हल्ली उंदीरमामानी बरेच कर्तब करायला सुरुवात केलेली आहे असे दिसते. नुकतेच मामा श्री गणेश यांचे सोबत आपल्या कडे येऊन गेले. पण मला वाटते मामा नाराज झालेले आहेत. आजच एक बातमी झळकली. कि काल एका विमानतळावर विमान खोळंबून आहे. कारण काय तर त्या विमानात उंदीर मामा शिरले होते. शेवटी अधिकाऱ्यांना ते विमान रद्द करून प्रवाश्यांना दुसऱ्या विमानाने पाठवावे लागले.
सर्वांना भीती होती कि जर मामांनी कोणती वायर कुरतडली तर काय होईल. जर मामा विमानात इकडे तिकडे फिरू लागले तर काय होईल. असे जर झाले तर प्रवाशी विमानाच्या आत इकडून तिकडे पळत सुटतील आणि वर हवेत असणाऱ्या विमानाचा त्यामुळे तोल गेला तर. काही हि असो जर मामा विमानात असले तर अपघात होऊ शकतो म्हणून ते विमानच रद्द करावे लागले.
आता प्रश्न आहे मामांना विमानाच्या बाहेर कोण आणि कसे काढणार? तसेच विमानात मामा आले कसे?
मला वाटते त्यांनी विचार केला असेल कि आपण गणपती बाप्पाचे वाहन आहोत. आज आपण दुसऱ्या वाहनावर बसून प्रवास करावा. किंवा मामांना वाटले असेल रोज माणस परदेशात जातात आज आपण परदेशात जाऊन पाहावे व तेथील हवा पाणी मानवले तर तेथेच मुक्काम ठोकावा. पण हा मनुष्य प्राणी काही चांगला नाही. त्यांनी मामांची इच्छा काही पूर्ण होऊ दिली नाही. बिच्चारे मामा माणसाला कोसत असतील नाही का?

Courtesy for photographs: Google image
मला मात्र एक गोष्ठ त्रास देत आहे कि मामा त्या विमानातून बाहेर कसे येतील. आपल्या घरात जर मामा शिरले तर त्यांना पकडणे किंवा बाहेर काढणे किती कठीण असते. घरातील एक एक सामान जागेवरून हलवावे लागते. तरी हि त्यांना शोधून काढणे कठीण असते. हे तर अवाढव्य विमान आहे. त्यात हि लपायला किती जागा आहेत. मामा त्या विमानातून बाहेर निघतील कि नाही? त्यांना बाहेर काढायला किती दिवस लागतील? उशीर झाला तर आणि ती जर मामी असली तर? व तिने विमानातच पिल्लांना जन्म दिला तर? असे नाना प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. एकाचे चार झाले तर त्यांना शोधणे आणखीनच कठीण होऊन जाईल. त्या विमानाला “बिचारे ते विमान” म्हणायची पाळी येऊ नये म्हणजे मिळवली.
🙂 funny
LikeLike
उंदीर मामा नेहमीच उद्योगी असतात. मला आठवत आहे एकदा आमची कशी फजीती उडालेली त्याच्यामुले! चांगला पोस्ट आहे. एकदम विनोदी 🙂
LikeLike
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
LikeLike