वीज बचतीवर बोलू काही


images

आज सायंकाळी आम्ही कॉलोनीतील सर्व मित्र मंडळी एकत्र जमलो होतो. एका कट्ट्यावर बसून गप्पा चालल्या होत्या. सर्व दूर अंधाराचे साम्राज्य होते. विजेचे भारनियमन सुरु होते. अचानक रमेश व सुरेश मध्ये संवाद सुरु झाला.

रमेश: “अरे यार या भार नियमानाचा आता वीट आला आहे.”
सुरेश: “हो रे मित्रा. पण आपण काय करू शकतो, आपल्या हातात काय आहे?”
विकास: “मित्रांनो, तुमचं बोलून झालं असेल तर मी दोन शब्द बोलू का?”

K8R1OCA5BPRKPCAYN8JHDCAZ6R24SCABYVSNECAAEEET2CALGUTSHCAXD2MFDCA98NUG4CAFJF2DFCAJTDNI6CAEDOHAOCAVC0V22CAF9L07MCAD4MZYHCAHC1FE6CACDG9D7CA2EI13SCA5L3XS9

रमेश व सुरेश एकदम म्हणाले: “यार विकास तू आपले भाषण देणार नसशील तर आमची काहीच हरकत नाही. पण, आम्हाला भीती वाटते त्या तुझ्या तत्वांच्या गोष्टींची. तू आपल्या तत्वांच्या दोन गोष्ठी सांगशील आणि आमची आजची झोप उडून जाईल. नको रे बाबा, तू न बोललेला बरा.”

विकास: “अरे, पण माझ थोड ऐकून घ्यायला काय हरकत आहे. तुम्हाला पटल नाही तर सोडून द्या.”
रमेश ने सुरेशकड़े बघितल व हसत हसत म्हणाला:

” काय रे, तुला काय वाटत. बोलू द्याव याला.”

Z9XIVCAFNC726CAYGP0GRCALSH1HVCAMV09VSCAIK5DE2CASYMJDCCA6413T6CAU0CFV7CAUE60GUCAVSHEKKCANV7XFNCARCIJ9HCAHZWWPTCA7L7888CA1YANQ0CAPC2BQZCAFKZTMYCAWT7IGD

सुरेश: ” ठीक आहे. ऐकून घेऊ याची बडबड.”

विकास चे प्रवचन सुरु झाले. रमेश व सुरेश दोघ विकास समोर एखाद्या प्रवचनकारा समोर जनता बसते तसे जमिनीवर मांडी घालून बसले व सुहास्य वदनाने त्यांचे प्रवचन ऐकू लागले.

“अरे मित्रांनो, हे बघा हल्ली पाऊसाचा काही नेम नाही. पावस लहरी झाला आहे. या वर्षी बघा अद्याप पाऊसच आलेला नाही. वीज तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर वीज कशी तयार होणार.”
सुरेश: ” चल तुझ आपल काही तरीच, विजेचा आणि पाण्याचा काय संबंध.”
विकास : “अरे वेडे आहात का तुम्ही.अरे, पाण्याशिवाय वीज कशी तयार होणार.”
रमेश :” बर बर, ते असू दे. आता आम्ही आनंदी आहोत असे समजून आम्हाला सांगशील का?”

विकास : ” ठीक आहे.तर मग ऐका. वीज ही जल विद्युत प्रकल्प असतात ना त्यात तयार होत असते. पाण्याच्या सहाय्याने मशीन फिरवितात त्यामुळे वीज तयार होते. आणि ती आपल्या पर्यंत पोहोचवतात. आता विचार करा, पाणी नसेल तर वीज कशी तयार करता येईल.”

hydro

सुरेश: “हो रे , अरे पण कोळश्यापासून जी वीज तयार होते, त्याला कोठे पाण्याची गरज असते.”
विकास : “वेडे आहात रे बाबा तुम्ही. अरे, कोळश्याने कशी काय वीज तयार होणार, त्या विजेच्या कारखान्यात कोळसा जाळून पाण्याची वाफ तयार केली जाते व त्या वाफेच्या सहाय्याने मशीन फिरवून वीज निर्मिती केली जाते. त्या साठी सुद्धा पाणी हे लागतेच की.”

सुरेश: “बर झाल रे बाबा तू आम्हाला बरच ज्ञान दिल. पण एक सांग की, जेव्हा आपल्याकडे खूप पाऊस येतो पुरात पाणी वाहून जात, तेव्हा आम्ही जास्त वीज बनवून साठवून का ठेवत नाही.”
विकास : ” अरे, जगात अशी मशीनच नाही ज्यात वीज साठवता येते.”

दिनांक ः11/07/2019

मित्रांनो, आजच्या या एल ई डी व सी एफ एल च्या युगात सुद्धा आपण पाहत असतो काही लोकं जुन्या पद्धती चे नाईट लँप वापरतात. हे लँप 15 वॉटचे असतात पण त्यांना झिरो चे संबोधले जाते.

हे बल्ब साधारणपणे रात्री 8 तास सुरु असतात. म्हणजे रोज 15×8/1000= 0.120 युनिट इतका दररोज वीज वापर होतो. म्हणजे साधारण 8.4 दिवसांत एक युनिट आणि एका वर्षात 43.8 युनिट वीज वापरली जाते.

या उलट एलईडी बल्ब अर्धा वॉटचा सुद्धा मिळतो. तो नाईट लेंप म्हणून वापरला तर किती वीज लागेल?

0.5×8 /1000=0.004 unit दररोज आणि एका वर्षांत 0.004×365 =1.46 units इतकी वीज वापरली जाईल.

9 thoughts on “वीज बचतीवर बोलू काही

  1. सोसायट्यानी पवनचक्क्या बसविण्याचा विचार करावा. आवश्यक माहिती इंटरनेटवर आहेच.

    Like

    • अहो काय करणार लिहायला भरपूर आहे वेळ कमी पडतो आणि आता पर्यंत कोणीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे लिहिले नाही. आज तुम्ही जशी असेल तशी प्रतिक्रिया दिली आता तो पेज पुढे सुरुठेवेल.

      Like

यावर आपले मत नोंदवा