समीर त्यांची आतुरता परमोच्च बिंदुला भिडण्याची व त्याच्या तोंडून विचारणा होण्याची आतुरतेने वात बघत होता. ऐकून म्हणाजे दोघी बाजूने आतुरता वाढत चालली होती. समीर ने तिच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले व आपल्या कामाला लागला. इतक्यात तो ससा उडत येऊन तिच्या जवळ टेबल वर येऊन बसला. ते बघून समीर त्या सस्याला म्हणाला,”अरे रघु घाबरू नकोस ती माझी प्रिय वहिणी आहे हा जो तिच्या शेजारी बसला आहे न अनोळखी प्राणी तो तिचा नवरा व माझा जिवलग मित्र आहे. जा त्या वहिणी जवळ जा तिच्या मांडीवर खेळ खूप मायाळू आहे रे ती.” समीरचे बोलणे ऐकून तो पंख असलेला ससा तिच्या जवळ सरकला व चाचपत चाचपत हळू वर पाने तिच्या मांडीवर चढला. तिला इतका आनंद झाला कि तो तिच्या पोटात छातीत आणखी काय म्हणतात तिच्या सर्वांगत दाटून बाहेर यायला करीत होता. ती अत्यानंदित झाली होती. तिने त्या सश्याला हात लावायचा प्रयत्न केला थोड्या प्रतिकारानंतर ससा तयार झाला व तिला हात लावू दिला. आता तिने त्या सश्याला हातात घेतले होते व त्याला हात लावून लावून ती त्याचे पंख बघत होती. त्या सश्याचे पंख हि एक कौतुकास्पद गोष्ट होती तिच्या साठी. त्याला मनापासून तो ससा बघावासा वाटत होता पण त्याचा ते काय म्हणतात न तो जमीर आपला अहंकार हो तो बोलू देत नव्हता. समीर तिरक्या नजरेने त्याच्या चेहऱ्यावरील हाव भाव वाचायचा प्रयत्न करीत होता. शेवटी त्याने आपले तोंड उघडले आणि त्याला डायरेक्ट प्रश्न केला ” समीर मित्र हे काय आहे? आणि हे तू केले आहेस?” समीर ह्याच क्षणाच्या प्रतीक्षेत होता. त्याच्या तोंडून हे प्रश्न ऐकून समीरच्या चेहऱ्यावर गौरव साफ दिसून येत होता. त्याचीकॉलर ताठ झाली होती. नाही तो स्वतःला त्याच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असे समजत नव्हता पण आपल्या जिवलग मित्राने आपले कौतुक केले याचा त्याला अभिमान वाटत होता.आता समीरने उठून त्याला मिठी मारली व तो अक्षरशः रडू लागला. समीर म्हणाला, ” मित्र मी तुझ्या तोंडून माझे कौतुक ऐकून घेण्यासाठी किती वर्षापासून वाट पाहत होतो. आज तू ते केले आणि मी धन्य झालो. मला जितका आनंद ह्या प्रयोगात मिळालेल्या यशाने झाला होता त्यापेक्षा किती तरी पतीने आज आनंद होत आहे.” समीर चे उदगार ऐकून तो आश्चाया चकित झाला होता व आपली चूक त्याच्या लक्षात येत होती. त्याला स्वतः वरच राग येत होता. तो समीरला म्हणाला “मित्र मला माफ कर माझे चुकलेच.” समीरने त्याला आणखीनच जवळ ओढले आणि त्यांची ती मगरमिठी सैल झाल्यावर ते दोघे खाली बसले.
मग समीरने सांगायला सुरुवात केली.
“मला एके दिवशी अचानक अशी कल्पना सुचली कि पक्षी आकाशात उडतात तसे आपण सुद्धा उडून पाहावे. पण ते इतके सोपे नव्हते. मग सश्यावर प्रयोग करायचे ठरविले. त्यासाठी प्रथम एका पक्ष्याच्या शरीराचा अभ्यास केला. त्याला पंख का फुटतात हे शोधून काढले. आणि मग सश्याच्या शरीरामध्ये पक्षाच्या शरीरात पंख फुटण्यासाठी जे आवश्यक असते ते केले. हा जो ससा आहे न ह्याला जन्म पूर्वीच आवश्यक घटक त्याच्या दिले. जन्म झाल्यावर याला पंख फुटले. हा माझा लाडका आहे.”
“ह्या नंतर मी एकदा “पा” नावाचा सिनेमा पहिला होता त्यावर विचार केला आणि आपणच माणसाला लवकर मोठे केले तर. असा विचार माझ्या मनात आला आणि त्यावर मी प्रयोग करून पाहिला तो यशस्वी सुद्धा झाला.” ती,” भाऊजी, तुम्ही आम्हाला ते दाखवाल का?”
समीर,”हो चला माझ्या बरोबर.” आणि ते तिघे सोबत निघाले. एका लेब मध्ये पोहोचल्यावर समीरने त्यांना कुत्र्याचे एक लहानसे पिल्लू दाखविले. हे दोन दिवसापूर्वीच जन्मलेले आहे. ह्याच्यावर मी तो प्रयोग करून दाखवितो.” समीरने आपल्या सहाय्यकाला निर्धारित सूचना केल्या. त्याने त्या कुत्र्याला विशिष्ठ वातावरणात व विशिष्ठ तापमानात ठराविक इंजेक्शन दिले.
समीर ह्या दोघांना म्हणाला,”आता मी तुम्हाला दोन दिवसांनी येथे घेऊन येईल. त्यावेळी तुम्ही हेच पिल्लू केव्हडे झाले आहे ते पहाल.”
आता त्याच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडत होता.
तो समीरला म्हणाला.” समीर तू आम्हाला हे सर्व दाखवितो आहेस पण ह्या मागे तुझा काही उद्देश तर नाही ना.”
समीर म्हणाला, ” उद्देश काय असेल.”
तो “मग तू आम्ही आमच्या बाळाचा प्रश्न केल्यावर आम्हाला येथे का घेऊन आलास.”
तो पुन्हा म्हणाला,” अरे बाबा आम्हाला असा कोणताही प्रयोग आमच्या बाळावर करून घ्यायचा नाही बर का? ती कल्पना डोक्यातून काढून टाक बर.”
आणि त्याने तडक तेथून काढता पाय घेतला. त्याच्या पाठोपाठ ती सुद्धा बाहेर.