निवड-णूक (भाग-१)

माझ्या मते बऱ्याच वस्तू समोर ठेवलेल्या असतील तर त्यातून एकीची निवड करणे हि सर्वात कठीण गोष्ट आहे. तसे बघितले तर ज्या प्रकारे  वर्तणूक, वागणूक, गुंतवणूक हे शब्द आहेत त्याच प्रकारचा हा हि शब्द आहे. पण जितका सोपा हा शब्द तितकाच कठीण आहे.
आता हेच बघा कि जेव्हा जेव्हा बायको सोबत मी साड्या खरेदीला जातो तेव्हा दुकानदार १०-२० साड्या समोर काढून ठेवतो. त्यातील एकही साडी तिला पसंत पडत नाही. मी तिच्याकडेच लक्ष ठेऊन असतो. दुकानदार साडी काढून समोर ठेवतो तेव्हा तीचे लक्ष्य त्या साडी कडे नसते. ती समोरच्या कपाटातील साडीकडे बघत असते. मी एखादी साडी निवडून सांगितली कि “हि साडी बघ किती सुंदर आहे”. तर तिची प्रतिक्रिया निगेटीव असते. मी वैतागून जातो. दुकानदार बिचारा साड्या दाखवून वैतागलेला असतो. त्याने ३०-४० साड्या समोर काढून ठेवल्या असतात पण त्यातील एक हि साडी पसंत नसते. शेवटी ती उठून जाते. मला हि नाईलाजास्तव उठावेच लागते. काय करणार.
नंतर समोरच्या दुकानातील साड्या लांबून बऱ्या दिसतात. त्या दुकानात शिरतो. पण तो दुकानदार हुशार असतो. त्याने आम्हाला समोरच्या दुकानात बघितले असते म्हणून त्याला आम्हाला साड्या दाखवायच्या नसतात. पण ग्राहकाला एकदम हाकलून देता येत नाही म्हणून तो गेल्या गेल्या एक फार त्रासदायक प्रश्न विचारतो. ” क्या रेंज कि साडी दिखाऊ.” त्याच्या ह्या प्रश्नाने मी अर्धा घायाळ होऊन जातो. तिची पण तीच अवस्था होते. मी काहीही न बोलता दुकानातून बाहेर पडतो. नाईलाजाने तिला हि बाहेर पडावे लागते. बाहेर पडून ती प्रश्न विचारते “अहो, काय झाले. येथे साड्या चांगल्या आहेत.”  नेमके मला ज्या दुकानात थांबावेसे वाटत नाही त्याच दुकानातील साड्या हिला चांगल्या वाटतात. मी ऐकत नाही. मी लांबच्या दुकानात जातो. तेथे दुकानदार साड्या दाखवितो. त्याही तिला पसंत पडत नाहीत. तेथून हि बाहेर निघतो. अशी आणखी काही दुकानं आम्ही फिरतो. शेवटी कंटाळून परत घरी येतो. येतांना  बायको म्हणते. “अहो, त्या पहिल्या दुकानातच साड्या चांगल्या होत्या नाही का?”  डोक्याला हाथ लाऊन घेतो. पण गुपचूप.
असे २-३ सुटीच्या दिवशी फिरतो. तेव्हा कोठे एका दुकानातून साडीची निवड होते. पण तीही घरी आणल्यावर तिला तिच्या रंगामध्ये किंवा पोतामध्ये खोट दिसते. जर मनात आलं तर पुनः जाऊन ती बदलावी लागते. यावरून असे दिसते कि कोणत्या हि गोष्टीची निवड-णूक करणे हि पिळ्व-णूक करण्यापेक्षा कमी नाही. नाही का?
( पुढील भागात इतर अनुभवबद्दल)

रिअलिटी शो

हल्ली टी.व्ही. च्या जवळ जवळ प्रत्येक चेनल वर रिअलिटी शोच पेव फुटलं आहे. बघाव त्या चेनल वर रिअलिटी शोच दिसतात. आता एक शो सुरु झालेला आहे “पती पत्नी और वो” यात एक अभिनेता, एक अभिनेत्री व “वो” म्हणजे त्यांचे एक बाळ आहे. थोड्याच दिवसात बिग बॉस भाग ३ सुरु होणार आहे. कधी डान्स शो तर कधी गाण्यांचा शो, कधी एकट्या मुलीचा शो तर कोठे आई सोबत मुलीचा डांस शो, आता आणखी एक नवीन शो सुरु आहे परफेक्ट ब्राइड. असे वेगवेगळे रिअलिटी शो सध्या सुरु आहेत.
पण खऱ्याखुऱ्या रिअलिटी शो  बद्दल कोणीच विचार करीत नाही. तुम्ही म्हणाल तो कोणता? अरे हे आपले जीवन. हा सुद्धा एक रिअलिटी शोच आहे की. त्यात बिग बॉस आहे तो इश्वर,उपरवाला. होय तोच आहे आपणा सर्वांचा बिग बॉस. तो जेव्हा ठरवतो तेव्हाच आमही या जगात येतो व त्याच्या मर्जीनेच येथून जातो. तो म्हणेल तसेच जगतो. त्याने उपाशी ठेवले तर ते हि करावे लागते. तो ठरवेल त्या च मुलीशी लग्न करावे लागते. त्याने आपल्याला जितके आयुष्य दिले आहे तेवढेच जगता येते नाही का? आहे कि नाही तो आपला सर्वांचा बिग बॉस.मग आपण सर्व सुद्धा एक खरा खुरा रिअलिटी शो नाही करीत आहोत. पण आपण सायंकाळ झाली कि त्या टी.व्ही समोर बसून हा नाही तर तो रिअलिटी शो बघत बसतो.

स्वर-लता

आज दसरा आहे. या सोबतच आजचा दिवस आणखी महत्वाचा आहे. आज गाण-कोकिला लता दीदींचा वाढदिवस सुद्धा आहे. स्वरांची देवी ज्यांच्या रूपाने आपल्या देशाला एक अनमोल,अमूल्य असा हिरा देवाने दिला आहे.आज दीदी ८० वर्षांच्या झाल्या पण आज हि त्यांचा आवाज एखाद्या लहान मुली सारखाच वाटतो. हि त्यांना देवाने दिलेली  अद्वितीय अशीच  देणगी आहे.दीदींना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दीदींच्या वाढदिवसानिमित्त google image  वरून download  केलेल्या त्यांच्या काही चित्रांचा स्लाईड शो सदर करीत आहे.
“तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार”

सीमोल्लंघन

विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा

आज विजयादशमी. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. ह्या दिवसाला सीमोल्लंघन अश्या नावाने सुद्धा ओळखतात. आज शमीची पण सोन म्हणून सर्वांना दिली जातात. त्यात एकमेकांचे प्रेम दिसून येते. विजयादशमी म्हटली कि मला हमखास लहानपणी साजरे केलेले सीमोल्लंघन आठवते. लहानपणी आम्ही सर्व भाऊ वडिलांसोबत गावची वेश ओलांडायला जात होतो व खरे खुरे सीमोल्लंघन करीत होतो. आता काय फक्त पेपरातच हा शब्द वाचायला मिळतो.

मला आठवते आम्ही सर्व तसेच गावाची इअतर मंडळी गावाची वेस ओलांडून शेतात जाऊन उसव शमीची पाने तोडून आणायचो(विचारूनच बर का). रमत गमत सर्व घरी यायचो. इकडे आई आमच्या ओवालानीची तयारी करून ठेवायची. आईने ओवाळणी केल्यावरच घरात यायची परवानगी होती. एकदा ओवाळले कि आम्ही घरात शिरायचो.मग आणलेले सोने घरात व शेजारी पाजारी वाटायला व मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जायचो. सर्व आपुलकीने व मनाने आशीर्वाद व खाऊ द्यायचे.

आता कसले सीमोल्लंघन. सोन सुद्धा दारावर विकत घ्याव लागत.आता सर्व यांत्रिक जीवन झालेलं आहे. सर्व कस घरी बसल्या-बसल्या व्हायला हव. त्या बिचाऱ्या गरीब आदिवशी लोकांचे धन्यवाद मानायला हवेत जे आपल्या साठी घरबसल्या सोन आणून देतात नाही तर हा सण आपण साजरा करू शकलो असतो का? हि विचार करण्यासारखी गोष्ठ आहे. शहरामध्ये राहून आपण सीमोल्लंघन करून सोन आणू शकलो नसतो व हा सण हि साजरा करू शकलो नसतो. मला मना पासून वाटत आपण त्या लोकांचे ऋणी आहोत.
पण एक मात्र नक्की आणखी २५-३० वर्षानंतर हे सण साजरे होतील किंवा नाही हे काही सांगता येत नाही. आपण लहान होतो तेव्हा पेक्षा आता थोड्या प्रमाणात त्याचे रितिनियम उरले आहेत. पुढे ते हि कदाचित गळून पडतील. असे होऊ नये म्हणून आताच आपल्या मुलं-नातवंड यांना शिकवलं पाहिजे सानावारांबद्दल.
असो तर सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

मामांचे विमानारोहण

हल्ली उंदीरमामानी बरेच कर्तब करायला सुरुवात केलेली आहे असे दिसते. नुकतेच मामा श्री गणेश यांचे सोबत  आपल्या कडे येऊन गेले. पण मला वाटते मामा नाराज झालेले आहेत. आजच एक बातमी झळकली. कि काल एका विमानतळावर विमान खोळंबून आहे. कारण काय तर त्या विमानात उंदीर मामा शिरले होते. शेवटी अधिकाऱ्यांना ते विमान रद्द करून प्रवाश्यांना दुसऱ्या विमानाने पाठवावे लागले.

सर्वांना भीती होती कि जर मामांनी कोणती वायर कुरतडली तर काय होईल. जर मामा विमानात इकडे तिकडे फिरू लागले तर काय होईल. असे जर झाले तर प्रवाशी विमानाच्या आत इकडून तिकडे पळत सुटतील आणि वर हवेत असणाऱ्या विमानाचा त्यामुळे तोल गेला तर. काही हि असो जर मामा विमानात असले तर अपघात होऊ शकतो म्हणून ते विमानच रद्द करावे लागले.
आता प्रश्न आहे मामांना विमानाच्या बाहेर कोण आणि कसे काढणार?  तसेच विमानात मामा आले कसे?

मला वाटते त्यांनी विचार केला असेल कि आपण गणपती  बाप्पाचे वाहन आहोत. आज आपण दुसऱ्या वाहनावर बसून प्रवास करावा. किंवा मामांना वाटले असेल रोज माणस परदेशात जातात आज आपण परदेशात जाऊन पाहावे  व तेथील हवा पाणी मानवले तर तेथेच मुक्काम ठोकावा. पण हा  मनुष्य प्राणी काही चांगला नाही. त्यांनी मामांची  इच्छा काही पूर्ण होऊ दिली नाही. बिच्चारे मामा माणसाला कोसत असतील नाही का?

Courtesy for photograph: Google image

Courtesy for photographs: Google image

मला मात्र एक गोष्ठ त्रास देत आहे कि मामा त्या विमानातून बाहेर कसे येतील. आपल्या घरात जर मामा शिरले तर त्यांना पकडणे किंवा बाहेर काढणे किती कठीण असते. घरातील एक एक सामान जागेवरून हलवावे लागते. तरी हि त्यांना शोधून काढणे कठीण असते. हे तर अवाढव्य विमान आहे. त्यात हि लपायला किती जागा आहेत. मामा त्या विमानातून बाहेर निघतील कि नाही? त्यांना बाहेर काढायला किती दिवस लागतील? उशीर झाला तर आणि ती जर मामी असली तर? व तिने विमानातच पिल्लांना जन्म दिला तर? असे नाना प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. एकाचे चार झाले तर त्यांना शोधणे आणखीनच कठीण होऊन जाईल. त्या विमानाला “बिचारे ते विमान” म्हणायची पाळी येऊ नये म्हणजे मिळवली.

ती आणि तो ( 3 रा व अखेरचा भाग )

“हे बघ तुला माहित आहेच कि मी एक साधा सुधा माणूस आहे. मी फक्त कामामध्ये लक्ष घालतो. मला इतर काही गोष्टी मध्ये लक्ष घालणे आवडत नाही. माझा स्वभाव तुला चांगला माहित आहे. मला होटेलात काय काय मिळत त्याचा स्वाद कशा असतो चांगला कोणत असत. हे काहीच माहित नाही. माझ्या बायको सोबत मी येतो तेव्हा तिलाच हे सर्व कराव लागत. मी काहीच सांगत नाही. कधी कधी तर ती वैतागते माझ्या वर. पण काय करू? त्यामुळे तूच काय ती ऑर्डर देऊन तक आता.” मधुकर म्हणाला.
यावर सुधाकर बोलला,” यार मध्य तू लहान पण पासून आहे तसाच आहे. काहीच बदल झालेला नाही तुझ्यात.”
“हो रे मी काय करू.” मध्या.
“बर मला एक संग तू आता काय करतोस.”
“अरे मी एका मोठ्या कंपनीत मनेजर आहे.”
“अरे पण एव्हढ्या मोठ्या कंपनीत तू मनेजर आणि राहणीमान इतक साध. तुला त्रास नाही का होत.”
“होतो रे, खूप त्रास होतो.घरी ऑफिस मध्ये. कंपनीच्या नियमाप्रमाणे व्यवस्थित राहावे लागते. पण माझ्या मुले कंपनीला खूप फायदा होत असल्याने त्यांना माझे राहणीमान सहन करावे लागते.”

असे बोलत बोलत दोघांनी जेवण आटोपले. तोपर्यंत रात्रीचे ११.३० झाले होते. सुधाकरचा त्याने निरोप घेतला व आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. घराजवळ पोचे पर्यंत तो पार निराश होऊन गेला होता. बायको काय प्रश्न विचारेल याची त्याला कल्पनाच येत नव्हती. जिना चढून दाराजवळ जायला त्याला रात्रीचे १२.४५ झाले होते. त्याने दारावरची बेल वाजवली व दार उघडण्याची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला पण दार काही उघडले जाईना. आता काय करावे त्याला सुचेना. त्याने पुनः एकदा बेल वाजवली. असे करीत करीत त्याने  तीन वेळा बेल वाजविली पण तिने दार उघडले नाही. आता मात्र त्याच्या मनाची घालमेल सुरु झाली. मग त्याने तिला फोन करायचे ठरविले. त्याने फोन लावला व तो तिने लगेच कट केला. आता तर तो घाबरलाच. आणि त्याच्या मनात विचारांचे असंख्य ढग जमा होऊ लागले. इतक्यात दार ओघालाल्याचा आवाज झाला व तिने दार उघडल. पण हा त्या ढगांमध्ये इतका मग्न झाला होता कि त्याला दार उघडल्याचे समजलेच नाही. तो बघत नाही हे बघून ती मना मध्ये हसली. तसे थोडे स्मित तिने चेहऱ्यावर सुद्धा आणले. जसे त्याने तिच्या कडे पाहिले तिने चेहरा रंगीत केला. तिला बघून तो घाबरला. दारातून आत गेला व सरळ बेड ऋण मध्ये जाऊन कपडे बदलले. इतक्यात ती आत आली. तिने त्याची गम्मत करायची असे मनो मनी ठरवले होतेच. ती थोडी चिडूनच बोलली, ” अहो, हि  सुधा कोण? आणि रात्रीच्या बारा वाजे पर्यंत तुम्ही तिच्या सोबत कुठे गेला होता? काय केल इतका वेळ?” तिने त्याच्यावर  पश्नांची शर्बत्तीच केली अक्षरसहः
आता मात्र तो बुचकळ्यात पडला. त्याने तिला सांगितले.”अग माझा लहान पण पासून च मित्र आहे हा सुध्या. अग मी खरच सांगत आहे तुला. मी कधी खोट बोलतो का? अग विश्वास ठेव माझ्यावर.”
तिने आता बघितले कि तो बिच्चारा खूप घाबरला आहे. म्हणू तिने त्यच्या जवळ जाऊन  म्हटले “मला माहित आहे हो सर्व. तुम्ही  एकदा मला तुमच्या लहान पानाच्या मित्र बद्दल सांगितले  होते. त्यात सर्वात जवळचा  मित्र म्हणून तुम्ही सुधाकर भाऊजी यांचेच नाव घेतले होते.”
“अग पण तू इतकी चिडली का होतीस?”
“अहो मी चांगले ओळखते तुम्हाला. मी तुमची गम्मत करायची असे ठरविले होते.”
“अग पण माझा जीव जात होता कि. अशी गम्मत करणे बरोबर नाही.”

ती आणि तो (भाग -२)

मधुकर दचकलाच,” अग खरच सांगतो आहे मी, तो मित्रच आहे माझा.”
ती,”हो का भेटायला हव तुमच्या त्या मित्राला.”
मधुकर,”बर बर, मी घेऊन येईल त्याला.”
ती,” आताच नको.”
आणि तिने लागलीच फोन ठेवला.
इकडे मधुकरच्या मनात चलबिचल सुरु झाली.आता काय कराव. तिच्या मनातील संकेच निरसन कस कराव हेच त्याला समजेना. विचार करता करताच तो हॉटेलात शिरला. समोरच सुधाकर त्याची वाट बघत बसला होता. ह्याला पाहताच तो उठला व जवळ जवळ ओरडलाच,” अरे यार मध्य तू अचानक कोठे निघून गेला होता.”
” काही नाही रे जरा घराचा फोन होता आणि इथे रेंज नव्हती म्हणून बाहेर जाऊन बोलत होतो.” मधुकर उवाच.
सुधाकर मध्येच म्हणाला,” बर ते जाऊ दे तो वेटर येऊन गेला रे दोन वेळा. सांग बर लवकर त्याला काय ऑर्डर द्यायची ते.”
मधुकर आधीच चिंतेत होता आणि आता ह्या सुध्याने त्याला ऑर्डर काय द्यावी हा प्रश्न केल्यावर तो आणखीनच चिंतेत गेला. त्याचे कारण असे कि हा आपला मधुकर स्वतः हून कधीच काही निर्णय घेत नाही व हॉटेलातील सर्व ऑर्डर त्याची बायको ती रश्मिच देते. त्यामुळे मध्याला ऑर्डर देण्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणूनच त्याची चिंता आणखीनच वाढली. त्याच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव सुधाकर बारकाईने बघत होता. फक्त बघतच नव्हता त्याचे विश्लेषण करून त्याच्या मनात नेमके काय चालले आहे याचा मनोमनी आढावा घेत होता. हि त्या सुध्याला ईश्वराने दिलेली देणगीच होती.

बराच वेळ ते दोघे असेच शांत बसून होते. मधुकर आपल्या चिंतेत मग्न होता व सुधाकर मात्र मधुकर नेमका काय विचार करतोय या चिंतेत मग्न होता. एक मात्र नक्की दोघे हि कशात न कष्ट तरी मग्न होते आणि त्यामुळे दोघांनाही हे भानच राहील नाही कि आपण हॉटेलात जेवणासाठी आलो आहे.
“साहेब काय हवं आहे आपल्याला. ऑर्डर देता का प्लीज.” इति वेटर.
हे शब्द कानावर पडता बरोबर दोघे हि गाढ झोपेतून जागे झाल्यासारखे खडबडून उठले. व त्या वेटर कडे पाहू लागले. त्याच्या कडे थोडा वेळ पाहून मग भानावर येऊन दोघे एक दुसऱ्याकडे पाहू लागले. आणि दोघांनाही एकदम हसू फुटले तेही जोरात.

पुनः येरे माझ्या मागल्या. सुधाकरने परत मधुकरला तोच प्रश्न केला,” सांग मित्रा आता बराच वेळ झालेला आहे काय ऑर्डर द्यावी. आज तुझ्याच पसंतीचं जेवण करू.”
“हे बघ सुध्या अरे मला काही हि चाले तूच काय ती ओरद्र दे बर पटकन.”
“नाही रे, मी तुझ्या शहरात आलो आहे. तूच ऑर्डर दे”. सुधाकर.
“आता तुला खर काय ते सांगण मला भाग आहे”.  मधुकर आपल्या चेहऱ्यावर लाजल्यासारखे भाव आणून म्हणाला.
“काय रे बाबा काय सांगायचं आहे तुला.” सुधाकर.

( व्यत्यय बद्दल क्षमस्व)

“चांद पर पानी”

तुम्हाला हेडिंग वाचून वाटल असेल मराठी ब्लोगवर हिंदी हेडिंग कस काय? पण सध्या या हेडिंग ने “तहलका माचा दिया है.” जगामध्ये. आपल्या चांद्रयानाने बिचाऱ्याचा अंत झाला असला तरी शेवटचा स्वास  घेता घेता  या जगाला काही खास दिले आहे. चांद्रयानाने चंद्रावर पानी आहे याचा शोध लावला आहे व जगाच्या दृष्टीने हि अत्त्यंत महत्वाची गोष्ट आहे. टी. व्ही. वर सतत हि बातमी झळकत आहे. हीच बातमी बघता बघता मनात कल्पना आली कि कदाचित आजपासून ४०-५० वर्ष्यानंतर मानव चंद्र वर राहायला गेला असेल. तेथे हि आपल्या सारखी वस्ती झाली असेल. रस्त्यावर आपल्या सारखीच वाहनच वाहन  दिसतील. आणि येथे पृथ्वीवरील घराघरातील चित्र काय असेल ते आता पाहू.
” अरे, बेटा तू काही दिवस तरी थांब रे येथे.” आई आपल्या एकुलत्या एक मुलाला रडत रडत म्हणाली.
“नाही ग आई , मला आता अजिबात थांबता येणार नाही. आधीच उशीर झाला आहे. माझी सुट्टी दोन दिवसापूर्वीच संपली आहे.” मनीष आपल्या आईजवळ जाऊन म्हणाला. आईने त्याच्या गालावर प्रेमाने  हात फिरवीत म्हटले,” मला माहित आहे रे ते. पण मन नाही रे मानत तुला सोडायला. मुलांची खूप आठवण येते रे आम्हाला. तुझे बाबा तर त्यांचे फोट पाहून पाहून रडत असतात”.
” अरे, मनीष बेटा तुला एक गोष्ट सांगायची राहिलीच रे. तुझ्या बाबांना नातवांची आठवण येते तेव्हा ते फोटो तर पाहून पाहून रडतातच. आणि त्याने हि मन भरलं नाही न तर अंगणात येतात व वर चंद्राकडे पाहून त्यांना हाक मारतात. व थकले कि रडत बसतात.” इति आई.
मनीष,”आणि तू ग आई.”
मनीषचे हे म्हणणे बाबांना पटले नाही व त्यांनी मध्येच त्याला टोकले.”तुला काय वाटत मनीष तुझी आई दगड आहे तुमच्या सारखी. मी रडतो आणि ती हसते अस का रे वाटत तुला.”
“तस नाही हो बाबा. मी जरा उगाचच आईची गम्मत करावी म्हणून म्हटलं.”
“हो रे, तुझी तर गम्मत होते न. येथे आमचा जीव जात आहे आमच्या पासून लांब.” इति बाबा.
“बाबा मला माफ करा पण मी आता काहीच करू शकत नाही. मला जावेच लागेल.”
“बर बाबा , तुझी मरजी.” आई व बाबा एकदम उच्चारले. व आता पर्याय नाही म्हणून आपल्या सुनेला व नातवांना प्रेमाने आलिंगन घातला. नातवांची पप्पी घेतली व सर्वांना  टाटा करण्यासाठी त्यांच्याच सोबत घराबाहेर पडले. घराबाहेर  मनीषच यान उभच होत. आपल्या मालकाला बघता बरोबर यान स्वतः तयार झाल व उलगडू लागल. बघता बघता ते छोटस यान उडन तस्तरी सारख आकाराला आल व त्याचे दरवाजे स्वतःच उघडले गेले. लगेच आई बाबांचा निरोप घेऊन मनीष, त्याची बायको व दोघी मुल त्या यानात बसली.

(उर्वरित भागासाठी उद्याची वाट पहावी.)

ती आणि तो (भाग -१)

ट्रिंग…..ट्रिंग…
अचानक त्याच्या टेबलावरील फोन वाजला.पण त्याने काहीच प्रतिक्रिया व्यक्त न करता फाईल मध्ये खुपसलेले डोके तसेच ठेवले व फक्त तिरक्या नजरेनेच मोबाईल कडे पहिले. नंबर ओळखीचा नसल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने पुनः तेच म्हटल्यावर तो चिडला व त्याने मोबाईल vibrator वर करून ठेवला. व आपले काम सुरूच ठेवले. तितक्यात तुकारामाने चहा आणला. त्याने पाणी पिले व सुस्तावून चहा घ्यायला सुरु करू इतक्यात पुनः ट्रिंग ट्रिंग. आता मात्र त्याने तो फोन घेतलाच. थोडा चिडूनच तो उच्चारला “हेलो कोण बोलतय”
तिकडून आवाज आला” अरे, मध्या, अरे लेका काय चाललंय.”
ऐकता बरोबर तो जमिनी पासून चार फुट उडालाच.
तो रागाने उत्तरला “कोण बोलता आहे आपण.”
तिकडून ” अरे लेका, आपण आपण काय करतो आहे.”
” अरे हो पण नाव तरी सांगा कि आपल”
“अरे मध्या, अरे मी बोलतो आहे.”
“अरे मी कोण”
“अरे तू आवाज नाही ओळखला का माझा.”
” अरे बाबा मी नाही ओळखल तुला.” आता तो हि तुम्ही वरून तू वर आला.
” चला तू अरे तुरे तरी करायला लागला. अरे त्याने जवळीक वाढते.”
” हो बरोबर आहे ते. अरे एक मिनिट मला हा आवाज थोडा ओळखीचा वाटतो आहे.”
” हा आता ओळख पाहू.”
“मला आठवतं तू सुध्या तर नाही न.”
” एकदम बरोबर, चल आता तू मला ओळखलं तर.”

‘अरे यार तुला कसे विसरणार मी. माझा जिवलग मित्र तू.” इति मधु.
“पण लगेच ओळखलं नाही तू मला.”इति सुधाकर.
“मला माफ कर यार. मी जरा  कामात होतो म्हणून लगेच क्लिक झाले नाही. बर तू आज अचानक कसा काय. किती वर्षाने फोन केलास. तुला माझा नंबर कोठून मिळाला.” मधु ने प्रश्नांची शर्बत्ती केली.
“अरे काय सर्व प्रश्न आताच करशील काय. भेटायचा विचार दिसत नाही वाटत. जिवलग मित्र म्हणतो आणि त्याला कात्वायचा प्रयत्न दिसतो आहे तुझा.” सुधाकर थोडा चिडूनच बोलला.
त्यावर मधु म्हणाला. “नाही रे सुध्या. तस नाही रे, इतक्या वर्षांनी फोन आला म्हणून आले तितके प्रश्न विचारून टाकले एकदम.”
” अरे, मित्रा मी तुझ्या शहरात आलो आहे.” तिकडून सुधा चा आवाज.
“अरे, मग ये कि भेटायला.”
“नाही तुच ये माझ्या लॉज वर.”
” बर, मी ऑफिस मधून निघतो आणि लगेच तुझ्या कडे येतो मग बसू गप्पा मारत.”
“ठीक आहे ये तर मग. मी तुझी वाट बघतो.”
आणि मधुकर ने फोन खाली ठेवला व तो जुन्या आठवणींमध्ये गुंग झाला. थोड्या वेळाने त्याने दप्तर आवरले व ऑफिस मधून बाहेर पडला आणि थेट सुध्याच्या लॉज वरच पोहोचला.
सुधाकर त्याची वाटच पाहत बसला होता. भेटता क्षणी दोघी मित्रांनी प्रथम गळा भेट केली. मग निवांत रूम मध्ये बसून गप्पा करू लागले.दोघी हि जाम खुष होते.

दोघी लहानपनापासुंचे मित्र असल्याने अगदी लहानपणापासूनच्या गोष्टी व आठवणीत रंगून गेले. वेळ पुढे सरकत होती पण कोणालाच भान नव्हते. अचानक सुधाकर म्हणाला”अरे यार चल आता आपण मस्तपैकी हॉटेल शोधू आणि सोबतच जेवण करू.”
एव्हाना रात्रीचे १० वाजले होते. मधूने आपल्या घरी काहीच कळविले नव्हते. पण आता उशीर झाला होता. आता जर त्याने कळविले तर ती जाम भडकेल हे त्याला उमगले होते व म्हणून त्याची  थोडी  चलबिचल होत होती. काय करावे हे त्याला समजेना. आणि आता तर सुध्याबरोबर जेवण करावयाचे होते. आता रात्रीचे निश्चित बारा तरी वाजणार होते घरी जायला. शेवटी त्याने मनात ठरविले.जे होईल ते पाहू. व तो मित्रा बरोबर हॉटेल मध्ये जेवणासाठी शिरला.
पुनः जेवतांना गप्पा रंगल्या. सुधाकरला घाई नसल्याने तो निवांत होता. इतक्यात मोबाईलची घंटा वाजली व मधुकर दचकला. दचकला यासाठी कि हा निश्चितच घराचा फोन असावा. त्याने मोबाईल काढला व नंबर बघितला. बायकोचाच फोन होता तो. तो काहीही न बोलता जागे वरून उठला व हॉटेलच्या बाहेर आला. तिकडून बायको बोलत  होती” अहो कोठे आहात तुम्ही. इतका वेळ का लागला.”
” अग, अचानक माझा एक मित्रा आला आहे जुना आता मी त्याच्या सोबतच हॉटेल मध्ये जेवण घेत आहे. येतो थोड्या वेळाने. थोडा उशीरच होईल बर का. माझी वाट पाहू नको. चीमुला जेवू घालून झोपवून दे.”
मध्याने इतके बोलून बायकोच्या उत्तराची वाट न बघता फोन बंद केला. लगेच फोन वाजला. परत बायकोचाच फोन. ” अहो काय झाल.”
“अग, अचानक रेंज गेल्यामुळे फोन कट झाला.”
” कोण मित्र आला आहे तुमचा.”
” अग लहानपनीचा एक मित्र आहे सुधा म्हणून.”
त्याने इतक म्हणता बरोबर ती ओरडलीच. “सुधा! कोण हि सुधा.”
” अग मुलगी नाही मित्र आहे तो माझा.”
“मित्र आहे का. खरच सांगता आहात न तुम्ही.”

( पुढील भाग उद्याच्या अंकात बर का!)

व्यथा मनाच्या

सांगू कशा मी गाथा मनाच्या,
व्यथा मनाच्या
कोणाला सांगू? कसे सांगू?
का सांगू ? मी
कथा मनाच्या.
हवी होती मला
एक ज्योती,
चहुबाजू प्रकाशमान करणारी
प्रेम भावना जोपासणारी
अबोल माझ्या व्यथांना
समजून घेणारी.

परंतु
सापडली मला
एक पणती
ठेवायला कोपऱ्यातल्या अंधारात
आणि
शोधतच राहिलो मी तिला
त्या टिमटिमणाऱ्या प्रकाशात.