रेअर फ्लावर्स

जगात परमेश्वराने जशी विवध प्रकारची मानस बनविली आहे तश्याच  विविध प्रकारच्या इअतर जीवित व मृत वस्तू सुद्धा बनविल्या आहेत. फुल हे डोळ्याला आनंद देणारे मनभावन असे असते. विविध रंग, विविध रूप असणारे असे फुल हे त्या ईश्वराने दिलेली देणगीच म्हणावे लागेल. जगात आपल्याला  कमीच सापडणाऱ्या फुलांची चित्र येथे देत आहे.  www.funonthenet.in या वेब साईट वर सापडली आहेत. त्याची लिंक येथे देत आहे. या वेब साईट वर रजिस्टर केल्यास अशी विशिष्ट माहिती आपल्याला हवी असेल नसेल तरी ही ते पाठवीत राहतात. आपण सुद्धा पाहावे व मन मोहूनघ्यावे.

Blue-Bell-Tunicate

Flower Power

Luscious Lotus

Orchid in the Blue

passion flower

Purple Foxglove

एक प्रगत विध्वंस

आज मी एक वेगळा विषय आपणापुढे सादर करीत आहे. यु ट्यूब वर विध्वन्सावरील व्हिदिओ सापडले. त्यातील एक येथे देत आहे. मोठ मोठ्या इमारती क्षणात पाडण्याचा विक्रम केला जातो. त्या  का पडल्या जातात हा वेगळा विषय आहे. पण कशा व किती कुशलतेने पाडल्या जातात हे येथे महत्वाचे आहे. या व्ही. दि. ओ मध्ये आपल्या निदर्शनास येईल की या पाडल्या गेलेल्या इमारती क्षणार्धात जमीन-दोस्त झाल्या. वर्टीकली खाली बसल्या. इतक्या सहजतेने खाली बसल्या की शेजारील इमारती व झाडांना धक्का सुद्धा लागला नाही. त्यामुळे ही एक प्रगत कला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
योग योग म्हणजे ही पोस्ट लिहिल्यावर पोस्ट करण्यासाठी वर्ड प्रेस वर गेलो तर मला  “ये रे मना ये रे मना” ह्या पेठे काकांच्या ब्लॉगवर  मॉडेलिंग ( इमारतींचे हो 🙂 ) हाच विषय दिसला.

या विशिष्ट कामासाठी साठी स्कील ची गरज आहे. विशेष म्हणजे तिकडे या कामासाठी. Controlled Demolition, Inc. |  या नावाची कंपनी सुद्धा आहे.मला प्रश्न पडला की या इमारती दिसायला छान आहेत मग का पाडल्या गेल्या असाव्यात डोकं बिकं फिरलं असेल की काय त्या लोकांचे.याचा शोध घेत घेत मी पोहोचलो विकीपेडियावर. तेथे तर इमारती पडल्याची भली मोठी यादीच सापडली. त्यावरून लक्षात आले की ह्या सर्व इमारती जुन्या झाल्या होत्या. १९६०-६५ दरम्यानच्या होत्या. पण प्रश्न हा पडतो की ४०-५० वर्ष वय झालेल्या इमारती पडण्याची काय गरज. आपल्याकडे अशा इमारती पडणे ऐकीवात नाही. आपल्याकडील मुंबई मधील शंभर वर्ष जुन्या इमारती सुद्धा पडल्या जात नाहीत. जो पर्यंत स्वतः ते घर पडत नाही तो पर्यंत आपण ते पाडत नाही. आणि खरे सांगायचे झाले तर आपल्याला घर पडणे परवडणारे नाही.

यंत्र मानव

पूर्वी आपल्याकडे रस्त्याचे काम सुरु असतांना जागो जागी गरीब मजूर काम करीत असल्याचे चित्र दिसत असे.  ते कामगार बहुतेक आंध्रप्रदेश मधील असायचे. आज चित्र पालटले आहे. ती सर्व काम मशीनने हाती घेतली आहे. मशीन युग आहे रे बाबा.  तू उपाशी मेला तरी मला काय फरक पडतो. तुला गरज असेल तर दुसरे काही तरी काम शोध. माझ्या माथ्यावर का येऊन बसला आहेस. असे उदगार ते यंत्र मानव काढून त्या बिचाऱ्या गरिबांना खुणावत असेल का? पण काही ही असो जेव्हा पासून हे यंत्र आपल्या देशात आले आहे दारिद्र रेषे खालील लोकांचे हाल वाढले असावे.
सध्या शहरांमध्ये पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी गटारींचे काम सुरु आहे. खोदकामासाठी जे.सी.बी. मशीन चा वापर केला जातो. ही राक्षसी मशीन जवळून जरी गेली तरी तिची भीती वाटते. पण मानव ज्या प्रकारे काम करतो त्याच पद्धतीने याची रचना केली गेली आहे. त्याला बघून असे वाटत नाही की खोदकाम मशीन करीतआहे. ही मशीन तयार करणाऱ्या ला दाद द्यावी लागेल. पण ह्याने  लाखो गरीब लोकांच्या पोटा वर पाय दिला गेला आहे ह्याचा सुद्धा विचार करायलाच हवा.

एक नवीन शब्दकोष

महेंद्रजींनी मला  कमेंटले की  “त्यांनी मला टेगलय.” मला त्याचा अर्थच कळेना. तेव्हा मी जास्त लक्ष दिले नाही. खूप विचार केला त्यांची पोस्ट वाचली मग गूढ कळल. टेग हा इंग्रजी शब्द आणि त्याला लय हा मराठी प्रत्यय जोडून टेगलय किंवा ल जोडून टेगल असा इंग्लो-मराठी शब्द तयार केला आहे. खूप मजा आली. तेव्हाच मला सुचल की अशा शब्दांची एक डीक्शनरीच  तयार होऊ शकेल. दोन तीन दिवसांपासून हा विषय मनात होताच सहज ब्लोग वाचता वाचता असेच शब्द सापडले व काही मी तयार केले आहेत पहा वाचून मजा येईल.

टेग+ ल = टेग चा डिक्शनरी मिनिंग लेबल लावणे किंवा ओळख पट्टी लावणे. असा होतो त्या अर्थाने टेग+ल चा अर्थ ओळख दाखविणे असा होऊ शकतो.

पोस्ट+ल = पत्र पोस्ट करणे हा आपल्या नेहमीच्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय (होता) पत्र पोस्ट पेटीत टाकल याला   पोस्ट+ल. (ब्लोग वरील लेखाला सुद्धा आता पोस्ट म्हणतात का ते मला ठाऊक नाही.)

नोट+ल= नोट करणे म्हणजे नोंद घेणे, म्हणून नोट+ल म्हणजे नोंद घेतली असा होईल.

पब्लिश+ल= प्रकाशित केल.
लिंक+ल = जोडलं

एडीट+ल= संपादन केल.( लेख संपादित केला)
मेल+ल = इ मेल पाठविला ( अग प्रिये मी आजच तुला मेल+ल आहे)
हेल्प+ल = सहायता केली. (अग मम्मी मी आज एका आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करायला हेल्प+ल ग.)
डिस्कस+ल = चर्चा केली. (अहो मेडम तो विषय साहेबांशी डिस्कस+ला का हो?)
शिफ्ट+ल = शिफ्ट च बटन डबल. किंवा जागेवरून सरकारावील (अरे बाळा तो टेबल शिफ्ट+ला का रे?)
लॉक+ल = कुलूप लावलं. ( दरवाज्याला कुलूप लावलं)
डिलीट+ल = काढून टाकल. ( डिलीट केल)
रीड+ल = वाचाल.( पुस्तक वाचाल)

होम वर्क+ल = गृह पाठ केला.
नेट+ल = जाळ्यात अडकवलं.

नेट+ शील का? = तिला जाळ्यात अडकवशील का?
इनव्हाईट+ल = निमंत्रीत केल. (अरे त्याला पार्टीला इनव्हाईट+ल का?)
ड्राफ्ट+ल = मसुदा तयार केला.
करेक्ट+ल = दुरुस्त केल.

करेक्ट+शील का? = दुरुस्त करून देशील का?

कमेंट+ल = कमेंट करणे.
कमेंट+शील = कमेंट करशील (माझिया मना वरून चोरलेला शब्द)

वेस्टात = पश्चिमेला (माझिया मना वरून चोरलेला शब्द)

असे आणखी किती तरी शब्द तयार करता येतील नव्हे वापरात असतील पण आपल्या लक्षात नसते. आपल्याला माहित असेल तर प्रतिक्रियेत लिहावे.

सिरिअल्स

सध्या टी व्ही वर सुरु असलेल्या सर्व चेनल्स पैकी सब वर सुरु असलेली तारक मेहता का उलटा चष्मा ही माझी  सर्वात जास्त आवडणारी सीरिअल आहे. एका पेक्षा एक कलाकारांनी भरलेली. निवड करता ला सलाम करावा लागेल कारण त्याने अप्रतिम कलाकारांची निवड केली आहे. प्रत्येक कलाकार आपापल्या रोल साठी पूर्णतः फिट आहे. लहान मोठा म्हातारा सर्व. दिवस भरच कामाचा तन आल्याने डोक्याला क्षीण येतो तो घालविण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे ही सीरिअल होय. जरूर पहावी.

समाजात होत असलेल्या दैनंदिन घटना आणि त्या तून समाजाला शिकवणूक देणे हे ह्या सीरिअल चे काम आहे.

एक महान गायक मोहम्मद रफी

काल हिंदी सिनेमा जगातील महान गायक मोहम्मद रफी साहब यांची ८५ वी जयंती होती. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ सालचा व ३१ जुलाई १९८० रोजी हा महान कलाकार जग सोडून गेला. हम तुमसे जुदा होके, मेरी आवाज सुनो अशी अप्रतिम व सदाबहार गाणी गाणारा हा गायक १९४० ते १९८० हिंदी सिनेमात गात राहिला. त्यांचे घरचे नाव होते फिको. प्यासा कागज के फुल, गाईड, नया दौर अशा असंख्य गाजलेल्या सिनेमात त्यांनी गाणे गायले. त्यांची आठवण म्हणून त्यांचे काही गाणी सादर करीतआहे.

जब जब फुल खिले या सिनेमाच हे गाण ऐका.

ह्या व्हीडीओत मोहम्मद रफी दिसणार नाहीत फक्त त्यांची गाणी ऐकावीत

हिरा रांझा सिनेमाच हे अप्रतिम गाण”ये दुनिया ये महफिल…….”

चुलीत घाला तो चांगुलपणा

“तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.”

होय हल्ली चांगुलपणा ला कौडीची सूद्धा किम्मत राहिलेली नाही. अहो हे कलीयुग आहे महाराज विसरलात का? ह्या जगात तुम्ही चांगुलपणा ने वागला तर तुम्हाला कोणी विचारात सूद्धा नाही. गेला तो गांधीजींचा जमाना गेला. आता गांधीवादी फक्त सिनेमा मधेच शोभतात. तुम्ही गांधी बनून दुसरा गळ पुढे केला तर तुम्हाला लाथा आणि बुक्के बसतील. हरिश्चद्र बनायचं प्रयत्न केला तर तुम्हाला लुटून खातील. ह्या गोष्ठी आता पुस्तकातच शोभतात. वास्तव जीवनात ह्यांना कवडीमोल किंमत आहे. विश्वास बसत नसेल तर प्रयत्न करून पहा.
उदाहरण देऊ. रस्त्याने तुम्ही जात आहात. गर्दी दिसली थांबलात आणि दोघांचे भांडण चालले आहे असे दिसले व तुम्ही गांधीवादी आहात त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला तर काय होईल. अहो ती भांडणारी दोघे एकत्र येऊन तुम्हाला झोडपून काढतील.तुमचे हात पाया तोडतील. कोठे गेला तो गांधीवाद.
तुम्ही गांधी बनून पंचा नेसला तर तुम्हाला वेडे समजून दगड मारतील. भूल जो यारो ये २१ वी शताब्दी है.
तुम्ही चांगले वागून लोकांची सहायता करता. लोक तुम्हाला वेडा समजून जे असेल नसेल ते सूद्धा घेऊन पळून जातील.
हेच काय तुम्ही किती हि चांगले वागत बोलत असला तरी समोरचा जर खोटारडा असेल पण तुमच्या पेक्षा वरचढ असेल तर त्याचे खरे वाटून लोक तुम्हाला बदडून काढतील. खोट्याला खरे समजणे हे समाजाने मान्य केले आहे.
—————————————————————————————————-

चलते चलते
एक सुंदर ज्योक सांगावासा वाटतो. हा माझा नाही मला नेत वर सापडला आहे. आपणाशी शेअर करावासा वाटला.

पगारी नोकराच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 – गरम

तारीख 11 ते तारीख 20 – नरम

तारीख 21 ते तारीख 30 – बेशरम

पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 – चंद्रमुखी

तारीख 11 ते तारीख 20 – सुर्यमुखी

तारीख 21 ते तारीख 30 – ज्वालामुखी