दिशा भ्रम


दिशा भ्रम

एकदा मी जळगावच्या रेल्वे स्टेशन वर गाडीची वाट बघत उभा होतो. अचानक एक मनुष्य माझ्या जवळ येऊन थांबला. काही सेकंद इकडे तिकडे बघून मला त्याने विचारले ” अहो साहेब, हे भुसावळ कोणत्या दिशेला आहे.” मी विचारात पडलो. आधि त्या माणसाकडे बघितले. तो व्यवस्थित वाटला. त्याला कस तरी झाले. लगेच तो उत्तरला,” मला, दिशाभ्रम झाला आहे. मला मुंबईला जायचे आहे. परंतु गाडी कोणत्या दिशेने येईल, हे मला लक्ष्यात येत नाही आहे”. मी त्या माणसाला व्यवस्थित समजावून सांगितले. तो निघून हि गेला. पण मन शांत राहिले नाही. मनात विचारचक्र सुरु झाले.

रेलवे स्टेशन

रेलवे स्टेशन

एखाद्या नवीन शहरात गेल्यावर असे होत असते. मला सुद्धा व्हायचे. मी मुंबईला  नोकरीनिमित्त आलो. वेगवेगळ्या उपनगरात रेल्वे स्टेशनवर जेव्हा मी जायचो तेव्हा असे व्हायचे. गाडी कोणत्या दिशेने येणार व आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे हे समजताच न्हवते. मी  सुद्धा असेच इतरांना विचारात असे. पण  ते मुंबई, माझ्या नशिबाने जर चांगली व्यक्ती भेटली तर उत्तर व्यवस्थित मिळे, नाही तर काही खरे नाही. हळू हळू कळायला लागले. पण यातून एक लक्ष्यात आले कि मुंबईमध्ये गेल्यावर सहसा काही माहिती विचारायची  असल्यास मनुष्य बघुनच विचारावी .

या वरून मला आठवले मी मुंबईमध्ये लोकॅल ने प्रवास करायचो तेव्हाचा प्रसंग. ठाणे व कालवा स्टेशन गेल्यावर स्लो लोकॅल मुंब्रा स्टेशन वर यायची. सकाळच्या वेळी ठाणे येथे सूर्य पूर्वेकडे उगवलेला दिसायचा. मुंब्रा स्टेशनवर गाडी आल्यावर तोच सूर्य पश्चिमेला दिसायचा. पहिल्यांदा मी चक्रावून गेलो. दररोज बघितल्यावर सवय झाली. लोकॅल डोंगराळ वळसा घालून यायची त्यामुळे आपण पूर्वे कडच्या खिडकीत बसलेलो असल्यास मुंब्रा स्टेशन वर ती खिडकी पश्चिमेला यायची म्हणून असे होत असे. आपण ठिकाण बदलले कि दिशा बदलते. त्याने आपणाला भ्रम होतो.

दृष्टी भ्रम

एक वेगळा भ्रम सुद्धा असतो. तो म्हणजे दृष्टी भ्रम. हे खालील  चित्रावरून आपल्या लक्ष्यात येईल हि.

दृष्टी भ्रम

दृष्टी भ्रम

या चित्रात दोन रेषा काढलेल्या आहेत. आडव्या रेषेच्या मध्य बिंदूवर उभी रेषा काढली आहे. ओळख पाहू कोणती रेषा लांबीला मोठी आहे. उभी,नाही का.

प्रथम दर्शनी आपल्याला वाटते कि उभी रेषा हि आडव्या रेषेपेक्षा मोठी आहे असेच वाटते. परंतु मोजमाप घेतल्यावर समजते कि दोन्ही रेश्यांची लांबी सारखीच आहे. याला म्हणतात दृष्टी भ्रम.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s