एक महान गायक मोहम्मद रफी


काल हिंदी सिनेमा जगातील महान गायक मोहम्मद रफी साहब यांची ८५ वी जयंती होती. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ सालचा व ३१ जुलाई १९८० रोजी हा महान कलाकार जग सोडून गेला. हम तुमसे जुदा होके, मेरी आवाज सुनो अशी अप्रतिम व सदाबहार गाणी गाणारा हा गायक १९४० ते १९८० हिंदी सिनेमात गात राहिला. त्यांचे घरचे नाव होते फिको. प्यासा कागज के फुल, गाईड, नया दौर अशा असंख्य गाजलेल्या सिनेमात त्यांनी गाणे गायले. त्यांची आठवण म्हणून त्यांचे काही गाणी सादर करीतआहे.

जब जब फुल खिले या सिनेमाच हे गाण ऐका.

ह्या व्हीडीओत मोहम्मद रफी दिसणार नाहीत फक्त त्यांची गाणी ऐकावीत

हिरा रांझा सिनेमाच हे अप्रतिम गाण”ये दुनिया ये महफिल…….”

3 thoughts on “एक महान गायक मोहम्मद रफी

 1. अप्रतिम व सदाबहार गाणी गाणारा हा गायक १९४० ते १९८० हिंदी सिनेमात गात राहिला.
  —–

  रवीन्द्रजी: मुहम्मद रफ़ीचं पहिलं चित्रपट गीत १९४४ साली ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी होतं. नंतर मुंबईला आल्यावर हिंदीत १९४४ सालच्याच ‘पहले आप’ चित्रपटात रफ़ीची काही गाणी आहेत. त्या वर्षी रफ़ीची अज़ून काही हिंदी गाणी असतील, पण त्याआधी काही नाही. तुम्ही १९४० हे साल कुठे वाचलं असल्यास तो दावा चूक आहे. तसाच रफ़ीनी ३०,००० गाणी गायल्याचा दावा चूक आहे. अजित प्रधान आणि प्रीतम मेघानी यांनी रफ़ीवर काढलेल्या एका ‘रफ़ी-गीत-कोश’ मध्ये त्याच्या सर्व (सुमारे ४,६५०) गाण्यांची माहिती आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर गेल्या ८-१० वर्षांत त्या पुस्तकात समावेश नसलेली अशी फ़क्त ५-६ गाणी उज़ेडात आली आहेत. रफ़ीला ज़ाहीर श्रेय न मिळालेली त्याची गाणी असल्यास प्रत्येक गाण्यामागे एक डॉलर असं बक्षिस सॅन डिएगो-वासी डॉ सुरजित सिंह (उर्फ़ प्रोफ़ेसर साहेब) यांनी २००१ साली ज़ाहीर केलं होतं. नंतर ती रक्कम एका गाण्यामागे दहा डॉलर वाढवली. लोक शोधताहेत, पण अशी गाणीच अस्तित्वात नाहीत तर मिळणार कुठून? लतानीही ७,५०० च्या आसपास गाणी गायलेली असल्याने तिचं नाव (३०,००० गाण्यांचा दावा) गिनेस बुक मधून गाळलेलं आहे. दक्षिण भारतातल्या गायकांविषयी नक्की माहिती उपलब्ध नाही, पण सध्या पहिला नंबर १०-१२ हज़ार गाण्यांचा आशा भोसलेच्या नावावर आहे.

  लता-आशा-रफ़ी यांच्या सर्व हिंदी चित्रपट गीतांची यादी पुस्तकरुपानी उपलब्ध आहे. त्याखेरीज़ त्यांच्या गाण्यांचीही ज़वळज़वळ सर्व माहिती संशोधकांज़वळ आहे. आणि तलत, मुकेश, किशोर कुमार आणि हेमंत कुमार यांच्याही सर्व गाण्यांची माहिती विश्वास नेरूरकर, हरीश रघुवंशी, राकेश प्रताप सिंह, कमल धिमन, राजकुमार राणा या संशोधकांनी छापली आहे. सुधीर फडके यांच्या गाण्यांचीही अशी माहिती कृष्णराव टेंबे यांनी संकलित केली आहे.
  वसंत प्रभूंविषयी माहिती मधू पोतदार यांनी दिलेली आहे. रफ़ी माझा आवडता गायक नाही, म्हणून मी रफ़ी-कोश घेतला नाही. पण लता, फडके आणि प्रभू कोश/पुस्तकं मी आवडीनी घेतली आहेत. बाबूजींच्या कोशप्रकाशनावेळी तर संकलक टेंबे सत्तरच्या वर असतील.

  या सर्व संशोधनाचा पाया म्हणजे कानपूरचे हर मंदिर सिंह ‘हमराज़’ यांनी संकलन केलेले हिंदी फ़िल्म गीत कोश याचे १९३१ ते १९८० काळातले पाच दशकांचे पाच खंड. पुण्यात NFAI मधे हे ग्रंथ आहेत, पण आपल्या इथल्या लोकांच्या हवी ती पानं फाडून घरी घेऊन ज़ायच्या सवयीमुळे ते ग्रंथ कुलुपात बंद आहेत. आणि तेच बरोबर आहे, एरवी वाचनालयांतून महत्त्वाचे ग्रंथ गहाळ होण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप आहे. उत्साह वाटू नये असं वातावरण असूनही काही संशोधक खूप चिकाटीनी काम करताहेत.

  Like

  • अहो मी विकीपेडिया मधून माहिती घेतली होती. कदाचित चुकली असेल. असो पण तुम्हाला इतकी माहिती आहे याचे मला कौतुक करावेसे वाटते. तुम्ही माहिती पूर्ण प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s