वेड लागले……


होय, मला अक्षरशः वेड लागलंय, कशाचे ओळखता येईल का कोणाला. नाही ना. मला वेड लागलंय ब्लोग लिहिण्याचे. जेव्हा पासून मी लिहायला सुरुवात केली आहे सतत त्याचाच विचार मनात घोळत असतो. काय लिहावे, कसे लिहावे, पेज कोणता लिहावा, पोस्ट कोणता असावा.   अहो हे तर काहीच नाही , मला  क्षण क्षणाला  कविता सुचत आहेत. रात्र रात्र भर मी झोपत नाही. चुकून लागलीच व रात्री केव्हाही जाग आली तर नेटवर बसतो. मनातील विचार उंदीराच्या सहाय्याने संगणकाच्या फलकावर उतरवितो. पूर्वी हे नव्हत.  तेव्हा हि मी असाच करायचो.  पण फरक एवढाच  होता कि तेव्हा डायरी  मध्ये  लिहायचो आता ब्लोगवर लिहितो. डायरीतील कविता आपल्या पुरत्याच असायच्या आता मात्र ब्लोग वरील कविता जग वाचू शकते. पण अर्धांगिनी ची  चिडचिड वाढल्याचे जाणवायला लागलंय. तिने तसं बोलून हि दाखवलं. ती काय करणार बिचारी. दिवसभर घरी एकटी राहून कंटाळा येत असणार. संध्याकाळी मी घरी आल्यावर इंटरनेट वर बसलो तर बडबड कोणाशी करणार. लहान परिवाराचे असेच असते. म्हणून
 आपल्या कडे एकत्र कुटुंब पद्धत हि चांगली होती. पण शहरीकरण वाढल्या नंतर प्रत्येकाचे मन संकुचित व्हायला सुरुवात झाली व आपले हि परके वाटू लागले. त्यांची अडचण जाणवू लागली. जवळचे लांब गेली. मन दुरावली. वर्ष्यातून एकदा भेटहोणार, त्रोटक बोलणार, एक दोन दिवसात परत आपल्या घरी. जास्त जवळ गेल्यावर च्पाक्ण्याची भीती राहते. अशी प्रत्येकाची भावना झाली आहे. म्हणून घर दुरावली आहेत. मानस लांब गेली आहेत. कोणी कोणाचा नाही. हे दुष्परिणाम आहेत का नाही याचा उलगडा माझ्या मनाला अद्याप झालेला नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s