चुलीत घाला तो चांगुलपणा


“तुम्ही चांगले आहात म्हणून लोकही तुमच्याशी चांगलेच वागतील, हे म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात म्हणून सांड तुमच्यावर हमला करणार नाही असे गृहीत धरण्यासारखे आहे.”

होय हल्ली चांगुलपणा ला कौडीची सूद्धा किम्मत राहिलेली नाही. अहो हे कलीयुग आहे महाराज विसरलात का? ह्या जगात तुम्ही चांगुलपणा ने वागला तर तुम्हाला कोणी विचारात सूद्धा नाही. गेला तो गांधीजींचा जमाना गेला. आता गांधीवादी फक्त सिनेमा मधेच शोभतात. तुम्ही गांधी बनून दुसरा गळ पुढे केला तर तुम्हाला लाथा आणि बुक्के बसतील. हरिश्चद्र बनायचं प्रयत्न केला तर तुम्हाला लुटून खातील. ह्या गोष्ठी आता पुस्तकातच शोभतात. वास्तव जीवनात ह्यांना कवडीमोल किंमत आहे. विश्वास बसत नसेल तर प्रयत्न करून पहा.
उदाहरण देऊ. रस्त्याने तुम्ही जात आहात. गर्दी दिसली थांबलात आणि दोघांचे भांडण चालले आहे असे दिसले व तुम्ही गांधीवादी आहात त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला तर काय होईल. अहो ती भांडणारी दोघे एकत्र येऊन तुम्हाला झोडपून काढतील.तुमचे हात पाया तोडतील. कोठे गेला तो गांधीवाद.
तुम्ही गांधी बनून पंचा नेसला तर तुम्हाला वेडे समजून दगड मारतील. भूल जो यारो ये २१ वी शताब्दी है.
तुम्ही चांगले वागून लोकांची सहायता करता. लोक तुम्हाला वेडा समजून जे असेल नसेल ते सूद्धा घेऊन पळून जातील.
हेच काय तुम्ही किती हि चांगले वागत बोलत असला तरी समोरचा जर खोटारडा असेल पण तुमच्या पेक्षा वरचढ असेल तर त्याचे खरे वाटून लोक तुम्हाला बदडून काढतील. खोट्याला खरे समजणे हे समाजाने मान्य केले आहे.
—————————————————————————————————-

चलते चलते
एक सुंदर ज्योक सांगावासा वाटतो. हा माझा नाही मला नेत वर सापडला आहे. आपणाशी शेअर करावासा वाटला.

पगारी नोकराच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 – गरम

तारीख 11 ते तारीख 20 – नरम

तारीख 21 ते तारीख 30 – बेशरम

पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 – चंद्रमुखी

तारीख 11 ते तारीख 20 – सुर्यमुखी

तारीख 21 ते तारीख 30 – ज्वालामुखी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s