प्रतिक्षा


काल  अचानक वातावरणात बदल दिसायला लागला. बघता बघता आकाशात काळे ढग जमा व्हायला लागले. आणि सूर्य त्या काळ्या ढगांमागे लपून डोकावू लागला. ढगांचे ते रूप माझ्या मनाला खूप विलोभनीय वाटले आणि मी आपल्या मोबाईलच्या केमेऱ्यात आपल्या घराच्या टेरेस वरूनच ते दृश्य कैद करून घेतले. आज चे वातावरण पाहून तर हा महिना जुलाई चालू आहे कि काय असे दिवस भर वाटत आहे. घरी असल्याने काही बाहेरची खाजगी कामं  करावी असे वाटत होते. पण वातावरणामुळे कोठे हि जायची इच्छा झाली नाही. पण ती काळ काढलेली फोटो मला पोस्त वर टाकायची होती. मग कशी टाकावी हा विचार करीत असतांना एक विरह रसाची कविता सुचली. आणि झाले कविता हि झाली आणि फोटो हि टाकले. बघा आणि, कसे वाटले ते अवश्य कळवा.badal3

प्रतिक्षा

“आज अचानक या वातावरणात बदल कसा झाला

काल पर्यंत रखरखत्या उन्हाने चकाकणाऱ्या

त्या पांढरया  शुभ्र ढगांमध्ये

अचानक हा बदलाव कसा आला.

मी हैराण आहे वातावरणातील हा बदल बघून

आणि मला प्रतीक्षा आहे तुझ्यात

असा अचानक बदल होण्याची

येशील का रे तू परत

असाच अचानक या ढगांसारखा

पळत माझ्या कडे येशील का?

सरड्यासारखा रंग बदलणाऱ्या या ढगांसारखा

तू हि रंग बदलशील का रे एक वेळा

फक्त एक वेळा येशील का रे?

आणि मला समजून घेशील का रे?

येशील का रे तू?IMG1923A

badal2

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s