मला जग बघू द्या हो


त्याचं लग्न होऊन एव्हाना ६ महिने झाले होते. पण त्याला मुलाची हौस होती म्हणून तो बायकोच्या मागे लागला होता कि आता आपण मुल होवू द्यायला हरकत नाही. तिने नेहमी प्रमाणे नकारघंटा वाजविली. पण याने पिच्छा पुरविला. शेवटी ती तयार झाली पण तिने आग्रह धरला कि आपण आधी सल्ला घेवू आणि मग पुढच पाऊल टाकू. त्याने तीच एकूण घेतल. ( काय करणार बिचारा बायको पुढे कधी कोणाचे चालले आहे का कि त्याचे चालेल:)). ती म्हणाली,”माझी अशी कल्पना आहे कि जग फार पुढे गेलेले आहे. प्रत्येक मनुष्य फार शिक्षण घेऊन मोठ्या पोस्टवर नौकरी करतो.तर आपल्या बाळाने सुद्धा खूप शिकव आणि खूप मोठा माणूस व्हाव.” तो उत्तरला “हो ग तुझ बरोबर आहे.पण ते काही आपल्या हातात नाही. त्याचे इच्छे प्रमाणे होते सर्व.”
ती,”नाही तस काही नाही. हल्ली या बद्दल गर्भ संस्काराचे प्रशिक्षण दिले जाते. आजच मी एक बातमी वाचली गुजरात मध्ये सुपर चाईल्ड विद्यापीठाची स्थापना केली आहे. आपण तेथे जाऊन सल्ला घेऊ.”
“अग काही तरीच काय असे कोठे होते काय.?”
“का नाही होऊ शकत? अभिमन्यू नाही का आईच्या गर्भातून शिकून आला होता.”
“बर बर आपण जाऊ तेथे पुढच्या आठवड्यात बर का.”
एकदाचे ते गुजरातला पोहचले आणि त्यांनी सल्ला घेतलाही. आणि पुढच्या प्लानिंग ला लागले. काही दिवसांनी तिने त्याला गोड बातमी दिली. तो खुश झाला. त्यांचे दिवस आनंदात जाऊ लागले. चार महिने झाले होते कदाचित आणि एके दिवशी त्याच्या मनात काय आले माहित नाही. त्याने तिच्या कडे शंका उपस्थित केली.
“अग मी काय म्हणतो आपल्याला मुलगा न होता मुलगी झाली तर. ”
त्याच्या ह्या शंकेमुळे ती इतकी नाराज झाली कि १५ मिनिट त्याच्या कडे हि बघितले. तिला जणू शॉकच बसला. त्याने परत परत विचारे पण ती बोललीच नाही. जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा तिने त्याला चांगलेच फैलावर घेतले बिचाऱ्याला. त्याची शंका तशी अवाजवी नव्हती पण तिला ती पटली नव्हती. सवती दोघांनी असा विचार केला कि आपण गर्भलिंग तपासणी करून घेऊ. पण त्याला ते पटले नाही. “तुला माहित आहे का शासनाने ह्या तपासणी वर बंदी आणलेली आहे.”
“मग आता काय करावे.” तिने विचारले.बघू मी विचार करून मार्ग शोधतो. तो काय मार्ग शोधणार हे तर देवच जाणे. पण तिची समजूत घालावी म्हणून त्याने काही तरी ठोकून दिले. ठोकून तर दिले मात्र आता त्याची चिंता वाढली.काय करावे हेच त्याला समजेना. त्याच्या विचार शक्तीच्या पलीकडचा विषय होता हा. जेव्हा त्याची बुद्धी खुंटली तेव्हा तो सरळ झोपी गेला.
दुसर्या रात्री पुनः तिने त्याला प्रश्न केला. मग त्याने पुनः डोके खाजवायला सुरुवात केली. अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला व तो म्हणाल”अग आपण आपल्या डॉक्टरांना विचारू या कि.”

आणि ते दोघे लगेच डॉक्टरांकडे निघाले. डॉक्टरांकडे गर्दी असल्याने ते वाट बघत बसले होते. काही तरी चला करावा म्हणून त्याने एक पुस्तक हातात घेतले. नेमके ते पुस्तक गर्भ लिंग तपासणी बाबतच होते. त्याने ते वाचले. वाचत असतांना त्यांचा नंबर आला. व ते डॉक्टरांकडे गेले.
डॉक्टरांनी त्यांचे स्वागत केले आणि काही त्रास होत आहे का वहिनींना असे विचारले. “नाही डॉक्टर त्रास काहीच नाही. मी अगदी व्यवस्थित आहे.”

क्रमशः

2 thoughts on “मला जग बघू द्या हो

  1. औरंगाबादला माझ्या बहिणीच्या मैत्रीणीने हे करुन घेतलं होतं आणि मग काय कॉम्ल्पिकेशन झाले ते कळलंच नाही, आणि तिला ताबडतोब पुण्याला न्यावं लागलं. उरलेले सहा महिने बेड रेस्ट होती मग… !अतिशय डेंजरस प्रकार आहे हा.

    Like

    • बाप रे मला हे माहितच नव्हत. कधी एकले नव्हते या बद्दल. हे करण्यापेक्षा त्या काळात मनात चांगले विचार, च्नागले वाचत केले तर चागले मुल जन्माला येऊ शकते नाही का?

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s