माझ्या कविता


(खालील कविता मी स्वतः लिहिलेल्या आहेत. याची कृपया नोंद घ्यावी)

“मनात माझ्या”

मनात माझ्या असते काही
करते काही, घडते काही
मनात……..
जीवनातील क्षण सुखाचे
क्षण दुखाचे
वेचत असते मन माझे
वेचत वेचत कणा कणांना
बनवीत असते माळ त्याची
असे मन माझे वेडे वाकडे
करते काही घडते काही
मनात ……..

वेचत वेचत त्या क्षणांच्या

मागे धावते मन माझे
पुढे क्षण मागे मन
पुढे क्षण मागे मन
काही वेळाने
मनाच्या मागे धावतात क्षण
मनात माझ्या………

माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण
मोजकेच
पण सुखदायी ते आनंदाचे क्षण
सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेत
हार्ड डिस्क रुपी मेंदूत
ते मोजकेच आनंदाचे क्षण

स्वप्नातील तू……

डोळे दिपतात माझे सूर्याकडे पाहून
तसेच
डोळे दिपतात माझे तुझ्या रुपाकडे पाहून
काय आहे तुझ्या त्या रुपात
कळलेलेच नाही मला या जीवनात.

रोज रोज पाहून ते तुझे अप्रतिम रूप
डोळे थकून गेले आहेत खूप
आता वाटते या तुझ्या रुपाला
सामावून घ्यावे कायमचे
या डोळ्यात लपवून घ्यावे,
इतरांच्या नजरेतून वाचवावे ,
पण
छे जे शक्य नाही ती स्वप्न मी नेहमी बघत असतो
ज्या वाटेवर काटे आहेत त्याच वाटेवर चालत असतो

ठेच लागली कि खाली पडतो ,
तेव्हा आधाराला कोणीच नसतो ,

थकल्यावर स्वतःच उठतो ,
पुन्हा तुझीच स्वप्नं बघतो .

तो पावसाळा

आज आठवतात ते शाळेतील दिवस
पडत होता जेव्हा चोहीकडे धो धो पाऊस

धारा पावसाच्या आसायच्या जाड जाड
छत्री डोक्यावरची म्हणायची फाड फाड

पाऊस

पाऊसपाऊसपाऊस

पाऊसपाऊस

झडी पावसाची असायची पंधरा पंधरा दिवस
वातावरणात पसरलेली असायची उमस

गावच्या नदीला पूर यायचा
पलीकडे शाळा होती म्हणून मी
नदी ओलांडून शाळेत जायचा

आता ती फक्त स्वनच राहिली आहेत
पावसाची फक्त वाटच पहायची आहे.

तो ही आता मानवा सारखा लहरी झाला आहे
रोज रोज काळे ढग आणून हुलकावणी द्यायला लागला आहे.

अश्या या पावसाचा आता काही नेम नाही
त्याचे आपल्यावर आता प्रेम उरले नाही

म्हणून मित्रानो विनंती करितो त्याने जरी केले नाही

तरी आपण त्यावर प्रेम करावे
दररोज मन भरून पाणी वाचवावे .
पाणी वाचवावे.
पाणी वाचवावे.

स्वप्न

मी गीत गात होते
प्रेमाचे
मी गीत गात होते.
गीत गात गात मी
लाजत मुरडत होते
मी गीत गात होते,

im

मी गीत गात होते
स्नेहाचे
मी गीत गात होते,
गीत गात गात मी लाजत
मुरडत होते
मी गीत गात होते,

नाव तुझे ओठावर येता
मन मनात लाजत होते
मी गीत गात होते,

मी गीत गात होते
मी तुलाही निरखत होते
लाजून मुरडून मी गीत गात होते.

स्वप्न

स्वप्नस्वप्न

स्वप्न

नजरेचे नजरेशी मिलन झाले
मी होरपळून गेले लाजुनी
स्पर्श मला झाला तुझ्या
तुझ्याच नजरेतुनी
मी गीत गात होते लाजुन
मुरडून मी गीत गात होते

हातात तुझा हात घेऊनी
मी सागरी जात होते
गीत गात गात
मी लाजत होते
मी गीत गात होते,

स्वप्नातुनी जागे झाले
मी लाजुनी चहुदिशि पाहिले
मला तुझीच जाणीव झाली

मी लाजले आणि
मी गीत गायिले
गुणगुणले मी
गीत स्वप्नातले.

जवळ-पाश

अचानक

माझ्या कानावर
पडला तिचा आवाज
आणि
मी
खडबडून जागा झालो
इकडे तिकडे पाहू लागलो
शोधून काढला
पिंजून काढला
मी
नजरेनेच तो जवळ पाश
तिला भेटायचे नव्हतेच
भेटली नाहीच ती
शेवटी ठरला
माझ्यासाठी तो जवळ पास
एक “जवळ पाश”
एक “जवळ पाश’

कारण नसतांना

का येतेस तु

माझ्या मनात

आणि

डोकावुन बघतेस

मनातील कोपर.

सापडते का तुला?

कोठे तरी तुझे

उरले सुरले अस्तित्व

माझ्या मनातील

अडगळीच्या एखाद्या कोपरयात

नसेल सपडत

तर

कारण नसतांना

पुनः येऊ नकोस

माझ्या

मनात!

कारण नसतांना!!!!

तुझे अस्तित्व

जेव्हा पासुन

तु रुसला आहेस माझ्यावर,

माझ्या साठी

तुझे अस्तित्व

फक्त फ़ेस बुक, गुगल

आणि आर्कुट

पर्यंतच मर्यादित राहिले आहे

पण तु इतका रागावला आहेस

कि

माझी त्यावरील फ़्रेंडशिप ची रेक्वेस्ट

अक्शेप्ट सुध्दा करित नाहिस.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

तिच्या वेदना

आसवांना सुध्दा अश्रू अनावर झाले,

जेव्हा त्यांनी तिचे दुख ऐकले,

तिच्या जन्माच्या वेळच्या वेदना

तिच्या आईला,

ज्या सोसवेना

पण त्याहुनी जास्त दुख आईला झाले,

जेव्हा आपल्यांनीच तिच्या पिल्लाला जिवंतपणी गाडले.

(३०/१०/२०१२)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

का तुझी मी वाट पहावी?

का डोळ्यात तेल घालुनी
रात्रंदिवस तुझी मी वाट पहावी?

का तुझ्या आठवणींनी व्याकुळ होऊन
रात्रंदिवस तुझी मी वाट पहावी?

आणि

आली परत तरी सर्व विसरुनी
का तुजला मी भेट द्यावी?
का का का??????????💐💐💐

(१५/०५/२०१२)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कारण नसतांना

कारण नसतांना

का येतेस तु

माझ्या मनात

आणि

डोकावुन बघतेस

मनातील कोपरा.

सापडते का तुला?

कोठे तरी तुझे

उरले सुरले अस्तित्व

माझ्या मनातील

अडगळीच्या एखाद्या कोपरयात

नसेल सपडत

तर

कारण नसतांना

पुनः येऊ नकोस

माझ्या

मनात!

कारण नसतांना!!!!

कोमेजलेले फुल

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

थांब सखे

थांब सखे शोधून दे मला

हरवलेले हृदय माझे,

तू पाहिले आहेस का

ते घायाळ हृदय माझे?।।

मला वाटते हृदयात
तुझ्या कुठेतरी कोपर्‍यात

लपवून ठेवले असावेस तू।।

थांब सखे दिसले मजला

पारदर्शी हृदय तुझ्या

लपवून ठेवलेले ते

जख्मी हृदय माझे।।

तुझ्याच नाजूक हातांनी

काढून देशिल का सखे

मला तू तूझ्या

हृदयातून तूच लपवून

ठेवलेले हृदय माझे।।

(२३/११/२०१९)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बेईमान मन माझे..

बेईमान मन माझे तुला पाहून लाजले,

तुझ्या सान्निध्यात बसून काही क्षण

व्यतित करावया स्वप्न पाहू लागले।।

बेकार सर्व प्रयत्न ते माझे ठरू लागले,

तू जेव्हा पाहून मजला न पाहिले।।

बेशक मन माझे तुझ्यात रमू लागले,

पण सांगू कसे मी तुझ्या त्या मना

बेईमान जे मला कधीच वाटू लागले।।

(5/12/2019)

37 thoughts on “माझ्या कविता

 1. छान, उत्कृष्ट व दर्जेदार कविता आहेत.नवकविनी नोंद घ्यावी.स्वप्न ही कविता तर खूपच छान जमली आहे.

  Like

 2. पिंगबॅक 2010 in review « माझ्या मना …

 3. Hello Sir,
  I would have liked to write this response in Marathi. Anyhow, I liked your blog and the variety of content that you have published on it. I am working in Pune an IT company and I am myself a poet. But I liked only one poem i.e. “To Pavsala”. According to me You write good, but there is definitely an area for improvement as far as poetry is concerned. Please don’t mind, this is just a suggestion from a friend to a friend. Thanks.

  Like

  • आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी आता पुण्याला बदलीवर आलो आसल्याने प्रत्यक्ष भेटून आपणासी चर्चा करून सुधारणा करणे योग्य होईल. तरी लवकरच भेटू.

   Like

   • mi aaplya peksha vayane khup lahan ahe…mi kay sudharna sangnar….pan evdha nakki sangto ki kami shabdat, manatil antarang rangavta yeil ashi kavita havi….tichyat ticha artha aani prayojan agdi spashta pane zalakle tar ati uttam…..

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s