ती भिकारीण मागच्या सीट वर बसून आनंदाने मनातल्या मनात उड्या मारीत होती. ती मीनल ला म्हणाली” बाई साहेब, तुम्हाला हे बाळ दत्तक घ्यायचे असेल तर घेऊन टाका मत्र मला काही तरी द्यावे लागेल.”
“ते ठीक आहे ग पण हे बाल तुझे नाही का? तुला त्रास नाही का होणार मला बाल देऊन टाकल्याने.” मीनल म्हणाली
“तास नाही मेडम. बाळ माझच आहे. पण घराची गरीब बाळाला काय खाऊ घालणार. तुम्ही घेतले तर चांगल शिकेल मोठा होईल तो.” ती भिकारीण उच्चारली.
” हो तुझ ही बरोबर आहे म्हणा. देईल मी तुला काही रक्कम हो. तू काळजी करू नको.”
आणि अश्या गोष्ठी करीत असतांना मीनल चे घर आले. तिने गाडी थांबविली आणि तिने त्या भिकारणीला मी सांगत नाही तो पर्यंत गाडीतच बसायच्या सूचना दिल्या. ती होकार देऊन गप्पा बसली.
तितक्यात घरातून आया आली. मेडम ला बघून ती घाबरली होती. ” मेडम तुम्ही या वेळी कशा काय आल्या ?”असे बोलत असतांना तिच्या चेहऱ्यावर चा घाम मीनल च्या नजरेतून सुटू शकला नाही. “काय ग तू असी घाबरलेली का आहेस. इतका घाम का सुटला आहे तुला?” असे मीनल ने विचारता क्षणी ती म्हाणाली” नाही मेडम कुठे काय मी तर ठीक आहे.” आणि ती आयला घेऊन घरात शिरली. तिला बसवले. आणि काही विसरल्यागत करून त्या आया बाईला म्हणाली “अग थांब मी गाडीत काही विसरले आहे ते घेऊन येते.आणि हो ते ठेऊन मी लगेच जाणार आहे बर का”
मीनल बाहेर आली आणि तिने गाडीचे दर उघडून बाळाला आणि भिकारणीला सोबत घेतले आणि घरात शिरली. घरात शिरल्यावर तिने घराचे दार आतून लावून घेतले. ती भिकारीण घर बघून मनो मन खुश होत होती. तिच्या जवळ बाळाला बघून ती आया तर वेडीच झाली. ती धाय्य मारून रडायला लागली. जावून मालकिणीच्या पायावर पडली व “मेडम माझ चुकल हो मला माफ करा” असे रडून रडून म्हणू लागली. इकडे त्या भिकारणीला काही कळेना काय चालले आहे ते. आता मीनल ने गणेशला फोन लावून ताबडतोब घरी बोलावून घेतले. आणि लगेच पोलीस स्टेशन ला फोन लावला व त्यांना ही घरी बोलावले.आता त्या भिकारीण ला काही गुन्हा केला आहे असे जाणवायला लागले. मीनल ने बाळाला जवळ घेऊन त्याची पप्पी घेतली आणि आतून त्याचे कपडे आणून घालायला लागली तेव्हा त्या भिकारणीच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती ही रडता रडता मीनल च्या पाया पडू लागली.
क्रमशः
रविंद्र हे कथानक वाचते आहे…( पेपरमध्ये अशीच एक सत्य घटना आल्याचे वाचले असे तुम्ही म्हटंले आहे ) बापरे! खरेच असे घडते आहे हे मन मानायलाच तयार नाही. पण दुर्दैवाने घडते आहेच. प्रकरण मीनलने अतिशय संयमाने व योग्य रितीने हाताळले हे पाहून खूप बरे वाटले.
(तुम्ही नाशिकचे का?)
LikeLike
धन्यवाद. महेंद्र ने म्हटल्या प्रमाणे कथा खूप रेंगाळली आहे. आता या भागात आटोपती घेतो. आणि हो हि कथा ती. वरील बातमी वर आधारित आहे. बेंगलोर व नाइडा( दिल्ली) येथे असे झाल्याचे बातम्यांमध्ये सांगितले आहे.बर नाशिक येथेच राहतो.आपण नाशिकचे च का? तन्वीचे माहेर नाशिकचे आहे. आपल्या गावचे कोणी भेटले तर किती बरे वाटते. 🙂
LikeLike