परिकल्पना भाग-२


परिकल्पना च्या पुढे

समीरचे शब्द ऐकून ती भानावर आली आणि म्हणाली,”काही नाही हो भाउजी सहज जरा!”
समीर,”अस कस काय वहिणी. सहजच कोणी अस उदास बसतो का? आपला जिवलग मित्र घरी आला आहे तरी ही जर मित्र बोलत नसेल तर याचा अर्थ असा होतो की काही तरी गूढ  आहे. आता तुम्ही मला सांगणार आहात का? का मी जाऊ.”
ती,”काय रे सांगू का भाऊजींना?”
तिने त्याच्या कडे प्रश्नार्थक नजरेने  पाहिले आणि त्याने नजरेनेच होकार दिला. नंतर तिने सांगायला सुरुवात केली.
“हे बघा भाऊजी तुमचे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे  संसार बद्दल तुम्हाला काही गोष्ठी माहित नाहीत. पण तुम्ही आता बघा मी तीन महिन्यापासून घरी आहे. पुढील महिन्यात मला कोणत्याही परिस्थितीत  कामावर जावे लागणार आहे. तेव्हा बाळाला कोठे व कोणाच्या भरवश्यावर ठेवायचे हा प्रश्न मला व आम्हा दोघांना सतावत आहे. आता तुम्ही यावर काही तरी उपाय सुचवा म्हणजे आम्ही निवांत होऊ.”
समीर हा एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक आहे ज्याने ४० वर्षाचा झाला तरी ही लग्न केलेले नव्हते. तो कायम म्हणत असतो कि माझे अजून लग्न करायचे वय नाही. किंवा मनपसंद मुलगी मिळाली नाही. अशीच काही तरी कारण सांगून तो मित्र मंडळी व आई-वडिलांनी लग्नाचा विषय काढल्यावर सांगत असतो. आता तर सर्वांनी त्याला टोकनेच सोडून दिले आहे. असा हा समीर एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक. सतत आपल्या संशोधना मध्ये गुंतलेला असतो. जगात काय चालले आहे याचे त्याला भान नसते. त्याने कमी वयातच संशोधन करून जगात नाव कमाविले आहे. त्याचा आवडता विषय आहे बायो-टेक्नोलोजी आणि माइक्रो बायोलोजी. त्याची  स्वतःची एक अवाढव्य लेबोरेटारी आहे ज्यात तो व त्याचे सहपाठी सतत बायो-टेक्नोलोजी आणि माइक्रोबायोलोजीवर  संशोधन करीत असतात. नुकतेच त्याने एक विशिष्ठ प्रकारचे संशोधन केले आहे. त्याने सस्याच्या पिल्लावर एक प्रयोग केला आहे. त्यात  तो यशस्वी झाल्यावर त्याने लगेच आपला पेपर अमेरिकेला आंतरराष्ट्रीय संस्थेला सादर केला आहे. समीरने सस्याचे एक नुकतेच जन्मलेले पिल्लू घेतले होते. त्याला त्या पिल्लाला प्रकृतीच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन कमीत कमी कालावधी मध्ये मोठे करायचे होते. ही कल्पना त्याला “पा”  हा  सन २००९ मधील जुना  सिनेमा पाहिल्यावर मनात आली होती. त्याने विचार केला कि प्रकृती माणसाला लहान वयात मोठे करू शकते तर मानव तसे का करू शकत नाही. पा मध्ये दाखविलेला एक आजार होता. पण तो आजार जर आजार म्हणून न धरता त्याला विज्ञानाची एक देण म्हणून बघितले तर.  त्याने आपण मानवाला कमी वयात चांगल्या प्रकारे मोठे करू शकतो ,  त्याची व्यवस्थित वाढ करू शकतो  आणि हा विचार आल्यावर तो जिद्दी ला पेटला होता. त्याने वर्ष भराच्या अथक प्रयत्नाने ते करून ही दाखविले होते. अर्थात त्याचा तो प्रयोग अद्याप जगासमोर आलेला नव्हता.

क्रमशः

4 thoughts on “परिकल्पना भाग-२

    • कांचन, धन्यवाद बर का! 🙂 किती भागाची कथा होईल हे सांगता येत नाही पण बोर झालात कि अवश्य कळवा मी लगेच थाबवेल.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s