सर्वतीर्थ टाकेद


आज आम्ही काही मित्र महाराष्ट्रात सर्वतीर्थ टाकेद या नावाने प्रसिद्ध असलेल्या तीर्थस्थानाला गेलो होतो. त्या गावाला आमचा एक मित्र राहत असल्याने आम्ही सर्व त्या मित्राला भेटायला गेलो होतो. त्याच गावात जटायू मंदिर आहे. या पूर्वीही आम्ही त्या मंदिराला भेट दिली आहे. पण आज अचानक असे वाटले कि या बद्दल आपल्या ब्लोगवर माहिती टाकावी म्हणून तेथील काही फोटो हि घेतली.
आम्ही सर्व कारने नाशिक येथून निघालो. रस्त्यात डोळ्यांना सुखदायी आनंद देणारी हिरवीगार शेती बाजूला छान डोंगरमाळ. डोंगरावर थोड्या थोड्या अंतराने वीज निर्मिती करणाऱ्या पवनचक्क्या. फार विलोभनीय दृश्य दिसत होते. शहरामध्ये असे विलोभनीय दृश्य बघायला आहे डोळे तरसतात.
सर्वतीर्थ टाकेद या तीर्थ स्थानाची महती अशी आहे कि रामायण काळात भगवान रामाचे वनवासातील काळात नाशिक(पंचवटी) येथे वास्तव्य असतांना लंकेचा राजा रावण याने सीतेचे अपहरण केले होते. रावण सीतेला विमानातून घेऊन जात असतांना व सीता माईचा आक्रोश सुरु असतांना आकाशातून भ्रमण करीत असणाऱ्या जटायूला ते दिसले व त्याने रावणाशी लढण्याचा प्रयत्न केला पण रावणाने त्याला घायाळ केले. तो घायाळ झालेला जटायू खाली जमिनीवर पडला ते स्थान होते टाकेद.
IMG1779A copyIMG1780A copy
टाकेद या तीर्थास्थानाची एक विशेषता आहे कि येथील शंकराची जी पिंड आहे त्याचे लिंग बाहेर नसून आत आहे. भक्तांनी आत हात टाकून ते लिंग बाहेर काढायचा प्रयत्न करायचा असतो. असे म्हणतात कि ते लिंग फक्त भाग्यवंतानाच बाहेर काढता येतो. ( मी काढले होते बर का. ते हि ३ वेळा) या फोटोत माझ्ये मित्र आत हात टाकून लिंग काढायचा प्रयत्न करीत असतांना दिसत आहेत. तत्पूर्वी बारा महिने ज्या कुंडात पाणी असते अश्या कुंडात हात पाय धुवायचे असतात.IMG1782A copyIMG1783A copy

आणि पुढील फोटो मध्ये त्यांनी शंकराचे पिंडीतील ते लिंग बाहेर काढून दाखविले आहे.( भाग्यवान आहेत ते:)).
IMG1785A copy
त्यानंतर आम्ही जटायुचे दर्शन घेतले. देऊळाच्या पाठीमाघे जाऊन आम्ही कुंडात येणारा प्रवाह कोठून येत आहे त्याचा शोध घेतला. अगदी मंदिरामागे झाडं आहेत, एक छोटा उंच सखल खड्डा आहे त्यातून पाणी झिरपत असल्याचे आम्हाला दिसले. त्याचा फोटो येथे देत आहे. देवाची किमया अपरंपार आहे यात शंका नाहीच.
Jatayu Mandir copyIMG1787A copyIMG1786A copy

6 thoughts on “सर्वतीर्थ टाकेद

  1. नासिकविषये पोस्ट आली की घरची फार आठवण येते…..ही माहिती देणारे मला वाटतय तुम्ही पहिलेच….अजून थोडी माहिती टाका ना!!! म्हणजे टाकेदला जाण्याचे मार्ग, नसिकहून कसे जाता येइल वगैरे…..माझा मामा जातो दरवर्षी….

    आणि पावसानंतरचा नासिक, ईगतपुरी, घोटीचा परिसर काय वर्णावा…..फोटो मस्त आलेत….

    Like

    • मला आणखी वर्णन टाकावास वाटल होत. पण वेळ कमी होती. रात्री उशिरा ती पोस्ट टाकली आहे. आज प्रयत्न करेन. असो, धन्यवाद.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s