माझे जपानला प्रयाण
सन 1998 मधे कार्यालयीन कामाने जापानला जायचा प्रसंग आला तेव्हा विमानातून प्रवास करावा लागेल या कल्पनेनेच मी घाबरलो होतो.
आकाशात उडते विमान आकाशात उडते विमान आकाशात उडते विमान आकाशात उडते विमान
पण सांगायचे कोणाला. सांगायला लाज वाटायची.लोकं काय म्हणतील आपल्याला. घरी सुद्धा सांगायची लाज वाटायचीच. बायको काय म्हणेल. परंतु, वागणे बोलणे यावरून तिने ताडलेच.
पत्त्नी उवाच: ” अहो, काय झाले. तुम्ही एवढी चिंता कसली करताय, भीती वाटतेय का?”
मी : ” ”
पत्नी:” अहो, बोलां काही तरी”
मी तरी हि ढिम्मच.
आता तिचा पारा चढला, ” अहो,असे मुंग गिळून काय बसलात.”
आणि मग मला बोलणे भाग पडले.
एवढासा चेहरा करून मी तिची नजर चुकवत बोललो,” अग, मला कि नई………..” मला लाज वाटत असल्याने मी पुनः शांत झालो.
आणि तिने आता संतापानेच बघितले आणि मग मात्र मला बोलावेच लागले, “अग, मला विमानाची भीती वाटतेय. मी विमानात असतांना काही झालं तर. मी तुला सोडून ……..”
” अहो, तुम्ही इतका काय विचार करताय. काय होईल ते नंतर बघू.चांगला चान्स आलाय. जावून या की.”
तिने धीर दिल्याने मी तयार झालो. मनातील भिती मात्र जात नव्हती. जायची प्रबळ इच्छा असल्याने तयारीला लागलो होतो. पासपोर्ट आधीच मिळाला होता. विसा साठी अर्ज केला होता. शेवटी विसा मिळाला. तयारी पूर्ण झाली. आणि तो दिवस उजाडला. आम्ही तेव्हा नाशिक मधे राहात होतो.
चार आठवडे म्हणजे जवळजवळ एक महिना मुक्काम होता तेथे. त्यामुळे त्यानुसार कपडे घेतले. खरे म्हणजे प्रशिक्षण असल्याने आमच्या आधी जी मंडळी जाऊन आली होती त्यांनी सांगितले होते की तेथे खायचे हाल होतात. म्हणून शेव चिवडा, लाडू असे काही पदार्थ सोबत घेतले. यामुळे तीन डाक तयार झाल्या. त्या घेऊन मी मुंबई ला गेलो. दादर वरून आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले. आम्ही तीघे जाणार होतो. विमानतळावर एकत्र भेटलो. तो दिवस नव्हे रात्र होती दिवाळीची लक्ष्मी पूजनाची. बरोबर लक्षीपूजनाच्या रात्री 18 आक्टोबर 1998 मला वाटते 11.30 ची फ्लाईट होती.
सेक्युरिटी चेक होऊन विमानात गेलो. क्वांटास एअरलाईंसचे विमान होते. लहान होते. मला भिती वाटत होती. नशिबाने तीन रो मधील मधली तीन सिटवाली रो मिळाली होती. त्यातील मधली सिट मी निवडली माझ्या साठी.
विमान सुरु झाले व टेक ऑफ झाला तेव्हा कानाची काय अवस्था झाली असेल मी शब्दांत सांगू शकत नाही. असे वाटत होते जसे शरीरातील सर्व काही कानातून बाहेर फेकले जाणार आहे.
ईयर फोन कानात घातले. कसे तरी स्वतः ला धीर देत विमानाने मला ओझरते आठवते १५००० फुट उंची गाठली व विमान स्थिर झाले. तेव्हा बरे वाटायला लागले.
मग सुरू झाला रतीब. क्वांटास येअर लाईंन्सचे सिंगापूरला जाणारे विमान होते. पण दिवाळी होती म्हणून त्यांनी आम्हाला खीर- पुरी व भाजी आणि भजी ही खायला दिली. आम्ही तिघे जाम खुश झालो. जेवण झाल्यावर मी इकडे तिकडे बघीतले तर काय? जसे ट्रेनमध्ये जनरल मधील प्रवासी रिकाम्या जागा पकडून झोपतात. तसेच येथे ही ज्या रिकाम्या सीट होत्या त्या लोकांनी पकडल्या व हँडल खाली करून लगेच रग पाघरून आडवे झाले. रग पुरवले जातात विमानात. आम्ही तसेच बसून होतो. आमच्या पैकी एक जण वयस्कर होते व त्यांचा मुलगा अमेरिकेत नौकरी स असल्याने त्यांना विमान प्रवास माहित होता. ते बिंधास्त होते.
मी मात्र टि.व्हि.वर हिंदी सिनेमा सुरू होता त्यात स्वतःला गुंतवून घेतले.
मधूनच विमान खड्डेयुक्त रस्त्यावर गाडी कशी चालते तसे चालायचे सॉरी उडायचे. तेव्हा समजले कि एअर व्हेक्युम चा स्पॉट आला कि असे धक्के लागतात. त्यामुळे मात्र ह्रदयात धस्स होत होते.
विमान पूर्ण उंचीवर गेले दक्षिणेवरून प्रवास सुरु होता. लाऊडस्पीकर वर शहराचे नाव ही सांगितले पण आता आठवत नाही,मोठे शहर होते. खिडकीतून डोकावून पाहिले तर शेकोटी मधून विस्तवाचा खडा चिमट्याने उचलून अंधारात ठेवला तर कसा दिसेल तसे दिसले उंचीवरून. आठ तासाचा सतत प्रवास केला व सकाळी विमान सिंगापूरला पोहोचले. पहिल्यांदा विदेशात विमानाने प्रवास करून आलो होतो. स्वतः वर विश्वास बसत नव्हता.
सिंगापूरला उतरून विमान बदलून जपान ला जायचे होते. तेथे कोठे जायचे आहे तपास केला. लांबच्या टर्मिनल वर जायचे होते. तेथे चालत जाण्याची गरज नव्हती. जसे विमानातील सामान आपल्यापर्यंत पट्ट्याद्वारे येतो. तसेच चालत जाण्याऐवजी एक बेल्ट सरकत होते. आपण सामानासह त्यावर उभे राहायचे. तेच आपल्याला घेऊन जाते.