समीरने ससा या प्राण्यावर एक प्रयोग केला होता. त्याने सश्याचे एक नुकतेच जन्माला आलेले पिल्लू घेतले. त्याला त्याने विशिष्ट प्रकारचे एक इंजेक्शन दिले आणि त्याला विशिष्ट वातावरणात ठेवले. बरोबर ४८ तासांनी आपल्या सर्व सहपाठ्यांना सोबत घेऊन त्या सस्याला पाहण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेची ती खास रूम उघडली. या क्षणाची तो व त्याचे सर्व सहपाठी आतुरतेने वाट पाहत होते. आणि तो क्षण आता जवळ म्हणजे काही क्षणांवर येऊन ठेपला होता. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जोरजोरात पडत होते.
सर्वांनी समीरला आग्रह केला की त्यानेच रिमोटचे बटन दाबून त्या रूमचे द्वार उघडले. आणि दार उघडता बरोबर तेथे असलेल्या काचाच्या भिंतीवर एक भला मोठा ससा धडक मारून बाहेर पडायचा प्रयत्न करू पाहत होता. त्याला बघून समीरने पालटून आपल्या सहकार्यांकडे पहिले आणि सर्वांनी आनंदाने उद्या मारल्या. सर्वांनी युरेका म्हणून जोराने ओरड केली. मग समीर व इतर दोघे आत गेले आणि त्या सश्याला बाहेर घेऊन आले. मग त्याच्या विविध तपासण्याकरून पहिले असता तो ससा एक वर्षाने वाढला होता. त्याचा मेंदू सुद्धा एक वर्षाच्या सश्या एवढा वाढला होता. त्याला बघून असे वाटत नव्हते की हा एक नवजात ससा आहे. हि गोष्ठ कोणाकडे ही बोलून दाखवायची नाही अशी ताकीद समीरने सर्वांना दिली होती. त्याने यावर एक पेपर तयार करून सादर केला ही होता. त्याची मंजुरी लवकरच अपेक्षित होती. असा हा जगविख्यात समीर नावाचा प्राणी त्याचा (म्हणजे कथानकातील तो याचा) मित्र होता. आज समीर ह्या विशिष्ट आणि जीवनातील अशक्य अशी गोष्ठ शेअर करण्यासाठी त्याच्या कडे आला होता.पण एक विशेष बाब मी येथे आपल्या नजरेस आणून देऊ इच्छितो कि ते दोघे आप आपल्या फिल्ड बद्दल कधीच एक दुसऱ्याशी चर्चा करीत नाहीत. कारण एकच की समीर ला त्याच्या फिल्डची आवड नाही व त्याला समीरच्या फिल्डची आवड नाही. परंतु तरी ही ते दोघे जिवलग मित्र आहेत हे विशेष. आज समीरच्या समोर त्याच्या जिवलग मित्राच्या त्रासाचा विषय निघाला आणि त्याला ह्या त्रासातून कशी सुटका करून देता येईल ह्याचा विचार समीर करू लागला. त्याला प्रथम आपल्या प्रयोगाचा उपयोग करावा असा विचार मनात आला पण मन मारून तो गप्पा बसला. कारण हेच की त्याला समीरच्या ते प्रयोग व इतर गोष्ठीत रस नव्हता. पण मग काय करावे याचा विचार करता करता तो अचानक समीरला म्हणाला तुम्ही दोघे माझ्या बरोबर फिरायला येणार का? आपण बाहेर जाऊ जेवण करू थोडे फिरू तितक्यात मनात काही तरी मार्ग सुचेल. येथे समीरचा प्रयत्न असा होता की त्या दोघींना फिरायला घेऊन जायचे आणि शक्य झालेच तर काही तरी बहाणा करून आपल्या लेब मध्ये न्यायचे. तेथे त्या दोघींना आपले विश्व दाखवायचे.
क्रमशः (मित्रांनो माफ करा पण हल्ली का कुणास ठाऊक फार नैराश्य आले आहे. आज मोठ्या मुश्किलीने ही पोस्त टाकत आहे.)
chan rangavli ahe katha!!! mastch…next sagle part vachnar ahe me
LikeLike
धन्यवाद भाग्यश्री.ही कथा मला आणखी पुढे लिहायची होती पण जमले नाही म्हणून लवकर संपविली.
LikeLike
😦 nirash ka aahat?? ase hote kadhi kadhi aaplya la ugachach nirasha yete achank mood upset hoto koni vicharle tar kay utar dyave kaltch nahi,
pan ase jya veles hote tevha aapen swatala ekhadya kaamat guntavun ghetle ki aap li nirasha kuthlya kuthe chali jate 🙂
next time karun bagha 🙂 aani hya story cha next part kadhi post karnar?? pudhe kay hoyil yachi hurhur lagli 🙂
LikeLike
Tumhi dakhavilelya aapulki baddal dhanyavad.:). Mi swatahala satat vyast thevto. tari hi kahi vela nirash hoto manushya. Next part lavakarach sadar karto. Halli vel milat naslyane ushir hoto. ( Tumachi comment Spam madhye adakali hoti. Karan mahit nahi.)
LikeLike
nice
LikeLike
धन्यवाद सुमनजी. आप हिंदी होकरभी मराठी ब्लोग पढा इसलिये तहे दिल से शुक्रिया.
LikeLike