सी.एफ.एल.


आजची माझी १०१ वी पोस्ट सादर करतांना मला फार आनंद होत आहे. (२० आगस्ट २००९ रोजी  मी पहिली पोस्ट टाकली होती.)  ह्या निमित्त  मी आताच आमचा संवाद सुरु असतांना झालेला एक जोंक येथे टाकत आहे.
झाले असे कि बाथरूम मधील ५ वाट चा  IMG1983Aसी.एफ.एल. बल्ब  बंद पडला. मी बटन लूज  आहे का ते बघितले. बटन लुजच होते. “बटन लूज असल्याने बल्ब  लवकर खराब झाला असे मी म्हणालो” आणि  दुसरा एक लेम्प लावला. त्यावर मुलगी म्हणाली “मी तुम्हाला किती दिवसापासून म्हणत होते कि बटन लूज झाले आहे ते बदला. पण तुम्ही माझे ऐकत नव्हते”. हे ऐकून सौ. मुलीला एकदम म्हणाल्या “तेव्हा आमचे बटन लूस होते ना”. हे एकता बरोबर आम्ही सर्व जोरजोराने हसलो.
IMG1982Aसी. एफ. एल. वरून मला एक नमूद करावेसे वाटत आहे कि मी घरामध्ये बहुतेक सी. एफ. एल. चे बल्ब लावले आहे.  प्रत्येक रूम मध्ये एक सी. एफ. एल. आणि एक ट्यूब असे दोन बल्ब लावलेले आहेत. वाचन करायचे असते तेव्हा ट्यूब लावतो. नसल्यास फक्त सी. एफ. एल. ज्या रूम मध्ये आम्ही असतो त्याच रूम मध्ये उजेड ठेवतो. त्याने एनर्जी सेव होते आणि बिल पण कमी येते. म्हणजे आपला हि फायदा आणि वीज कंपनीला ताण कमी.

आता योगायोगाने विषयच निघाला आहे तर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे  थोडीसी माहिती द्यावीशी मला वाटत आहे. विचेची बचत करणे आज आपल्या महाराष्ट्रात व देशात हि फार गरजेचे होऊन गेले आहे. आपण पूर्वी पिवळा प्रकाश देणारे गोळे वापरायचो. ४० वाट चा एक गोळा/ दिवा सतत २५ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज जळते. आणि १८ वाट चा सी.एफ.एल. दिवा ५५ तास सुरु राहिला तर एक युनिट वीज जळते. या पेक्षा चांगला किंवा जास्त प्रकाश देणारा २३ वाट चा सी.एफ.एल. चा दिवा सतत ४३ तास सुरु ठेवला तर एक युनिट वीज खर्च  होते. तसेच ४० वाट ची ट्यूब + त्याचे चोक मिळून ऐकून सुमारे ५५ वाट होतात. अशी एक ट्यूब १८-१९ तास चालल्यावर एक युनिट वीज खर्च  होते. यावरून स्पष्टपणे दिसून येते कि कोणता बल्ब वापरणे जास्त चांगले, कमी बिल देणारे आहे.

4 thoughts on “सी.एफ.एल.

    • धन्यवाद .
      मी आताच तुमच्या ब्लोग ला भेट दिली. खूपच छान आहे. कोमेंत टाकायचा प्रयत्न केला पण टाकू शकलो नाही.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s