आली दिवाळी


५-६ दिवसांपूर्वी मी कम्प्युटरवर (म्हणजे ब्लोग) बसलो होतो. अचानक सौ. जवळ येऊन बसल्या आणि हळूच म्हणाल्या,”अहो, दिवाळी आली जवळ.”
मी “हुं…” कम्प्युटरवर बसलो असल्याने इतकेच शब्द बाहेर पडले.
तिचे समाधान झाले नाही थोड्या वेळाने पुनः,”अहो एकलत का?”
मी खडबडून जागा झाल्यासारखा बोललो,” काही म्हणाली का?”
सौ.”मी किती वेळा तेच तेच बोलाव. तुमच लक्षच नसत माझ्या बोलण्याकडे.”
मी,”तस नाही ग. तू उगाच रागवू नको बर का.”
सौ,”बर ते जावू द्या. मी काय म्हणते दिवाळी जवळ आली आहे.”
आता पर्यंत त्यांच्या वागण्याचा सूर माझ्या लक्षात आला होताच.मी समजून चुकलो होतो काही तरी हव असल्यासच ती अशी लाडाने बोलते. मी,”हो का मला माहितच नव्हते.”
सौ,” तुम्हाला त्या ब्लोग शिवाय हल्ली काही सुचतच नाही मुळी.”
मी,” हा बोल काय म्हणत होतीस.”
आता स्वारी जरा मूड मध्ये आली होती.”मला दिवाळीच काय घेणार म्हणते मी.” त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी स्वारीचा बेत ओळखला व काही तरी वेगळा विषय काढून विषयपालट केला. आणि लगेच तिला मला जरा चहा देते का बनवून? असे सांगितले व ती लगेच किचन मध्ये निघून गेली.
तेव्हा मला खरोखर जाणीव झाली कि दिवाळी जवळ आलेली आहे.
दोन दिवसांपासून तर ती फराळाचे तयार करण्यामध्ये अतिशय मग्न आहे. आता पर्यंत लाडू, चकली, करंजी, शंकर पाडे तयार करून झाले आहेत.त्यांचे फोटो बघावे म्हणून येथे टाकीत आहे. तिच्या हातचे फराळ म्हणा किंवा रोजचे जेवण म्हणा अतिशय स्वादिष्ट असते. एकदा खाणारा खातच राहतो.तिच्या हाताचा स्वाद मी इतराच्या हातच्या पदार्थांमध्ये अद्याप बघितलेला नाही. (हे अगदी मना पसून लिहित आहे बर का नाही तर तुम्ह म्हणणार सौ.ला खुश करण्यासाठी लिहित आहे.)आणखी एक विशेषता सांगतो हे जे फराळाचे पदार्थ तिने बनविले आहेत ते फक्त माझ्या व मुळी साठीच कारण ती कधीच ते खात नाही किंवा तिला चालत हि नाही.

IMG1797AIMG1798AIMG1801AIMG1802A
चला तर मग आमच्याकडे फराळाला अवश्य या सह कुटुंब.
प्रतीक्षा

दिवाळीच्या प्रतीक्षेत दिवे

दिवाळीच्या प्रतीक्षेत दिवे

IMG1796A

8 thoughts on “आली दिवाळी

 1. तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!

  पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

  Like

 2. अरे वा!! सहीच तयारी झालीय की.
  आपणा सर्वांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!!

  बरे झाले हा ऒप्शन सुरू केलात. टिपणी टाकता येईना शेवटी मिनाकुमारीवर जाऊन टाकली. हा…हा….
  महेंद्र करवी निरोप दिला होतात. धन्यवाद महेंद्र.

  Like

  • आपणा सर्वांना हि दिवाळीच्या अनंत शुभेच्छा!!
   आपला निरोप महिंद्रने लगेच दिला होता. लगेचच मी तपासले असता माझ्या हातून चुकून सेटिंग बदलले गेले होते. बर मीना कुमारीची साईट कशी वाटली. तस मी त्या सीटला update करीत नव्हतो.आता करायला सुरुवात केली आहे. माझी एक हिंदी साईट आहे http://ravindrakoshti.blogspot.com त्यावर visit करून प्रतिक्रिया कळविल्या तर बरे वाटेल.

   Like

 3. जोरदार तयारी दिसते आहे…माझ्या सारख्या जातिच्या खवय्याची भुक चाळवायला फोटो पुरेसे आहेत. 🙂 दिपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा..

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s