ती आणि तो (भाग -२)


मधुकर दचकलाच,” अग खरच सांगतो आहे मी, तो मित्रच आहे माझा.”
ती,”हो का भेटायला हव तुमच्या त्या मित्राला.”
मधुकर,”बर बर, मी घेऊन येईल त्याला.”
ती,” आताच नको.”
आणि तिने लागलीच फोन ठेवला.
इकडे मधुकरच्या मनात चलबिचल सुरु झाली.आता काय कराव. तिच्या मनातील संकेच निरसन कस कराव हेच त्याला समजेना. विचार करता करताच तो हॉटेलात शिरला. समोरच सुधाकर त्याची वाट बघत बसला होता. ह्याला पाहताच तो उठला व जवळ जवळ ओरडलाच,” अरे यार मध्य तू अचानक कोठे निघून गेला होता.”
” काही नाही रे जरा घराचा फोन होता आणि इथे रेंज नव्हती म्हणून बाहेर जाऊन बोलत होतो.” मधुकर उवाच.
सुधाकर मध्येच म्हणाला,” बर ते जाऊ दे तो वेटर येऊन गेला रे दोन वेळा. सांग बर लवकर त्याला काय ऑर्डर द्यायची ते.”
मधुकर आधीच चिंतेत होता आणि आता ह्या सुध्याने त्याला ऑर्डर काय द्यावी हा प्रश्न केल्यावर तो आणखीनच चिंतेत गेला. त्याचे कारण असे कि हा आपला मधुकर स्वतः हून कधीच काही निर्णय घेत नाही व हॉटेलातील सर्व ऑर्डर त्याची बायको ती रश्मिच देते. त्यामुळे मध्याला ऑर्डर देण्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणूनच त्याची चिंता आणखीनच वाढली. त्याच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव सुधाकर बारकाईने बघत होता. फक्त बघतच नव्हता त्याचे विश्लेषण करून त्याच्या मनात नेमके काय चालले आहे याचा मनोमनी आढावा घेत होता. हि त्या सुध्याला ईश्वराने दिलेली देणगीच होती.

बराच वेळ ते दोघे असेच शांत बसून होते. मधुकर आपल्या चिंतेत मग्न होता व सुधाकर मात्र मधुकर नेमका काय विचार करतोय या चिंतेत मग्न होता. एक मात्र नक्की दोघे हि कशात न कष्ट तरी मग्न होते आणि त्यामुळे दोघांनाही हे भानच राहील नाही कि आपण हॉटेलात जेवणासाठी आलो आहे.
“साहेब काय हवं आहे आपल्याला. ऑर्डर देता का प्लीज.” इति वेटर.
हे शब्द कानावर पडता बरोबर दोघे हि गाढ झोपेतून जागे झाल्यासारखे खडबडून उठले. व त्या वेटर कडे पाहू लागले. त्याच्या कडे थोडा वेळ पाहून मग भानावर येऊन दोघे एक दुसऱ्याकडे पाहू लागले. आणि दोघांनाही एकदम हसू फुटले तेही जोरात.

पुनः येरे माझ्या मागल्या. सुधाकरने परत मधुकरला तोच प्रश्न केला,” सांग मित्रा आता बराच वेळ झालेला आहे काय ऑर्डर द्यावी. आज तुझ्याच पसंतीचं जेवण करू.”
“हे बघ सुध्या अरे मला काही हि चाले तूच काय ती ओरद्र दे बर पटकन.”
“नाही रे, मी तुझ्या शहरात आलो आहे. तूच ऑर्डर दे”. सुधाकर.
“आता तुला खर काय ते सांगण मला भाग आहे”.  मधुकर आपल्या चेहऱ्यावर लाजल्यासारखे भाव आणून म्हणाला.
“काय रे बाबा काय सांगायचं आहे तुला.” सुधाकर.

( व्यत्यय बद्दल क्षमस्व)

2 thoughts on “ती आणि तो (भाग -२)

  1. छान झाली आहे कथा,. फक्त जरा लवकर संपवली असं वाटतंय.थोडी अजुन मोठी असती तरिही चालली असती. अगदी मनापासुन खरा खरा अभिप्राय देतोय, प्रसिध्द केला नाहित तरिही हरकत नाही.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s