होते असे कधी कधी…


मी सहजपणे मुलीने आग्रह केला म्हणून माझ्या मना हा एक ब्लोग तयार केला आणि बघता बघता चार पाच ब्लोग तयार झाले. जास्त लक्ष माझ्या मनावरच दिले गेले कारण आपली मातृ भाषा. इंग्रजी, हिंदी या ब्लोगवर जास्त लक्ष केंद्रित करता आले नाही. थोड्या प्रमाणात प्रतिसाद मिळायला लागल्यावर हुरूप आला आणि रोज लिहायला पाहिजे असे झाले व मी त्याच्या आहारी गेलो. झाले एक सवय काही कमी होती सिगारेट ओढायची कि हि दुसरी  सवय जडली. बायकोला सिगारेट म्हणजे सवत वाटायची आता त्या सवतीला सवत आल्या मुळे बायको हैराण झाली. सकाळी उठल्यावर काही कोमेंत्स आल्या आहेत का? हे पाहिल्या शिवाय चैन पडत नाही. सायंकाळी घरी आल्या आल्या मेल चेक करणे. थोडा वेळ बायको सोबत नाराजीनेच का होईना सोफ्यावर बसून वाकड्या तोंडाने गप्पा मारणे. मारणे म्हणजे एक तर्फीच कारण ती बोलणार व मी न ऐकल्यासारखे करणार. माझे सर्व लक्ष आज काय लिहावे याकडे. मनात विषय घोळत राहणार. विषय सापडला कि काय लिहावे यावर चिंतन.

पण मागे माझ्या मुलीची पोस्ट वाचली तेव्हा जाणवले कि आपण ब्लॉगच्या जास्तच आहारी गेलो आहे. ती पोस्ट वाचून बर्याच ब्लॉगर्स च्या कोमेंट्स आल्या. अनिकेतने तर आधीच  अलविदा म्हणायचे ठरवून टाकले होते. हळूं हळू मी ब्लोगवरील लक्ष कमी करत गेलो. पूर्वी माझ्या मनाचे नाव पहिल्या चार मध्ये कसे राहील हे मी पाहत होतो. मला वाटते मागच्या महिना भरापासून माझ्या मना पहिल्या चार वर नाही. तेथील जागा आता सुरेश पेठेजी आणि दुनियादारी यांनी घेतली आहे.

सध्या कामाचा व्याप खूप वाढला आहे. त्यामुळे विषय शोधणे व त्यावर मनन करून लिहिणे शक्य होत नाही. कामातून व घरच्या विषयातून लक्ष विचलित होते. म्हणून आता ब्लोग लिहिणे कमी केले आहे. नेटवर बसणेच आता कमी केले आहे. मला वाटते हि नैसर्गिक क्रिया आहे. माणसाला तेच तेच करून कंटाळा येत असतो. म्हणून तो काही वेळा त्यातून बाहेर पडतो.( लग्नाच्या बेडीतून शक्य नाही 😦 ) मी अलविदा म्हणणार नाही कारण तशी माझ्या कन्येची ताकीदच आहे पण अधून मधून भेटत राहणार. कदाचित पुनः हुरूप आला किंवा फ्रेश झालो तर नव्या जोमाने पुनः लिहायला सुरुवातकरणार.

16 thoughts on “होते असे कधी कधी…

  • बघितले अखिल तुला राहवले नाही म्हणून दुसरी कोमेंत दिली. हेच प्रेम आहे मित्रा. मी अधून मधून लिहित राहणार मात्र हे प्रेम असेच राहू द्यावे.

   अलविदा तो सदा नही कह सकते
   दोस्ती जो निभानी है, हौसला जो देना है,
   वादा है दोस्त,
   हम इस चौराहे पे आते जाते रहेंगे
   युहि कभी कभी टहलते टहलते मिलते रहेंगे

   Like

 1. हो असा होता कधी कधी…तुमच्या विचारांशी पूर्णपणे सहमत..पण भेटत राहा अधुनमधुन..जेव्हा मनाला वाट्टेल तेव्हा लिहा 🙂

  Like

  • अवश्य मित्रा! असा मी या मंचाला सहज सहजी सोडून जाणार नाही. एक अदृश्य मंच मिळाला आहे मला आपले विचार मांडायला तो मी कसा सोडू. 🙂

   Like

 2. काही जणांना सकाळी उठल्यावर लगेचच सिगरेट पिण्याची सवय असते, तर काही जणांना हाती जपमाळ घेण्याची. ना सिगरेट वाईट आहे ना अशी जपमाळ घेणे , वाईट आहे ती सवय.

  सिगरेट सोडु नका, सोडा ती सवय

  Like

 3. रविंद्र
  थोडे नियम बनवुन घ्या स्वतःसाठी . रोजचा एक तास संध्याकाळी..आणि अर्धा तास सकाळी. तेवढा वेळ पुरेसा आहे.. दिवसभर कॉमेंटस अप्रुव्ह करायची गरज नाही. ऑटो अप्रुव्ह ऑप्शन ठेवायचा. आपल्याला जे हवं ते लिहायला एक तास पुरतो.. माझा अनुभव आहे .. 🙂

  Like

  • मी नेहमी अनुभवी मित्रांकडून सल्ला घेत असतो व त्याचा मला खूप फायदा होतो. आता तुम्ही छान सल्ला दिला आहे त्याप्रमाणे प्रयत्न करून पाहतो.

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s