पाणी वाचवा भाग-२


पाणी हि जीवनावश्यक बाब आहे हे तान्हेल बाळ सुद्धा (जर बोलता आल तर:) ) सांगू शकेल. अश्या जीवनावश्यक बाबीकडे दुर्लक्ष्य करून चालेल का? चला तर मग आपण सर्व गहन विचार करू या, या विषयावर. खलबत करू या.
तर मित्रांनो सर्व प्रतम आपण हे बघू कि पाण्याचा उपयोग कशा कशा साठी होतो.
पाण्याचे उपयोग
१) पिण्यासाठी 🙂
२) शेतीसाठी
३) वीज निर्मिती साठी
अ) जल विद्युत प्रकल्पात पाण्याने चाकं फिरवून विजेची निर्मिती केली जाते.
ब) औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात पाण्याच्या वाफेने मशीन चे चाकं फिरवून वीज निर्मिती केली जाते. म्हणजे येथे हि पाणी लागतेच.
क) अनु उर्जा प्रकल्पात सुद्धा पाण्याचा थोडा फार उपयोग होतोच.
४) घरगुती वापरासाठी जसे कपडे धुणे, आंघोळ, दैनंदिन स्वच्छता इ.
५) औद्योगिक/ कारखान्यांसाठी

आता या वर्षी पाउस कमी पडला आहे. आता प्रश्न आहे तो पाण्याचा पुरवठा नेमका कोणाला प्रध्यान्न देवून करायचा. खैर हा प्रशासनिक प्रश्न आहे. पण आपण सुजाण नागरिक म्हणून पाणी कसे वाचविता येईल यावर आप आपल्या परीने विचार करून कमीत कमीत पाणी वापरले तर कदाचित पुढील पावसाळ्यापर्यंत आपल्याला पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.

पाण्याच्या वरील वापरापैकी पिण्याच्या पाण्याची बचत करणे म्हणजे पाणी कमीं प्यावे असे मी म्हणू शकत नाही. शेतीसाठी कमी पाणी वापरावे असे हि म्हणता येणार नाही. मात्र घरगुती वापरासाठी जसे कपडे धुणे, आंघोळ, दैनंदिन स्वच्छता यासाठी पाणी वाया न घालविणे असे म्हणता येईल. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो कि रस्त्यावर पाणी वाहत असते.तसे होवू नये हीच अपेक्षा.
आता खालील व्हीडीओ बघून आपल्याला कळेलच कि पाण्याचा दुरुपयोग कोठे होत असतो.ह्या व्हीडीओ मध्ये पाण्याची बचत करा असा संदेश सुद्धा दिला आहे.


3 thoughts on “पाणी वाचवा भाग-२

 1. पाणी वाचवणे ही आज काळाचि गरज बनली आहे पण आपण आजही हया गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही,आपण फ़क्त बोलतो आणी विसरून जातो.याचे दुष्पारिणाम आपल्याला पुढे पाहावे लागणार आहेतच…असो मागे म.टा.मध्ये हया विषयावर लोकांच्या प्रतिक्रया मागवल्या होत्या तेव्हा दैनदीन जिवनातील खालील काही उपाय वाचाकानी सुचविले होते.

  *हाताला साबण लावत असताना नळ बंद ठेवावा
  *पाण्याच्या योग्य वापरासाठी फ्लश आणि शॉवरचा वापर बंद करायला हवा .
  *कपडे धुताना , भांडी घासताना नळ गरजेनुसार चालू ठेवावा.
  *पुरुषांनी दाढी/ब्रश करताना बेसीनमधल्या नळाऐवजी पाणी वापरताना भांड्याचा वापर करावा
  *गाड्या स्वच्छ करताना ओल्या फडक्याचा वापर करावा.
  *महिलांनी घराबाहेर पडताना सर्व नळ बंद आहेत याची खात्री करून घ्यावी . *सार्वजनिक ठिकाणी नळ वाहत असतील तर आपण स्वत:जाऊन ते बंद करावेत.
  *लहान मुलांना पिण्यासाठी पाणी देताना लहान भांड्याचा वापर करावा . *पाण्याच्या साठ्याची भांडी साफ करताना त्यामधील पाणी ओतून न देता त्याचा योग्य वापर करावा.
  * प्रत्येक खोलीला पाण्याचे मीटर बसवावेत .
  *हॉटेलमध्ये पाणी,चहा कॉफीसाठी कागदी कप द्यावेत,सामान्य सुक्या पदार्थांसाठी उदा.वडा,कटलेट,वेफर्स,सँडविच. पेपर डिशेस द्यावेत,वापरल्यावर फेकून देता येतील.विसळायला पाणी लागणारच नाही.

  Like

  • देवेंद्र, या विषयाच्या जाणीवेबद्दल आभार. तू म.टा.मधील दिलेल्या सर्व उपाय योजना आम्ही दररोज अंमलात आणतो. अगदी नळातून थेंब थेंब पाणी गळत असेल तरी ते आम्हाला चालत नाही.पण हि जाणीव सर्वांनी ठेवली तर फार मोठे सामाजिक कार्य घडेल. असो त्याच अपेक्षेने मी हि पोस्ट मालिका सुरु केली आहे.

   Like

  • देवेंद्र तू दिलेल्या टिप्स सर्वांनी अंमलात आणल्या तर किती बरे होईल नाही का? पण लक्षात कोण घेतो. 😦

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s