पोळा(108091)


charging_bull

बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आपला हि एक ब्लोग असावा. आज पोळ्याच्या सणाला  माझी ती  सुप्त इच्छा पूर्ण होत आहे. तीही माझ्या कन्येच्या मदतीनेच. आम्हा जुन्या लोकांचे हे असेच असते. जग कोठे चालले आहे आणि आम्ही त्याच जुन्या जगात आज हि वावरतो आहोत.   असो, पण आज आपला पोळा आहे. मला खात्री वाटते कि माझा ब्लोग सुद्धा बैला सारखाच धावेल. धावो एकदाचा.

पोळा म्हटल कि लहानपणच्या आठवणी  डोळ्यापुढे येतात. गावाकडचे ते दिवस. शेतकरी पोळ्याची तेयारी आधी पासूनच करून ठेवायचा. पोळ्याच्या दिवशी सकाळी, बैलांना अघोळ घालणे, सजवणे, रंगवणे हेच काम असायचे. बैल सुद्धा प्रेमाने त्याला साथ द्यायचे. घराघरात गोड पदार्थ तयार होणार. घरो घरी बैलांना घेऊन जाणार.प्रत्येक घरावर त्यांची पूजा होणार, नैव्येद्य दाखवलं जाणार. आमच्या घरी सुद्धा पूजा झाल्यावरच जेवण. जिकडे तिकडे आनंद पसरलेला दिसायचा. अनाच्या घरी आम्ही शेतकरी नसल्याने मातीची बैल जोडी बनवीत असू , त्याची सुद्धा पूजा केली जायची.  आज इंटरनेट च्या जगात पोळा हा शब्द इंटरनेट वरच वाचायला मिळतो. पार विदेशात बसून नेट वरून आज पोळा आहे हे समजते.

आपल्या या देशाची प्रतिमा पूर्वीपासून  कृषी प्रधान देश अशीच आहे. म्हणूनच पोळा घरा  घरात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी आपल्या देशात कारखाने व इतर उद्योग  नव्हतेच मुळी. फक्त शेती एके शेती. एकदाचा  पावसाळा सुरु झाला, पेरण्या झाल्या कि शेतकऱ्याचे  काय संपले. तसेच पेरण्या करताना बैल  रात्रंदिवस  कामात जुंपलेली ती सुद्धा थकलेली त्यांचा व स्वताचा थकवा दूर करण्यासाठी सन साजरा करणे जास्त चांगले. त्या लहानश्या गावात इतर मनोरंजन ते काय. तेव्हा आता सारखा टीवी  नव्हताच. त्यामुळे शेतकरी मनोरंजन कसा करू शकणार?  तशेच त्याचे दैवत हे बैलच.आपल्या देशाची ती परंपरा आहे आपण दगडाला सुद्धा देव मानले आहे. त्यातून नरसिम्ह निघाला आहे. हेच आपले मोठेपण हेच आपले संस्कार आहेच. आणि  म्हणून हा सन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली असावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s