खुंटलेली वाढ


बऱ्याच वेळा असे दिसून आले कि मी काम्पुटर वर बसलेलो असतांना सौ. जवळ येते आणि माझे डाव्या हाताचे बोट हातात घेऊन बघते. पहिल्यांदा मी त्याकडे दुर्लक्ष केले वाटले सहज बघितले असेल. दुसर्यांदा दोन तीन दिवसांनी तसेच केले तेव्हा मला वाटले तिने प्रेमाने हात हातात घेतला असेल कदाचित असा विचार करून पुनः दुर्लक्ष्य केले. काही दिवसांनी पुनः तेच बोट हातात धरले तेव्हा मी खुश झालो मनोमन हसायला खिदळायला लागलो, हल्ली सूर्य पश्चिमेला उगवत आहे कि काय असे वाटायला लागले. पण मी मनातल्या भावना मनातच ठेवल्या. म्हटल उगाच बोललो तर जे खरे खोटे प्रेम आहे ते सुद्धा कमी होऊन जाईल. पण आज सौ. ने पुनः तेच केल्यावर माझ्या कडून राहवले गेले नाही. मी लगेच तिचा हात धरला आणि विचारले कि हल्ली काय चालले आहे तू नेहमी माझा हाताचे बोट हातात घेऊन काय पाहतेस. तर ती म्हणाली तुमच्या डाव्या हाताच्या तर्जनी वर निवडणुकीच्या वेळी जी स्याही लावली होती ती अजून खूपच मागे आहे. माझ्या बोटावरील स्याही तर आता निघायला आली आहे. तिचे म्हणणे होते कि ती स्याही काही केल्या निघत नाही पण जस जसे नख वाढते तस तसे त्या श्याहीचे चिन्ह पुढे पुढे सरकत जाते. आणि बाहेर पडत जाते. मी लगेच उत्तर दिले  तुझे वाढते वय आहे.

माझे बोट

म्हणून नख लवकर वाढत आहे. माझी वाढ खुंटलेली आहे म्हणून वेळ जास्त लागत आहे. हे ऐकून मुलगी सुद्धा

सौ.चे बोट

हसायला लागली.

त्रिकोणी कुटुंब म्हणजे जीवघेणी कसरत असते असे मला तरी वाटते. तिघांचे ते लहानसे जग असते. मुलगी बरोबरीच कोणी नाही म्हणून एकटेपणात जगते. विरंगुळा म्हणून नेत वर बसून नेत च्या जगात वावरते. बायको दिवसभर घरात एकटी असते. मुलगी नेत बसल्यावर तिला बोलायला कोणी नसते. त्यांची ही ओढाताण बघून मला फार वाईट वाटते म्हणू सायंकाळी घरी आल्यावर त्यांच्या सोबत गमती जमाती कराव्या लागतात. सोबत टी.व्ही. बघणे आलेच. सब टी.व्ही. वरची “तारक मेहता का उलटा चष्मा” ही आमची तिघांची आवडती कॉमेडी सीरिअल. ती एक दिवस सुद्धा चुकवत नाही. ९ वाजता बिग बॉस बघायचे नसते तरी ही त्यांच्या सोबत अधून मधून बसावे लागते. त्यामुळे ब्लॉग वर बसायला रात्रीचे ११ तरी होतात. त्यानंतर किती वेळ बसणार हे माहित नसते.

4 thoughts on “खुंटलेली वाढ

    • Hi Akhilesh are he sope aahe. tu ek kam kar admin madhye ja. davya hatala polls ase disel. tyavar click kelyavar add poll disel. Punah tyavar click kelyavar khali prakarche options distat. HTML code var click kele ki ek code disto to widget box madhye takava. zale. Bagh karun aani kalav mala. ho tuza blog aavadala bar ka.
      संपादन | Results | काढून टाका | बंद करा | प्रिव्ह्यू | HTML code

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s