परंपरा -१

प्रत्येक मानव हा उदरनिर्वाहासाठी नौकरी, व्यवसाय करीत असतो. त्यामुळे समाजातील लोकांना त्याला भेटता येत नाही. त्याची समाजातील लोकांशी गाठ-भेट होत राहावी कदाचित यासाठीच समाजाने वेगवेगळ्या परंपरा लावून दिल्या असाव्यात असे माझ्या मनाला वाटत असते. वाढ दिवस साजरा करणे,सण साजरा करणे या परंपरा त्याच साठी सुरु झाल्या असाव्यात असे मला माझे मन सांगत असते.
आनंद असो वा दुख, मानव एकटा कधीच साजरा करू शकत नाही. त्यासाठी त्याला इतरांची गरज भासतेच. अचानक आनंद झाल्यावर व एकटा असल्यावर तो स्वतः आनंदाने उड्या मारतो. पण, त्यावर त्याचे समाधान होत नसते. त्याला तो आनंद इतरांसोबत वाटायचा असतो. इतरांना कधी सांगू असे त्याला होते. लगेच तो घराबाहेर पडतो. मित्रांना भेटतो व मनातील सर्व भावना व्यक्त करतो. त्यानंतर त्याला हायसे होते. आणि त्याच्या मनाचे समाधान होते. असा हा मानव प्राणी.दुख  झाल्यावर सुद्धा त्याला दुसऱ्याच्या खांद्याची गरज असतेच. आपल्या मनातील भावना तो इतरांच्या खांद्यावर आपले डोके ठेवून व्यक्त करतो तेव्हाच  त्याच्या मनाचे समाधान होते. दुखात असलेल्या व्यक्तीला जवळचा मित्र भेटल्यावर बघा तो लगेच हुंदके देवून रडायला लागतो. त्याच्या गळा लागून, त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडून घेतो. मन समाधानी झाल्याशिवाय तो शांतच होत नाही. मित्र सुद्धा त्याचे समाधान होई पर्यंत त्याला रडू देत असतो.

आपल्यावर असा प्रसंग कधी तरी आला असेल. एखाद्या दुखी मित्राला/ नातेवाईकाला भेटल्यावर त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवता बरोबर तो रडायला लागतो. लांब कशाला जाता. आपले बालपण आठवा कि, लहान असतांना वडिलांनी मारल्यावर आपण घराच्या एका कोपऱ्यात रुसून बसतो. आई जाणून बुजून आपल्या जवळ येत नाही किंवा वडील तिला आपल्या जवळ येवू देत नाही. पण जो पर्यंत आई जवळ येत नाही तो पर्यंत आपण रडत नाही. एकदाचे वडील घराबाहेर पडले,  व आई जवळ आली,  कुशीत घेऊन मायेने पाठीवर हात फिरविला कि आपण जोरजोरात रडायला लागतो. म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी या परंपरा सुरु केल्या असाव्यात असे वारंवार माझे मन मला सांगत असते.

“स्वप्नांची दुनिया”

“मी पाहिलेली स्वप्नं”

माझे जीवन म्हणजे स्वप्न आहे. मी कायम स्वप्नात जगात असतो. सतत मनात काही न काही विचार सुरु असतात. हा आजार मला लहानपणा पासूनच आहे.

मला आठवते १९६९ मध्ये मानव प्रथम चंद्रावर गेला होता त्याची पेपरात बातमी वाचून मी आनंदाने विभोर झालो होतो. लगेच, त्या वयात सुद्धा माझ्या मनात पाल चुकचुकली होती कि मानव चंद्रावर गेल्यावर तेथे वस्ती होणार. हळूहळू तेथे सुद्धा जनसंख्या वाढणार. पृथ्वीवरील अफाट गर्दीसारखी ती वाढली कि पृथ्वी व चंद्रा वरील मानवाचे युद्ध होणार व तसे झाले तर किती मोठा अनर्थ होईल. चंद्र पृथ्वी पेक्षा लहान आहे. त्यावर अणुबॉम्ब सारखा स्फोट घडवला गेला तर !  तर चंद्र आपल्या जागेवरून हलणार. चंद्र व पृथ्वी आपसात गुरुत्वाकर्षण शक्तीने जोडलेले आहेत. जर चंद्र जागेवरून हलला तर पृथ्वी सुद्धा हलणार व मोठा प्रलय येईल. माणस मरतील, पृथ्वी संपेल.

चंद्राचे विलोभनीय रूप

चंद्राचे विलोभनीय रूप

असे माझे मन कोठे हि भरकटते, ते काय विचार करेल याचा काही नेमच नसतो, वेडे मन माझे.

तू सुखकर्ता ……….

//श्री गणेशाय नमः//

Ganesh 3_edited

          उद्या पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असल्याने जिकडे  तिकडे  लोकांची  झुंडच्या झुंड फिरतांना  दिसत  आहेत . दुकानांवर  गर्दी  आहे . सर्व   आपापल्या  पसंतीची  गणरायाची   मूर्ति  दुकानांवर  बघतांना  दिसत आहेत.   आपापल्या  ऐपतिप्रमाणे खिश्याला  परवडेल  त्या  प्रमाणे  मूर्ति निवडून  राखीव  करून घेत  आहेत. आम्ही  सुद्धा  आमच्या  इमारतीतील  मंडळासाठी  रात्रि उशिरा  जाऊन एक छानशी  मूर्ति पसंद  केली  आणि  पैसे  देऊन  राखीव करून घेतली. उद्या साधारण  दहा  वाजल्यापासून  रस्त्या  रस्त्यावर  गर्दीच  गर्दी दिसेल .  जो तो आपल्या  घरासाठी  किंवा  लहान  मोठ्या   मंडळासाठी राखीव केलेली  मूर्ति घ्यायला  जाईल  आणि वाजत  गाजत  सिद्धिविनायकाला   घरी  घेउन  येईल.

” गणेश उत्सव : प्रारंभ “

         आज गणेश चतुर्थी, विनायकाचे  आगमन  असल्याने  दिवस कसा  उत्साही  वाटत  आहे. मी  सुद्धा  उत्साही आहे .श्रावण संपला की भाद्रपद सुरु होतो. भाद्रपदाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते.    विविध प्रकारची सजावटी ची सामुग्री ची दुकानं सुद्धा दिसायला लागली आहेत दहा वाजता  रस्त्यावर जिकडे  तिकडे  लोकांची  झुंडच्या झुंड दिसली . गर्दीच गर्दी. मानसच  मानसं  चोहिकडे . मनात  आले  आपल्या देशाची  जनसंख्या खुपच  वाढली  आहे. असो, रस्त्यांवर कोणी एकदंताला आणायला, तर कोणी घेऊन जातांना दिसत आहे.. प्रत्येक  जण   आप आपल्या  ऐपतिप्रमाणे चालत / मोटर  साइकिल  वर / रिक्षामध्ये / हातगाडीवर  किंवा कारमध्ये   श्री गणेशांना नेताना  दिसत  आहे. . मनात आले, हा भेदभाव  का? मात्र  देवाकडे  भेदभाव नसतो. मूर्ति लहान असली  / मोठी असली, तरी तो  देवच,  सर्वांवर  सारखेच  प्रेम करणारा.    सर्वांवर प्रेमाचा  सारखाच  पाऊस पडणारा .

          हो, पाऊसाच नाव निघाल आणि मन पुनः भरकटलं.  या वर्षी अद्याप, आगस्ट संपायला आला तरी व्यवस्थितपणे पाऊस हा आलेलाच नाही. सर्व कशी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण तो यायला तयारच  नाही. त्याच्या  नाराजीचे कारण ते काय? हे समजतच नाही.  देवा गजानना तू तरी खुश हो.

कारची इच्छा

car
बऱ्याच दिवसांपासून मनात एक कार घ्यावी अशी इच्छा आहे. घरून पूर्ण विरोध. मन मानायला तयार नाही.  मन म्हणत गुपचूप घेऊन टाकावी. नंतर घरी सांगू. पण ते काही बरोबर नाही. परत परत इच्छा होते. आजच एका मित्राने टोचले, अरे घेऊन टाक कि एक छानशी कार. मी त्याला म्हणालो, कार घ्यायला काहीच हरकत नाही, पण आज जिकडे तिकडे गाड्याच गाड्या दिसतात. प्रदूषण केवढे वाढले आहे. ऑगस्ट महिना असून हि पाऊस  नाही, दुष्काळाची  स्थिती आहे, तरीही आपला  कार घेण्याचा मोह कमी होत नाही. माझी आहे त्या प्रदूषणात  भर द्यायची इच्छा नसल्याने मला गाडी घेणे काही योग्य वाटत नाही.