भविष्यातील अभिमन्यू


कालच टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकात एक बातमी वाचली कि जर तुम्हाला सन २०१४ मध्ये मुलाला मुंबई मधील एका चांगल्या शाळेत घालायचे असेल तर आजच त्याचे नाव नोंदवावे लागेल. जूं शाळेची इतकी मागणी असेल त्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी किती खर्च अपेक्षित असेल हे सामान्य माणूस विचार हि करू शकत नाही.असो पण हीच परिस्थिती राहिली तर सन २०२० मध्ये काय अवस्था असेल याची कल्पना मी ह्या कथेत मांडली आहे.

माधवी आई होणार हि बातमी कळल्यावर सर्वांना फारच आनंद झाला. मुकेश तर खूपच आनंदात होता. तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. बाहेर एका सुंदर हॉटेल मध्ये गेल्यावर दोघांनी हि हसत मुखाने एक मेकाकडे बघितले. ते दोघा आनंदाचा तो ख्सन जगात असतांना वेटर आला,”एस सर. ऑर्डर प्लीज ?” त्याचा आवाज एकल्या वर दोघेही भानावर आले. त्यांनी मेनू भावून सांगतो म्हणून त्याला जायला सांगितले. तो गेल्यावर ती दोघ पुनः आपल्या विश्वात बुडाली. मात्र लावरच दोघे पुअंह भानावर येऊन एकदम म्हणाली,” चल आधी जेवणाचे बघू.” आणि एकदम बोलल्यावर दोघे हसायला लागली.मग त्याने मेनू कडे पाहून तिला विचारले काय घ्यायचे. तसे त्याला तिची पसंद माहित होती तरी तिला मन देण्यासाठी त्याने विचारलेच.ती म्हणाली,”काय हे,तुला माहित नाही का मला काय आवडते ते?”
“अग हो मला चांगल माहित आहे पण आज तुझा दिवस आहे.तू मला आनंदाची बातमी दिली आहेस म्हणून तुला तुझी मरजी विचारावी असे मला वाटले.” मुकेश लाडात येऊन म्हणाला.
“हो रे बाबा तू माझे खूप लाड करतोस हे मलाच काय सर्व जगाला माहित आहे.”
“खोटे का आहे ते? अग, माधवी तू समजू शकत नाहीस मी तुला किती प्रेम करतो. आज तू जी बातमी मला दिली आहेस ती बातमी एकूण तर मी सातव्या आसमानात उडत आहे. माझ हृदय १२० च्या स्पीडने धावत आहे. ब्रेकच लागत नाही आहे त्याला. म्हणून मी तुला सोबत घेऊन आलो आहे.”मुकेश बोलतांना तीच हात हातात घेऊन म्हणाला.
“मी ओळखते रे तुला. आणि तुझ प्रेम हि मला ठाऊक आहे. उगाच दाखवू नको जगाला.” ती लाडाने नाराजी दाखवीत म्हणाली. व तिचे बोलणे एकूण तो घाबरलाच. त्याच्या चेहऱ्यावर ते लगेच दिसून आले.
“चल रे असा काय एकदम घाबरलास. अरे मी तुझी गम्मत करीत होते.”
“माधवी अशी गम्मत करीत जाऊ नको ग माझी. मला सहन नाही होत ते. आज या चांगल्या प्रसंगी तू शपथ घे तू पुनः अशी गम्मत करणार माझी.”
“बर रे बाबा, मी शपथ घेते पुनः अशी गम्मत करणार नाही.” माधवी म्हणाली.त्यांनी गोष्ठी करता करता जेवण आटोपले आणि घरी निघाले.

आता गोड बातमी एकूण जवळ जवळ चार महिने झाले होते. एके दिवशी माधवी व मुकेश दोघे आपल्या खोलीत एकटे असतांना गमती गमती मध्ये मुकेश ने माधवीच्या पोटावर कान लावला.”बघू माझा बाल्या काय म्हणतो आहे ते?”
“काय म्हणणार आहे तो मला लाथा मारतो सतत.”माधवी म्हणाली.
“अग, थांब जरा हा काही तरी म्हणतो आहे.”मुकेश जवळ जवळ ओरडूनच तिला म्हणाला.
ती ज्या अवस्थेत होती त्याच अवस्थेत थांबली.
” बाबा तुम्ही माझ्या शिक्षणाची काय व्यवस्था केली आहे?” असे तो पोटातील बाल बोलला. त्याचे ते बोल एकूण मुकेश उडालाच. त्याला विश्वास बसत नव्हता कि पोटातील बाल बोलू शकते.
तो माधवीला म्हणाला “आग आपला बाल बोलत आहे.”
“काय म्हणतोस काय?” माधवी
“अग हो, अगदी खरच सांगतो आहे मी.”
“अरे काय म्हणतो आहे रे तो? संग न मला लवकर.”
“अग हो उतावीळ होऊ नको अशी. सांगतो. तो म्हणत होता, कि बाबा तुम्ही माझ्या शिक्षणाची काय व्यवस्था केली आहे.” “बाप रे आपला बाळ तर पोटातच काळजी करू लागला आहे.”
“अग मी पण आश्चर्य चकित झालो आहे कि हा दुसरा अभिमन्यू तर जन्माला येत नाही आहे न?”
“अरे ते काही हि असो. पण आता तो स्वतः म्हणत आहे म्हणजे त्याच्या शिअक्षणाची काळजी आपल्याला घ्यायला हवी आहे कि नाही?”
” हो बरोबर आहे तुझ.”
“मग तू आजच कामाला लाग बघू आपल्या या शहरात सर्वात चांगली शाळा कोणती त्याचा तपास कर आणि आपल्या ह्या अभिमन्यूच्या शिक्षणाचा निकाल लाव.आणि हो येऊन त्याला तसा निरोप पान्द्यायला विसरू नको.” माधुरी.
“हो मी उद्या तेच काम करतो.” मुकेश.

तीन दिवस मुकेश फिरला संपूर्ण शहर भर फिरला. शहरातली सर्वात चांगली शाळा शोधून काढली. त्यांना लगेच त्याच्या होणाऱ्या बाळाचे एडमिशन करून घेण्याची विनंती हि करून टाकली. शाळेच्या प्राचार्यांना नवल व कौतुक हि वाटले. त्यांनी सांगितला तितका पैसा त्याने भरून हि टाकला. आणि घरी येऊन हि बातमी प्रथम आपल्या होणाऱ्या बाळाला नव्हे अभिमन्यूला सांगून टाकली.त्याने बाबांचे आभार हि लगेच मानून टाकले.

सांगायचा तात्पर्य असा कि सन २०२० मध्ये बाळाच्या जन्मापूर्वीच त्याचे शाळेत एडमिशन घ्यायला लागू नये म्हणजे मिळवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s