत सोडून द्या. ☺️😊☺️😊☺️😊
(02621842)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभ सकाळ👍👍
आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवा. आनंदाने जगा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
http://www.koshtirn.wordpress.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐