हपापलेला च्या पुढचा भाग येथे सादर करीत आहे.
तिने सांगितलेली गोड बातमी ऐकल्यावर तो अत्त्यानंदित झाला. डिलिवरी पूर्वी तिने रजा घेतली होती. ठरलेल्या वेळेनुसार तिने एका गुबगुबित बाळाला जन्म दिला. दोघेही बाळाला बघून आनंदित झाले. त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आणि बघता बघता दोन महिने सहज निघून गेले. तिची चिंता आता वाढत चालली होती. पुढे काय करावे आपण कामावर गेल्या वर बाळाचा सांभाळ कोण करणार हि चिंता तिला अस्वस्थ करीत होती. एके दिवशी तिने त्याला सांगितले ” हे बघ गणेश आता पुढच्या सोमवार पासून मला कामावर जावे लागणार आहे.”
“अरे हो मी तर विसरलोच होतो.”गणेश
” विसरून कसे चालेल.पण वास्तविकता हीच आहे. आपल्याला आता बाळासाठी काही तरी व्यवस्था करावी लागेल.”गणेश विचार करू लागला.
विचार करता करता तो अचानक तिला म्हणाला ” मी काय म्हणतो मीनल, आपण माझ्या आई वडिलांना आपल्याकडे घेऊन आलो तर ते बाळाचा सांभाळ व्यवस्थित करू शकतील असे तुला नाही का वाटत.” यावर मीनल थोडी नाराजीनेच म्हणाली,” तुझ बरोबर आहे रे. पण ती दोघे अनाडी. शहराची त्यांना काही हि माहिती नाही. ते येथे येऊन काय करतील.”
“तरी पण आपण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे.”
“नाही मला अजिबात हे पटलेलं नाही. तू त्यां गावरान लोकांना येथे आणायचे नाही समजल का तुला.” ती जवळ जवळ ओरडलीच. बिच्चारा काय करणार. चिडीचूप. एक शब्द हि तोंडातून उच्चारला नाही. त्याचा चेहरा बघून तिलाच त्याची कीव आली. तिने पुनः बोलायला सुरुवात केली.” अरे तुझे ते अनाडी आई-वडील माझ्या बाळाचा काय सांभाळ करू शकतील. आणि बाळाच्या मनावर काय संस्कार होतील. तुला माहित आहे मुलांना लहानपणा पासून चांगले संस्कार दिले तर मुल चांगली तरक्की करतात. आपण अस करू एक चांगली आया बघू. ती बाळाचा चांगला सांभाळ करेल.”
तो बिच्चारा मन मारून गप्पा बसला आणि तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून आया बद्दल माहिती विचारायला लागलीच सुरुवात करून टाकली.मैत्रीनिन्न्कडून तिला काही बायकांचे रीफरेंस मिळाले. “उद्या तुला सुटी आहे त्यामुळे ती घरी बाळा जवळ थांबायचं मी आया बाईचा शोध घेयून येईल. ठीक आहे न.”
तिने दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आया बाईचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि एका बाईला पक्के करून टाकले. काय द्यायचे घ्यायचे सर्व ठरवून टाकले. सायंकाळी तिला घरी यायच्या सूचना हि दिल्या. ती आया ठरलेल्या वेळी घरी आली. तिला मीनल ने सर्व घर दाखविले. कामाचे स्वरूप सांगितले. दिवस भर तिने काय काय करायचे हे सांगितले. आणि ओळख व्हावी म्हणून काही वेळ बाळाला तिच्या कडे दिल सुद्धा. तिने सुद्धा बाळाला लडा लावायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर ८ वाजता आया कामावर हजर झाली. तिला बघून मीनल ला आनद झाला.”बरे झाले मावशी तू आलीस ते. आता मी कामावर निश्चिंतपने जाऊ शकते.” मीनल आयाला म्हणाली. गणेशला त्या आयाचे घरी येणे अजिबात पटत नव्हते पण त्याचा नाइलाज होता. आपल्या लाडक्या बाळाला एका पर स्त्री कडे सोपवून आपण रोज कामावर जाणे हे त्याच्या मनातील एका कोपऱ्यात ठसलेल्या गावठी विचारांना पटत नव्हते. त्याचे मन रडकुंडीला आले होते. पण पुरुष होता तो. असा कसा रडू शकेल.
क्रमशः
पुढील भागाच्या प्रतीक्षेत ।
LikeLike
मी आपल्या कॉमेंट ची खूप दिवसांनी वाट बघत आहे. आपण माझ्या ब्लोग ला भेट दिली आबाद्दल मी आपला आभारी आहे. कृपया माझ्या इतर ब्लोग ला सुद्धा भेट दिली तर बरे वाटेल.
Kuch Pal ( Hindi) http://ravindrakoshti.blogspot.com
My Blog(English) http://ownpoems.wordpress.com
LikeLike