अरे रे रे काय दिवस आले ……


आज म्हणे बड बड दिवस आहे. म्हणून हे हेडिंग दिले मी “अरे रे रे काय दिवस आले..” खरच काय हे दिवस आले आहेत आपल्यावर बड बड दिवस सुद्धा साजरा करण्याची वेळ आलेली आहे. काय हि मानवाची अवस्था झाली आहे देवा आता तूच याला वाचव रे देवा.
अहो बोलायला सुद्धा वेळ नाही ह्या माणसाला. असे तर होणार नाही. खरे सांगायचे तर बोलायला आवडत नाही ह्या माणसाला. फक्त पैसा एके पैसा. अरे आपल्या साठी, मुलांसाठी, बायको साठी व घराच्या इतर मंडळींसाठी काही वेळ खर्ची करा. भले हि त्या साठी काही पैसे खर्ची करावे लागले तरी चालतील. किंवा कमी पैसे कमाविले तरी चालेल. पण ह्या माणसाला ते कळतच नाही. ज्यांच्या साठी तू कमवीत आहे त्यांना तुझ्या सोबतीची गरज आहे. त्यांना सोडून तू पैस्याच्या मागे धावत आहेस व ते तू त्यांना वेळ देत नाही म्हणून दुसऱ्यांच्या मागे धावत आहेत. त्यांना बाहेर मित्र मंडळी शोधावी लागत आहे. अरे माणसा आता तरी जागा हो बाबा आणि असे बडबड दिवस साजरे करण्याची पाली येऊ देवू नकोस. विचार कर पुढची पिढी काय करेल ते. आज मानव रोज थोडे तरी बोलत आहे. पुढे तर यंत्र मानवाचं जग येईल तेव्हा काय होईल. तेव्हा मानव मानवाशी बोलणार नाहीच. तो फक्त त्या मशीन शी गप्पा मारेल. ह्याचे आणखी एक कारण म्हणजे आज प्रत्येक मनुष्य स्वतःला मोठा समजायला लागला आहे. कोणी हि माघार घ्यायला तयार नाही. या हे असेच सुरु राहिले तर पुढच्या शताब्दी मध्ये मानवाला मशीन सोबतच जीवन जगावे लागेल.
शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एक गोष्ठ लिहिली आहे. एकदा महादेव व देवी पार्वती जोडीने ब्रम्हांड भ्रमणाला निघाले होते. सहसा देवी त्यांच्या सोबत नसायची. आज भ्रमण करतांना देवीला पृथ्वीवर मानवाची दयनीय अवस्था दिसली. गरिबीत जगणारी लोक, भिकारी लोक यांना बघून देवी चे मन दुखावले गेले. देवीने महादेवाला सांगितले,” देवा हि काय अवस्था आहे मानवाची. मला हे बघवलं जात नाही. आपण काही तरी कराव.”
महादेवाने देवीला समजावयाचा प्रयत्न केला पण देवीने एकूण घेतले नाही. तेव्हा महादेवाने हर पत्करून तथास्तु म्हटले आणि पृथ्वीतळावरील मानवाची दशा अचानक पालटली. सर्व श्रीमंत झाले. प्रत्येकाला व्यवस्थित जेवण मिळाले. राहायला चं घर मिळाले. देवी खुश झाली.

काही दिवसांनी अचानक देवीला आठवण झाली व देवीने महादेवाला विचारले,” देवा, आपण मानवाला जे वरदान दिले होते त्याने आता मानव पूर्ण सुखी झाला असेल. नाही का?”
देव म्हणाले”देवी, आपण स्वतः चला माझ्या सोबत आणि आपल्या डोळ्यांनी बघून घ्याव मानव कसा नांदत आहे पृथ्वी तालावर.”
त्यावर देवी तयार झाली व महादेव सोबत भ्रमणाला निघाले. भ्रमण करतांना देवी ने बघितले प्र्य्थ्वी वर सर्व दूर घाणीचे साम्राज्य होते. कोणीही कोणाला विचारीत नव्हते. देऊळ घाणीने भरली होती मोडकळीस आली होती. ते बघून देवी अचंबित झाली व महादेवाला म्हणाली'”देवा हे काय झाले. मी ह्या मनावाच्या चांगल्या साठी आपण कडे वर मागितला होता. आणि येथे तर उलटेच झाले.”
महदेव म्हणाले”देवी, जगामध्ये धनवान असायला पाहिजे तसा गरीब हि असलाच पाहिजे. सुख असेल तेथे दुखः असलेच पाहिजे. तसे नसेल तर कोणाला कोणाची गरज भासणार नाही. आणि कोणी कोणाला विचारणार नाही. बिन कामाने सर्व मिळत असल्याने कोणाला हि काम करायची गरज राहणार नाही. म्हणून जसे जग पूर्वी चालत होते तसे योग्य होते.”
देवी ने ते मान्य केल व महादेवाने पुनः तथास्तु म्हटले.

2 thoughts on “अरे रे रे काय दिवस आले ……

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s