फायान चा भूत


परवा मी “माझ्या मना” वर “पाणी वाचवा मोहीम” उघडली.त्यासाठी एक पोल सुद्धा दिली आहे. त्यावर ३ दिवसात फक्त ५ ब्लॉगर्सनी वोट केल आहे हा विषय वेगळा. पण मी ती मोहीम उघडली आणि सायंकाळ पासून आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. चला पाण्याची थोडी का होईना काळजी कमी झाली. आज टी. व्ही. च्या जवळ जवळ सर्वच चेनल वाल्यांनी एकच विषय घेतलेला दिसला आणि तो होता फायान नावाच्या वादळाचा. आपल्याकडे सुद्धा आता वादळांना नाव द्यायला सुरुवात झालेली आहे. पण हे नाव कसे दिले जाते याबद्दल मला अद्याप कळलेले नाही. तसे आपल्याकडे फारसे वादाला येत नाहीत वेस्टर्न कंट्री सारखी. त्यामुळे तशी काही गरज नव्हती असे मला तरी वाटते. उगाचच नाव दिल्याने सतत वादळ येऊ नये म्हणून म्हणतो. आज सकाळ पासून आम्ही घरातील सर्व म्हणजे तिघे टी.व्ही.ला चीपकुनच

बसलो होतो. (अर्थात जितका वेळ लाईट होती तितका वेळच.) प्रत्येक चेनल वर फायान चेच कवरेज. कोणी म्हणतो मुंबई पासून ३५० किलोमीटर वर आहे ते वादळ. कोणी सांगतो २५० किलोमीटर वर आहे. सर्व न्यूज चेनल वाल्यांनी इतका भडीमार केला होता कि त्या बातम्या बघूनच धडकी भरायची. नाशिक मध्ये राहत असून हि बाहेर थोडा जरीं वारा सुरु झाल्याचे झाड हलल्याने जाणवले कि धस्स व्हायचं. बायको तर म्हणायची अंगावर कांटे येतात बातमी ऐकून. जितकी भीती वादळाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन येणार नाही त्या पेक्षा जास्त भीती त्या बातम्या बघून वाटते. दुपारी चार वाजता लोड शेडींग झाले आणि टी.व्ही. आणि काम्पुटर हि बंद त्यामुळे बातमी कळेना. मग मोबाईलवर एफ.एम.रेडिओवर काही बातमी कळते का म्हणून शोधाशोध केली पण त्या बिच्यार्यांनी काहीच कव्हर केले नाही. तो पर्यंत बाहेर बऱ्यापैकी वारा सुरु झाला.आणि मनात जास्त धडकी भरायला लागली. मध्येच थोडावेळ १०-१५ मिनिटा साठी पवार आली होती. तेव्हा बघितले तर एका हि चेनल वर बातमी नाही. एका चेनल वर ओझरते बघितले कि वादळ शमले.

या वादळावरून मला लहान असतांना बघितलेली वादळ  आठवली. मी तेव्हा ५वी -६ वी मध्ये असेल. आम्ही नेपानगर या मध्यप्रदेशातील एका टाऊनशिप मध्ये राहत होतो. त्या गावच्या चहू बाजूंनी तेव्हा घनदाट जंगल होते. त्यामुळे सहसा रोजच वारे सुटायचे. त्याचे आम्हाला काही विशेष वाटत नसे. पण एके दिवशी सायंकाळी अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला आणि सोबत वादळ ही आले. वादळ एव्हडे भयंकर होते कि गावातील प्रत्येकाला त्याचा त्रास सहन करावा लागला. प्रत्येकाचे काही ना काही नुकसान झाले होते. जिकडे तिकडे झाडांची पडझड झाली होती. जवळच एक बाग होती त्याबागेत खूप झाडे लावलेली होती. त्यामुळे रोज सायंकाळी त्या झाडांवर पोपट व चिमण्यांचीsparrows शाळा भरायची. हजारोने पक्षी त्या झाडांवर यायचे. आता तर पोपट कशाला म्हणतात हे चित्रावरून कळते. इतर sparrowपक्षी ही नजरेस पडत नाहीत. शहरातच काय गावांमध्ये ही पक्षी दिसत नाहीत. वादळ शमल्यावर आम्ही लहान मुल त्या बगीच्यात  गेलो. तर तेथे अक्षरशः सडा पडलेला दिसला पोपट आणि चिमण्यांचा. त्यातील काही पोपटparrots जिवंत होती. त्यांना काही लोकांनी घरी नेले. मी सुद्धा एक पोपट घरी आणला. तो बिचारा घायाळ झाला होता. कदाचित त्याच्या मनावर त्या वादळाचा आघात झाला असेल. दोन तीन दिवसांनी तो मेला. आम्ही त्याला जमिनीत पुरून त्याचे अंतिम संस्कार केले.
दुसर्या दिवशी समजले कि आमच्याच गावातील एका भागातील घराचे संपूर्ण छप्पर उडाले. वादळ आले त्यावेळी म्हणे घराच्या आसऱ्याला दोराचा झोका बांधलेला होता व त्यात एक लहान बाल झोपले होते आणि त्याला एक मुलगी ५-६ वर्ष्याची असेल झोका देत होती. वादळाने छप्पर,  झोका, त्यातील बाळ व झोका देणारी मुलगी सर्व  एकदमच उडाली. लांब जावून ते पडले. त्यातील फक्त झोक्यातील लहान बाळ वाचले असे समजले.
अशीच एक घटना मी बुऱ्हानपुरला  माझ्या भावाकडे होतो तेव्हा घडली होती. ती तर माझ्या घरीच घडली होती. एक  भयंकर वादळ आले होते त्या वेळी.. त्या वादळाने आम्ही म्हणजे माझे भाऊ राहत होते त्या संपूर्ण इमारतीचे ४०-५० पत्रांचे  छप्पर एकदम उडाले होते. उडून ते छप्पर आमच्या अगदी दारासमोर पडले माझ्या वाहिनी थोडक्यात बचावल्या होत्या.
सांगायचा तात्पर्य असा कि आता तसे जंगल, तसे पक्ष्यांचे थवे, पक्ष्यांच्या शाळा, तसा पाउस, तसा पूर आणि तसे वादळ ही राहिलेले नाही. गेले ते दिवस.पूर्वी सायंकाळी सर्व मुल अंगणात खेळायला जमा व्हायची तेव्हा आकाशात पोप्तांचे तसेच इतर चिमण्यांचे थवे च्या थवे उडतांना दिसायचे. आम्हाला खेळायला जास्त आवडत नसे तर ते  पक्ष्यांचे थवे बघून आनंद लुटत असू. आता असे उडणारे पक्षीच नजरेला पडत नाहीत.sparrows flyingflying

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s