ती आणि तो (भाग -१)


ट्रिंग…..ट्रिंग…
अचानक त्याच्या टेबलावरील फोन वाजला.पण त्याने काहीच प्रतिक्रिया व्यक्त न करता फाईल मध्ये खुपसलेले डोके तसेच ठेवले व फक्त तिरक्या नजरेनेच मोबाईल कडे पहिले. नंबर ओळखीचा नसल्याने त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने पुनः तेच म्हटल्यावर तो चिडला व त्याने मोबाईल vibrator वर करून ठेवला. व आपले काम सुरूच ठेवले. तितक्यात तुकारामाने चहा आणला. त्याने पाणी पिले व सुस्तावून चहा घ्यायला सुरु करू इतक्यात पुनः ट्रिंग ट्रिंग. आता मात्र त्याने तो फोन घेतलाच. थोडा चिडूनच तो उच्चारला “हेलो कोण बोलतय”
तिकडून आवाज आला” अरे, मध्या, अरे लेका काय चाललंय.”
ऐकता बरोबर तो जमिनी पासून चार फुट उडालाच.
तो रागाने उत्तरला “कोण बोलता आहे आपण.”
तिकडून ” अरे लेका, आपण आपण काय करतो आहे.”
” अरे हो पण नाव तरी सांगा कि आपल”
“अरे मध्या, अरे मी बोलतो आहे.”
“अरे मी कोण”
“अरे तू आवाज नाही ओळखला का माझा.”
” अरे बाबा मी नाही ओळखल तुला.” आता तो हि तुम्ही वरून तू वर आला.
” चला तू अरे तुरे तरी करायला लागला. अरे त्याने जवळीक वाढते.”
” हो बरोबर आहे ते. अरे एक मिनिट मला हा आवाज थोडा ओळखीचा वाटतो आहे.”
” हा आता ओळख पाहू.”
“मला आठवतं तू सुध्या तर नाही न.”
” एकदम बरोबर, चल आता तू मला ओळखलं तर.”

‘अरे यार तुला कसे विसरणार मी. माझा जिवलग मित्र तू.” इति मधु.
“पण लगेच ओळखलं नाही तू मला.”इति सुधाकर.
“मला माफ कर यार. मी जरा  कामात होतो म्हणून लगेच क्लिक झाले नाही. बर तू आज अचानक कसा काय. किती वर्षाने फोन केलास. तुला माझा नंबर कोठून मिळाला.” मधु ने प्रश्नांची शर्बत्ती केली.
“अरे काय सर्व प्रश्न आताच करशील काय. भेटायचा विचार दिसत नाही वाटत. जिवलग मित्र म्हणतो आणि त्याला कात्वायचा प्रयत्न दिसतो आहे तुझा.” सुधाकर थोडा चिडूनच बोलला.
त्यावर मधु म्हणाला. “नाही रे सुध्या. तस नाही रे, इतक्या वर्षांनी फोन आला म्हणून आले तितके प्रश्न विचारून टाकले एकदम.”
” अरे, मित्रा मी तुझ्या शहरात आलो आहे.” तिकडून सुधा चा आवाज.
“अरे, मग ये कि भेटायला.”
“नाही तुच ये माझ्या लॉज वर.”
” बर, मी ऑफिस मधून निघतो आणि लगेच तुझ्या कडे येतो मग बसू गप्पा मारत.”
“ठीक आहे ये तर मग. मी तुझी वाट बघतो.”
आणि मधुकर ने फोन खाली ठेवला व तो जुन्या आठवणींमध्ये गुंग झाला. थोड्या वेळाने त्याने दप्तर आवरले व ऑफिस मधून बाहेर पडला आणि थेट सुध्याच्या लॉज वरच पोहोचला.
सुधाकर त्याची वाटच पाहत बसला होता. भेटता क्षणी दोघी मित्रांनी प्रथम गळा भेट केली. मग निवांत रूम मध्ये बसून गप्पा करू लागले.दोघी हि जाम खुष होते.

दोघी लहानपनापासुंचे मित्र असल्याने अगदी लहानपणापासूनच्या गोष्टी व आठवणीत रंगून गेले. वेळ पुढे सरकत होती पण कोणालाच भान नव्हते. अचानक सुधाकर म्हणाला”अरे यार चल आता आपण मस्तपैकी हॉटेल शोधू आणि सोबतच जेवण करू.”
एव्हाना रात्रीचे १० वाजले होते. मधूने आपल्या घरी काहीच कळविले नव्हते. पण आता उशीर झाला होता. आता जर त्याने कळविले तर ती जाम भडकेल हे त्याला उमगले होते व म्हणून त्याची  थोडी  चलबिचल होत होती. काय करावे हे त्याला समजेना. आणि आता तर सुध्याबरोबर जेवण करावयाचे होते. आता रात्रीचे निश्चित बारा तरी वाजणार होते घरी जायला. शेवटी त्याने मनात ठरविले.जे होईल ते पाहू. व तो मित्रा बरोबर हॉटेल मध्ये जेवणासाठी शिरला.
पुनः जेवतांना गप्पा रंगल्या. सुधाकरला घाई नसल्याने तो निवांत होता. इतक्यात मोबाईलची घंटा वाजली व मधुकर दचकला. दचकला यासाठी कि हा निश्चितच घराचा फोन असावा. त्याने मोबाईल काढला व नंबर बघितला. बायकोचाच फोन होता तो. तो काहीही न बोलता जागे वरून उठला व हॉटेलच्या बाहेर आला. तिकडून बायको बोलत  होती” अहो कोठे आहात तुम्ही. इतका वेळ का लागला.”
” अग, अचानक माझा एक मित्रा आला आहे जुना आता मी त्याच्या सोबतच हॉटेल मध्ये जेवण घेत आहे. येतो थोड्या वेळाने. थोडा उशीरच होईल बर का. माझी वाट पाहू नको. चीमुला जेवू घालून झोपवून दे.”
मध्याने इतके बोलून बायकोच्या उत्तराची वाट न बघता फोन बंद केला. लगेच फोन वाजला. परत बायकोचाच फोन. ” अहो काय झाल.”
“अग, अचानक रेंज गेल्यामुळे फोन कट झाला.”
” कोण मित्र आला आहे तुमचा.”
” अग लहानपनीचा एक मित्र आहे सुधा म्हणून.”
त्याने इतक म्हणता बरोबर ती ओरडलीच. “सुधा! कोण हि सुधा.”
” अग मुलगी नाही मित्र आहे तो माझा.”
“मित्र आहे का. खरच सांगता आहात न तुम्ही.”

( पुढील भाग उद्याच्या अंकात बर का!)

6 thoughts on “ती आणि तो (भाग -१)

    • महेंद्रजी, चांगल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मला वाटत उत्कंठा थोडी जास्त वाढू द्यावी. माफ करा ह.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s