एक प्रगत विध्वंस


आज मी एक वेगळा विषय आपणापुढे सादर करीत आहे. यु ट्यूब वर विध्वन्सावरील व्हिदिओ सापडले. त्यातील एक येथे देत आहे. मोठ मोठ्या इमारती क्षणात पाडण्याचा विक्रम केला जातो. त्या  का पडल्या जातात हा वेगळा विषय आहे. पण कशा व किती कुशलतेने पाडल्या जातात हे येथे महत्वाचे आहे. या व्ही. दि. ओ मध्ये आपल्या निदर्शनास येईल की या पाडल्या गेलेल्या इमारती क्षणार्धात जमीन-दोस्त झाल्या. वर्टीकली खाली बसल्या. इतक्या सहजतेने खाली बसल्या की शेजारील इमारती व झाडांना धक्का सुद्धा लागला नाही. त्यामुळे ही एक प्रगत कला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
योग योग म्हणजे ही पोस्ट लिहिल्यावर पोस्ट करण्यासाठी वर्ड प्रेस वर गेलो तर मला  “ये रे मना ये रे मना” ह्या पेठे काकांच्या ब्लॉगवर  मॉडेलिंग ( इमारतींचे हो 🙂 ) हाच विषय दिसला.

या विशिष्ट कामासाठी साठी स्कील ची गरज आहे. विशेष म्हणजे तिकडे या कामासाठी. Controlled Demolition, Inc. |  या नावाची कंपनी सुद्धा आहे.मला प्रश्न पडला की या इमारती दिसायला छान आहेत मग का पाडल्या गेल्या असाव्यात डोकं बिकं फिरलं असेल की काय त्या लोकांचे.याचा शोध घेत घेत मी पोहोचलो विकीपेडियावर. तेथे तर इमारती पडल्याची भली मोठी यादीच सापडली. त्यावरून लक्षात आले की ह्या सर्व इमारती जुन्या झाल्या होत्या. १९६०-६५ दरम्यानच्या होत्या. पण प्रश्न हा पडतो की ४०-५० वर्ष वय झालेल्या इमारती पडण्याची काय गरज. आपल्याकडे अशा इमारती पडणे ऐकीवात नाही. आपल्याकडील मुंबई मधील शंभर वर्ष जुन्या इमारती सुद्धा पडल्या जात नाहीत. जो पर्यंत स्वतः ते घर पडत नाही तो पर्यंत आपण ते पाडत नाही. आणि खरे सांगायचे झाले तर आपल्याला घर पडणे परवडणारे नाही.

3 thoughts on “एक प्रगत विध्वंस

 1. धन्यवाद संदीपजी,
  video या शब्दाबद्दल माझा गैरसमज दूर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपले माझ्या मनावर स्वागत आहे. यापुढे ही आपण अशीच भेट देत राहावी अशी विनंती आहे.

  Like

 2. आपल्या पोस्ट दर्जेदार आहेत,परंतु “व्ही.दी.ओ.” असे लिहिणे चूकीचे वाटते.”audio आणि visual ” या दोन शब्दांपासून “व्हिडीओ” हा नवा शब्द तयार झाला आहे. तो कशाचाही short form नाही.
  बाकि आपला ब्लोग आवडला. असेच लिहीत रहा.

  Like

  • धन्यवाद संदीपजी,
   Video या शब्दाबद्दल माझा गैरसमज दूर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपले माझ्या मनावर स्वागत आहे. यापुढे ही आपण अशीच भेट देत राहावी अशी विनंती आहे.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s