रस्त्यावरील वाढती गर्दी


कालच मी शहर बस ने प्रवास करीत असतांना अचानक जोराचा आवाज आल्यावर मी खिडकीतून बाहे डोकावून बघितल्यावर एका म्हशीला एका करणे जोराची धडक दिल्याचे दिसले. बिचारी म्हस. जोरात फेकली गेली. वाईट वाटले. जनावर असल्याने रस्त्यावर गर्दी झाली नाही कि ट्राफिक हि जाम झाले नाही.

FAQLUCAUPL2DGCAVWH1T0CAO01LRFCAAFF7SVCAAYZLONCAUTVN17CA99BTT7CAOT8IMICA7SOJLNCAXK8D7MCANJDMRECA3QB5J9CAE0MPWZCA9POJ6ECA0JZG1XCAO0M5UNCAC0GRR8CAVNVCEE

 

तितक्यात माझी बस पुढे निघाली . पण मनात विचार सुरु झाले होते. मी जपानला गेलो असता मला सहज बोलता बोलता तेथील जपानी सहकाऱ्यांनी प्रश्न विचारला होत कि तुमच्या देश्यात रस्त्यारस्त्यावर जी जनावर म्हणजे गाई व म्हसी बसलेल्या असतात त्या कोणाच्या असतात. मान लाजेने खाली गेली. काय करणार आपलेच दात व आपलेच ओठ. काही तरी बोळवण  करून, त्या जपान्यांची, वेळ मारून नेली व विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

बस  ने प्रवास करीत असतांना मला जपान मधील बस प्रवास आठवला. ओसाका चे विमान ताल समुद्राच्या मध्ये बांधलेले.

 

 विमानातून उतरल्यावर आम्ही बसने जवळ जवळ १०० किलोमीटर प्रवास केला पण पोटातील पाणी सुद्धा हलले नाही. बस मध्ये गर्दी नाही कि गोंगाट नाही. नाहीतर आपल्या बस मध्ये शेजाऱ्याशी सुद्धा संवाद साधता येत नाही. हि दुरी आपण साधणार कि नाही देव जाणे.

पण आपणाला ते झेपवणार नाही. एवढा खर्च आपल्या देशाला परवडणार नाही. आपल्या देशाची जनसंख्या अफाट आहे.

2 thoughts on “रस्त्यावरील वाढती गर्दी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s