सध्या बायो टेक्नोलॉजी व माइक्रोबायोलोजी चे जग आहे. या दोन्ही शाखांचे प्रस्थ वाढत चालले आहे. मार्केट मध्ये बी.टी. वांगी येऊ घातली आहेत. सध्या भाज्यांपुरते मर्यादित असलेले हे क्षेत्र पुढे माणसापर्यंत गेले तर काय गजब होईल याची कल्पना मी या कथेत मांडत आहे. हि फक्त माझी परिकल्पना आहे हे कृपया लक्ष्यात ठेवावे.
आज त्यांचे बाळ तीन महिन्यांचे झाले. आता तिला चिंता वाटत आहे ती पुढच्या महिन्याची. पुढील महिन्यात तिची सुटी संपणार आहे. तिला कामावर हजार व्हावे लागणार आहे. मग बाळाचा सांभाळ कोण करेल हीच चिंता सध्या तिच्या मनात घोळत आहे. तिने आपली चिंता नवऱ्याच्या कानावर घातली आणि त्याने एखादी बाई शोध म्हणून सल्ला दिला व विसरून गेला. त्याला कसे समजावणार कि बाई शोधणे इतके सोपे राहिले आहे का? हे २००९ सन नाही हे आहे २०२०. बाईला पगार द्यायचा म्हणजे महाकठीण काम आहे. त्यांचा पगार प्रचंड झाला आहे. खरच आहे महागाई किती आहे. त्या बिचाऱ्या काय करतील. त्यामानाने आपला पगार हि केव्हढा वाढला आहे. एके काळी तिचा पगार होता. रु. ५०,०००/- आज तिला वर्षाला १२ लाख पगार मिळत आहे. त्याचा पगार रु.२० लाखाच्या घरात आहे. बाजारात भाजी पाला घ्यायला जायचे म्हणजे कमीत कमीत रु.१०००/- न्यावे लागतात. काय करावे हीच चिंता तिला आता सतावत आहे. अस करून १० दिवस निघून गेले. ह्या १० दिवसात तिच्या हाती काहीच लागले नाही. तिची चिंता आहे त्याच ठिकाणी आहे. दोघे नवराबायको चिंतेत आतुर गप्पा बसून आहेत. बाळ पलंगावर खेळत आहे.
आणि अचानक कोणी तरी त्यांच्या घरी येत आहे असे त्यांना दारावर बसविलेल्या केमार्यावरून घरातील स्क्रीनवर दिसून आले. त्यांनी रिमोट कंट्रोल ने क्लोस उप घेऊन बघितला तर तो त्याचा बालपणाचा मित्र समीर होता. त्याने बसल्या बसल्या रिमोटचे बटन दाबले आणि घराचे मुख्य द्वार उघडले गेले. त्यातून समीरचे घरात आगमन झाले. समीर आल्याबरोबर तो जागेवरून उठला आणि त्याचे स्वागत केले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसून येत होती. ती तर उठलीच नाही. समीरने ओळखले कि हे दोघे काही तरी गंभीर चिंतेत आहेत. थोडा वेळ तो शांत बसला.
शेवटी समीरने वाचा फोडली. तो म्हणाला ” अरे काय झाले तुम्हा दोघांना. असे शांत का बसले आहात. आता तुम्ही दोनाचे तीन झाले आहात. आता तर आनंदाने जगायला हवे.” त्याचे पुढील प्रश्न येऊन आढळू नये म्हणून तो मधेच बोलला . “काही नाही रे असेच थोडेसे.”
पण समीर हे कोठे मानणार होता. या आधी जेव्हा जेव्हा समीर आला होता ते दोघे किती आनंदाने त्याचे स्वागत करीत होते. त्यामुळे तो परत म्हणाला “अहो वाहिनी तुम्ही सांगा काय झाले आहे ते?”
क्रमशः