एक नवीन शब्दकोष


महेंद्रजींनी मला  कमेंटले की  “त्यांनी मला टेगलय.” मला त्याचा अर्थच कळेना. तेव्हा मी जास्त लक्ष दिले नाही. खूप विचार केला त्यांची पोस्ट वाचली मग गूढ कळल. टेग हा इंग्रजी शब्द आणि त्याला लय हा मराठी प्रत्यय जोडून टेगलय किंवा ल जोडून टेगल असा इंग्लो-मराठी शब्द तयार केला आहे. खूप मजा आली. तेव्हाच मला सुचल की अशा शब्दांची एक डीक्शनरीच  तयार होऊ शकेल. दोन तीन दिवसांपासून हा विषय मनात होताच सहज ब्लोग वाचता वाचता असेच शब्द सापडले व काही मी तयार केले आहेत पहा वाचून मजा येईल.

टेग+ ल = टेग चा डिक्शनरी मिनिंग लेबल लावणे किंवा ओळख पट्टी लावणे. असा होतो त्या अर्थाने टेग+ल चा अर्थ ओळख दाखविणे असा होऊ शकतो.

पोस्ट+ल = पत्र पोस्ट करणे हा आपल्या नेहमीच्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय (होता) पत्र पोस्ट पेटीत टाकल याला   पोस्ट+ल. (ब्लोग वरील लेखाला सुद्धा आता पोस्ट म्हणतात का ते मला ठाऊक नाही.)

नोट+ल= नोट करणे म्हणजे नोंद घेणे, म्हणून नोट+ल म्हणजे नोंद घेतली असा होईल.

पब्लिश+ल= प्रकाशित केल.
लिंक+ल = जोडलं

एडीट+ल= संपादन केल.( लेख संपादित केला)
मेल+ल = इ मेल पाठविला ( अग प्रिये मी आजच तुला मेल+ल आहे)
हेल्प+ल = सहायता केली. (अग मम्मी मी आज एका आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करायला हेल्प+ल ग.)
डिस्कस+ल = चर्चा केली. (अहो मेडम तो विषय साहेबांशी डिस्कस+ला का हो?)
शिफ्ट+ल = शिफ्ट च बटन डबल. किंवा जागेवरून सरकारावील (अरे बाळा तो टेबल शिफ्ट+ला का रे?)
लॉक+ल = कुलूप लावलं. ( दरवाज्याला कुलूप लावलं)
डिलीट+ल = काढून टाकल. ( डिलीट केल)
रीड+ल = वाचाल.( पुस्तक वाचाल)

होम वर्क+ल = गृह पाठ केला.
नेट+ल = जाळ्यात अडकवलं.

नेट+ शील का? = तिला जाळ्यात अडकवशील का?
इनव्हाईट+ल = निमंत्रीत केल. (अरे त्याला पार्टीला इनव्हाईट+ल का?)
ड्राफ्ट+ल = मसुदा तयार केला.
करेक्ट+ल = दुरुस्त केल.

करेक्ट+शील का? = दुरुस्त करून देशील का?

कमेंट+ल = कमेंट करणे.
कमेंट+शील = कमेंट करशील (माझिया मना वरून चोरलेला शब्द)

वेस्टात = पश्चिमेला (माझिया मना वरून चोरलेला शब्द)

असे आणखी किती तरी शब्द तयार करता येतील नव्हे वापरात असतील पण आपल्या लक्षात नसते. आपल्याला माहित असेल तर प्रतिक्रियेत लिहावे.

10 thoughts on “एक नवीन शब्दकोष

  1. चालु द्या काम..लवकरच विकिपेडिया आणि इतर सर्व तुम्हाला शोधत इथेच येतील..

    वेस्टात वरून आठवलं. माझा एक बोरिवली इस्ट ला राहाणारा मित्र हा प्रयोग नेहमी करायचा…काय रे कुठे गेला होतास?……”काही नाही गं जरा वेस्टात जाऊन आलो”…ते त्याच्याकडून त्याच्या कोकणस्थी टोनमध्ये ऐकायला फ़ार आवडायचं..त्याचा ढापलाय मी. आता त्याला क्रेडिटून टाकते कसं…:)

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s