आता मला कळले आहे कि चांगले काम करणे, दुसऱ्याची मदत करणे म्हणजे नारायणगिरी करणे. जर हे खरे आहे तर अशी नारायणगिरी मी जवळजवळ रोज करतो. पण त्याला हल्ली लोकं वेडेपणा म्हणतात असा माझा अनुभव आहे. तरीही माझे मन म्हणते ते मी करीत असतो. साधा एक उदाहरण सांगतो मी राहत असलेल्या इमारती मध्ये पूर्वी जवळ जवळ रोजच पाण्याची टाकी ओव्हर फ्लो व्हायची. खूप पाणी वाया जायचे. माझ मन दुखायचे. खूप वेळा सांगून झाले. पण:( एकदा तर मी स्वतः च्या खर्चाने व्यवस्था करतो म्हणून हि सांगितले पण काही उपयोग झाला नाही शेवटी मी ठरविले आपण फुकटची व्यवस्था करावी. रोज रात्री ९.३० ला घर बाहेर यायचे सिगरेट हि ओढायची आणि टाकीचा नळ हि बंद करायचा. तेव्हा पासून ओव्हर फ्लो होणे थांबले. याने मला काही फायदा आहे का पण मन म्हणाले म्हणून.
मी १३( 😦 ) मे १९८५ रोजी नौकरीवर हजर झालो. तेव्हा पासून मुंबईतील लोकल चे धकाधकीचे जीवन जगत होतो. रोज सायंकाळी ६.०३ ची कसारा लोकल. तोच डबा तीच खिडकी, तीच जागा व तीच मानस. आमच्या ग्रुप मधील मंडळी( …न खेळणारी) भांडूप गेले कि प्रत्येकाने उठायचे व उभे असणार्याला जागा द्यायची. ओळखीचा असो किंवा नसो. मुंबई मध्ये माणुसकी(नारायण गिरी) खूप आहे. एखादी म्हातारी मंडळी समोर आली,किंवा एखादी बाई नवऱ्या सोबत जेन्ट्स डब्यात येऊन उभी असली कि जरी CST स्टेशन वरून असेल तरी हि तिला जागा देणार.
कधी लोकल चुकली तर ६.०८ ची अंबरनाथ लोकल मध्ये तोच डबा पकडीत होतो. त्या वेळी त्या डब्यात एक मनुष्य असायचा तो घाटकोपर सोडले कि पिशवीतून पाण्याची मोठी बाटली व छोटासा स्टीलचा ग्लास काढायचा एक एक करत आवाक्यात असतील व पाणी पुरेल तितक्या २५ ते ३० लोकांना पाणी पाजायचा. हा त्याचा रोजचा उद्योग होता. मला तर प्रवासात आज हि पाण्याची बाटली आवश्यक असो व नसो सोबत ठेवायची सवय जडली आहे. न जाणो कधी कोणाला गरज पडली तर.
सकाळच्या एका लोकल मध्ये उल्हासनगर मधील एक मनुष्य डोंबिवली सुटल्यावर बनपाव बाहेर काढायचा त्यांचे बारीक बारीक तुकडे करायचा प्रथम मी आश्चर्याने बघितले होते. नंतर बघितले कि तो ते तुकडे मुंब्रा येथील खाडी मध्ये मास्यांना खाण्यासाठी टाकायचा दररोज न विसरता. असे किती किस्से सांगू. महेंद्र ने हा नारायण समोर आणल्याने मला हे सर्व आठवले.
मला माझ्या या सवयींचा फायदा हि झाला. नाशिकला राहायला आल्यावर मला मुंबईला जवळ जवळ दररोज नौकरीला अप डाऊन करावे लागायचे. पंचवटी ने प्रवास. तेथे हि ग्रुप तयार केला. एव्हडा मोठा ग्रुप झाला कि जेथे ६ लोकांनी बसायची जागा तेथे २० लोकं बसायचा प्रयत्न करायची. अनंत विषयांवर गप्पा रंगायच्या. वेळ कधी निघून जायचा कळत नव्हते. रोज मी खायला काही न काही आणणार. तेथे हि तेच १ तासापेक्षा जास्त वेळ जागेवर बसायचे नाही. लगेच उभे असलेल्याला ओळख असो किंवा नसो. बोलावून बसायला जागा देणार म्हणजे देणार. त्याने मित्र मंडळी खूप वाढली.
अशी नारायण गिरी करणारी मंडळी आपणाला दररोज दिसते. पण महेंद्र म्हणाले तसे नजर हवी इतकेच.