झाडे वाचवा झाडे


मित्रांनो सध्या ग्लोबल वार्मिंग हा एकच विषय जगभरात जास्त चर्चिला जात  आहे. जगभरात त्यावर परिषदा भरवल्या जात आहेत. पण सामान्य मनुष्य ह्या चर्चेत नसतो. माझ्या मते खरी गरज आहे ती सामान्य माणसाला ह्या विषयाची जाणीव करून द्यायची. आज जंगल खूप कमी झालेले आहे. जंगल असेल तर तेथे झाड दिसत नाहीत. झाड जी दिवसा माणसाने स्वासने सोडलेली कार्बन डाय ओक्साइड घेतात  आणि रात्रीच्या वेळी आपल्याला ऑक्सिजन देतात. त्याच झाडांचे आपण पालन करीत नाही. निसर्गाने जगात जितक्या वस्तू, झाडे तयार केली आहेत त्यांचा मानवाला उपयोग आहेच. विचार करा जर पृथ्वी वरील झाड संपली तर काय अनर्थ होईल. आपल्याला ऑक्सिजन कोठून मिळेल. आपण गुदमरून मारू. पाऊस येणार नाही. मग आपल्याला पाणी कोठून मिळेल. निसर्गाने हे एक चक्र तयार केले आहे. त्यामुळे  पृथ्वी वर प्रत्येकाची गरज आहेच. म्हणून झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
रस्ता रुंदीकरण करण्यासाठी झाडांची कत्तल केली जाते. मी म्हणतो त्या झाडांचे पुनरुथान करायला काय हरकत आहे. रस्त्यात अडथला आलेल्या झाडाला त्या जागेवरून उपटून दुसर्या जागेवर लावता येईल. आणि ते जगेल सुद्धा. समजा तसे नाही करता आले तर त्याच्या कलाम तयार करून जागोजागी लावता येतील. मी स्वतः वडाच्या झाडाची कलम लावली होती व ती जगली सुद्धा. हे खरे आहे कि त्याला मोठे व्हायला उशीर लागतो. मी

मी लावलेल्या वडाच्या झाडाच्या कलमचे आता मोठ्या झाडात रुपांतर झाले आहे. हेच ते झाड.

लावलेल्या वडाच्या झाडाला साधारणपणे ४-५ वर्षे झाली असावीत. आज ते खूप मोठे झाले आहे. त्याचा आजचा फोटो मी येथे देत आहे. मला त्या झाडाला बघून खूप आनदहोतो. पण कालांतराने ते झाड मोठे झाल्यावर आपल्याला सावली देते. मला वाटते स्थानिक स्वराज्य संस्थांनी असा एक

नियम करून टाकायला पाहिजे कि प्रत्येक माणसाने त्याच्या राहत्या घरासमोर किंवा त्याला शक्य होईल त्या जागेवर एक तरी झाड लावायला पाहिजे. व त्याचे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. त्या झाडाला त्याचे नाव द्यायला पाहिजे. त्याचे रक्षण केले जात आहे कि नाही त्यासाठी कोणाला नेमून दिले पाहिजे. किंवा माझी तपासणी तिसऱ्याने करायची व त्याची तपासणी इतर जवळच्या माणसाने करायची. म्हणजे एक दुसर्याची चेकिंग करणे. याहून सोपे म्हणजे प्रत्येक परिसरात एक झाडे लावा संघ तयार करायचा त्याचे रजिस्ट्रेशन करायचे. १० लाख लोकांपैकी २५ टक्के लोकांनी सुद्धा इमानदारीने सामाजिक जाणीव म्हणून हे काम केले तर शहरात झाडेच झाडे दिसतील.
तसेच कागद बनविण्यासाठी झाडांचा उपयोग केला जातो. आजच काय वाटेल ते या महेंद्र जींच्या ब्लोगवर त्यांनी एक पोस्ट टाकलेली दिसली ” पेपरलेस “. पेपरचा दुरुपयोग खूप होतो. आपण मसुदा तयार करण्या साठी सुद्धा कागदाचा खूप वापर करतो. मला वाटते आता बहुतेकांकडे काम्पुटर आहेत. इंटरनेट स्वस्त झाले आहे. त्यामुळे बहुतेक सुशिक्षितांनी वर्तमान पत्र नेटवर वाचले तर किती तरी झाड वाचतील व आपली जंगल झाडांनी गजबजूनजातील. आजच आपण या विषयावर विचार केला  तर ठीक नाही केला तर कदाचित आपल्या भावी पिढीला अशी झाडे पहावी लागतील.

10 thoughts on “झाडे वाचवा झाडे

 1. आपल्या इथे फक्त झाडे लावण्याचा कार्यक्रम होतो …
  तो ही पपेर मध्ये फोटो यावा यासाठीच ………

  नंतर त्या रोपांचे काय होते कुणी बघायला पण जात नाही ..
  आपण रोपाला स्वताचे अपत्य समजून वाढवले तर निसर्ग पुन्हा बहरू लागेल …….
  नाहीतर त्याचा करिष्मा तो सुनामी , फायान अशा गोष्टीनी दाखवीत असतो
  आणि समतोल साधायचा प्रयत्न करतोच ………
  नाही का?

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s