हपापलेला भाग-५


[हपापलेला भाग-1] [ हपापलेला भाग-2][ हपापलेला भाग-3] [ हपापलेला भाग-4]

एव्हाना त्या बिकारानीला समजून चुकले होते कि आपल्याकडील बाळ ह्या बाईचे आहे. मीनल ने त्या दोघींना घरातच डांबून ठेवले. आणि तिच्या कंपनीत फोन करून कामावर येणार नाही असे सांगितले. तो पर्यंत गणेश घरी आला होता. तो आल्याबरोबर तिने आपल्या आयचे प्रताप त्याच्या कडे कथन केले. थोड्यावेळातच पोलीस सुद्धा आले. त्यांनी पोलिसांना त्या आयचे व भिकारणीचे प्रताप सांगितले आणि पोलीस त्या दोघींना घेऊन गेली.
गणेशने आता आपले तोंड उघडले,”मीनल मला सुरुवाती पासूनच त्या आय कडे आपले बाळ ठेवावेसे वाटले नव्हते. पण तुझा हट्ट होता म्हणूनच मी होकार दिला.”
मीनल काय बोलणार गप्पा बसून राहिली. गणेश पुनः सुरु झाला. आज प्रथमच मिनलला गणेशचे एकूण घ्यावे लागले. आता पर्यंत तीच बोलत असायची आणि तो एकात असायचा.” मीनल मी तुला सुरवातीलाच माझ्या आई वडिलांना आपल्या कडे आणावे म्हणून म्हणत होतो. पण तू काय म्हणायचीस कि माझे ते गावंडळ आई वडील बाळाला काय संकर देतील. आता संग आपल्या बळावर काय संस्कार झाले ते. रोज तो तुझ्यापुढे भिक मागितल्या सारखा खाऊ मागतो. रस्त्यावर भिक मागतो. काय संस्कार होत आहेत आपल्या बळावर. बोल आता गप्पा का बसून आहेस?” तो जवळ जवळ खेकसलाच मीनल वर. :माझ चूक रे. मला काय माहित होते हि बाई असे प्रताप दाखवील ते.”मीनल मोठ्या मुश्किलीने खाली मन घालून बोलायला लागली.” पण गणेश तुला नाही वाटत तुझे आई वडील अनादी आहेत ते.”
“हो ग माझे आई वडील अनादी आहेत पण जीवापाड प्रेम करतील त्यांच्या नातवावर. त्यांचा एकुलता एक मुलगा व एकुलता एक नातू आणि इतकेच नाही तर एकुलती एक सून आहेस. एक लक्ष्यात घे मीनल आई वडील हे नेहमी आपल्या मुलांना जीवच लावतात. त्यांच्या इतके प्रेम जगात कोणीच देवू शकत नाही. उगाच आपल्या पुराणात आई वडिलांना देवाचा दर्जा दिलेला नाही. तूच नाही का तुझ्या बाळाला जीव लावत आहेस. विचार कर बाळ मोठ झाल्यावर तू त्याला प्रेम करणे सोडून का देणार आहेस.”
गणेश चे एकूण तिला बाळाचा कळवला आल आणि तिने त्याला आपल्या जवळ घेऊन प्रेम केले. तेव्हा बाळ तोडक्या भाषेत म्हणाला “आई ती बाई नाही का मला भिक मागायला लावत होती रस्त्यावर. आणि नाही केले तर मार द्यायची.”
मीनल ढसा ढसा रडायला लागली त्याच्या चिमुकल्या तोंडून हे शब्द ऐकून. आणि ती बाळाला म्हणू लागली, आता काळजी करू नको बाला तुझे आजी आजोबा येतील गावावरून तू त्यांच्या बरोबर राहा. ते तुला खूप प्रेम करतील बर का.” तिच्या तोंडून हे शब्द ऐकून गणेशला बरे वाटले. तो पुनः तिला म्हनला,”मीनल मला एकत्र कुटुंब पद्धत कायम आवडत होती. इतरांकडे आई, बाबा, काका, काकू, आजोबा, आजी, वहिनी अशी मंडळी बघून मला हि नेहमी त्याच आकर्षण वाटायचं. आग विचार कर जेव्हा सर्व एकत्र असतात तेव्हा तुझ्या सारखी स्त्री कामाला गेली तर बाळाला सांभाळायचा प्रश्नच येत नाही. शिवाय मुलांना सर्व नाती गोती कळतात. इतक्या लोकांचे प्रेम मिळते. त्यांना लहान पण पासून चांगले  संस्कार मिळतात. आजी आजोबा घर सांभाळतात. घरातली  एक जरी व्यक्ती  आजारी पडली तर सर्व धावून येतात. एकटे पण जाणवतच नाही. आज आपले एव्हडे मोठे घर आहे पैसा आहे सर्व सुख सोयी आहेत पण एकटे पणाचे शल्य जगू देत नाही ग. मी एकुलता एक असल्याने कायम एकता राहिलो आहे मला कोणाची तरी साथ हवी आहे. घरी आल्यावर आपली बायको आपली वाट बघत असेल का? असे वाटायला बायको घरी कोठे असते. मला पैस्याची खूप हौस होती. आयुष्य दारिद्रीत  घालवल्यामुळे मला पैस्याचा नशा चढला  होता. म्हणून मी तुझ्याची लग्न केले. नंतर मी विचार केला होता कि तुला नौकरी सोडायला सांगावे.पण तुझ्या करिअरच्या कल्पना ऐकून मन मारून गप्पा बसायचो. आता तुझ्या लक्ष्यात आले असेलच कि पैसा व करिअर हेच सर्व काही नसते आपल्या मुलांचे भविष्य घडविणे हि सुद्धा आपलींच जवाबदारी असते. माझ्या आई वडिलांनी नाही का माझे करिअर घडविले.”
मीनल त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. गणेश चा एक एक शब्द तिच्या हृदयावर मारा करीत होता. शेवटी ती म्हणाली “माझे  चुकले रे. मला माफ कर. आणि आता माझी तयारी आहे तुझ्या आई वडिलांना आणायची. तू लगेच जा गावी आणि त्यांना घेऊन ये मी त्यांची वाट बघत आहे. जा तू आताच्या आता जा आणि त्यांना उद्याच घेऊन ये.” आणि गणेश लगेच तयारीला लागला.(इति).

2 thoughts on “हपापलेला भाग-५

 1. Tumchi blog varil batmi vachli man bharun aale dolyatun Bhara bhara dhara nighayla laglya 😦 yaat join kutuba badelch mhatv patwun denyat aale aahe. Te kharch aahe mhana Join kutumb asle ki bare aste. pan mala ethe vicharavese vatte ki hya news prmane kay saglech mulga, sun ashi vagtat ka??? nahi saglich mulga sun ashi nastat, kay kharch sasu sasre sune la samjwun ghenari astat nahi nastat :(( mi vicharte saglech aayi vadil aaple gavon sodun yayla tayar astaat ka??? nahiiii hi lok tayarch nahi gavon sodun city t yayla tar ka mhanun nehmich sunela dosh denyat yeto???

  Like

  • तुमचे मन दुखले या बद्दल मला फार वाईट वाटते आहे. 😦 प्रत्येक सून अशी नसते आणि प्रत्येक सासू हि अशी नसते. पण अपवाद असतातच. मी टी.व्ही वर एक बातमी बघितली होती.त्याबद्दल मी भाग एक मध्ये नमूद केले आहेच. ती बातमी म्हणून टाकता येत नाही त्यामुळे एक गोष्ठ तयार केली इतकेच. कल्पना माझ्या मनाच्या आहेत. तुमच मन दुखावल्याबद्दल पुनः दिलगिरी व्यक्त करतो. 😦
   हो तुम्ही पुढे म्हटले आहे कि सासू सासरे शहरात येत नाहीत. हे अगदी खरे आहे. माझे आई वडील सुद्धा असाच त्रास देत. वडील माझ्याकडेच असतांनाच गेले. आई आता गावी असते मोठ्या भावाकडे. गम्मत म्हणजे माझ्या कडे शहरात राहिले कि त्यांची प्रकृती कायम खराब असते आणि गावी गेले कि थांथानीत होतात. यावरून त्यांना शहराचे वावडे असते हेच सिद्ध होते.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s