अशी ही एक वीज निर्मिती-भाग-१


मित्रांनो आज आपणाकडे विजेची खुपच कमतरता भासत आहे. शहरामध्ये सकाळ संध्याकाळ २-२ तास वीज नसते. वरून हा उन्हाळा. दिवस काढणे कठीण होते. आपल्या शहरांचे ठीक आहे पण खेडे गावात तर काही विचारूच नका. दिवस दिवस भर वीज नसते.

या वर मात करण्यासाठी मी मागे इको फ्रेंडली हाऊसच्या माझ्या काही संकल्पना लिहिल्या आहेच. आज मी माझी आणखी एक संकल्पना येथे मांडत आहे. मुंबईमध्ये मोठ मोठ्या इमारती आहेत. ३०-४० माळ्याच्या इमारती आहेत. माझ्या मनाला असे वाटले कि ह्या इमारती मध्ये त्यांनी स्वतः वीज निर्मिती केली तर थोडा फार का होईना हातभार लागेल. ती कशी शक्य होईल याचा विचार केल्यावर मला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या ज्या सहजपणे साकारणे शक्य होईल. त्यातील एक येथे मांडत आहे.

या मोठाल्या इमारती मध्ये बरीच कुटुंब राहतात. एका माळ्यावर चार फ्लेट गृहीत धरले व एकूण ३० माळे धरले तरी १२० फ्लेट होतात. बरयाच परिसरात अश्या ३-४ इमारती असतात. सर्व मिळून ४x१२० म्हणजे ४८० कुटुंब आणि प्रत्येक कुटुंब चौकोनी आहे असे गृहीत धरल्यास ४८० x ४ म्हणजे १९२ ० माणसे त्या इमारतीत राहत असतील. एका माणसाला एका दिवसात १०० लिटर तरी पाणी लागत असेल. म्हणजे सर्व इमारती मिळून १९२००० लिटर पाणी रोज लागत असेल. जर शौचालयाचे पाणी वेगळे केले तर उर्वरित पाणी वापरून काही प्रमाणात का होईना वीज निर्मिती करणे सहज शक्य होईल. समजने सोपे जावे म्हणून मी एक स्केच तयार केले आहे ते येथे टाकले आहे. बघा.

वीज निर्मिती साठी हेड मिळावा म्हणून मी येथे खाली दोन माळे म्हणजे ८ फ्लेट सोडले आहेत. सध्या जल विद्युत निर्मिती साठी पिको टर्बाईन सुद्धा उपलब्ध झाले आहेत. असे छोटे टर्बाईन वापरून वीज निर्मिती केली तर कमीत कमी इमारतीमधील कॉमन लाईटींग ची जरी सोय झाली तरी खूप वीज बचत होईल.

कशी वाटली माझी ही संकल्पना जरूर कळवा.

11 thoughts on “अशी ही एक वीज निर्मिती-भाग-१

 1. नमस्कार,
  कल्पना चांगली आहे, पण प्रक्टिकल आहे का अशी शंका येते. कारण, पाणी वर चढवायला वीज खर्च होतेच. शिवाय टाकीसाठी दोन मळ्यांच्या उंचीच्या बांधकामाचा खर्च. त्यापेक्षा घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून biogas तयार करून त्यावर जनित्र चालवणे स्वस्त पडेल. अशामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न सुटेल, वीज मिळेल आणि झाडांना खात मिळेल. पुण्यातील आरती नावाची संस्था अशा प्रकारचे biogas प्लांट्स बनवते.

  दुसरा मार्ग हा पवन्चाक्कीचा. 1kw पवनचक्की १ लाख रुपयांना पडते. त्यातून रोज २ युनिट वीज मिळू शकते. मी स्वतः अशी पवनचक्की माझ्या बंगल्यावर बसवली आहे.

  Like

  • धन्यवाद निरंजनजी, आपण आवडीने माझा लेख वाचला. येथे वीज निर्मितीसाठी आपण पाणी वर चढवीत नाही तर वापरासाठी जे पाणी रोज वर चढविले जाते व वापरून खाली सोडले जाते त्या पाण्याचा उपयोग करण्याची माझी कल्पना आहे. त्यामुळे पाणी चढवायला खर्च होणार नाही. हा, टाकी बांधायला खर्च होईल.
   आपण ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती बद्दल लिहिले आहे. मला वाटते रोज आपल्या घरातून खुपच कमी प्रमाणात ओला किंवा सुका कचरा निघतो. त्यामुळे त्यातून खूप कमी वीज मिळेल.
   आपण पावन चक्की चा उल्लेख केला आहे. पावन चक्की माझ्या मते खूप महाग पडते. याशिवाय वीज निर्मिती हवेवर अवलंबून असते. वर असेल तरच वीज तयार होते. मुंबईसारख्या शहरात सुन्गायला ही हवा मिळत नाही. त्यामुळे याचा उपयोग मुंबईत करणे शक्य वाटत नाही. आपण आपल्या बंगल्यावर १ kW ची पावन चक्की बसविली आहे. टी कोकणात बसविली असावी. पण त्यावर आपण किती उपकरण चालवितात. मला कळले तर बरे होईल.
   माझी संकल्पना ही मुंबईतील इमारतींसाठी आहे.

   Like

  • रविंद्र साहेब,

   ४८० बिऱ्हाडांतून तयार होणारा ओला कचरा हा २-३ युनिट वीज निर्माण करण्याइतपत मिथेन नक्कीच तयार करेल. आणि एव्ह्ढी वीज कोमन लाइट साठी पुरेशी आहे.

   मुंबईत ३० मजली इमारतीच्या वर सोसाट्याचा वारा असतो असा माझा अनुभव आहे. माझी पवनचक्की चिंचवड जवळ वाकड परिसरात आहे. ground + 1 च्या वर १० मीटर एव्हढी उंची आहे. वाऱ्याच्या लहरीपणावर उपाय म्हणुन पवनचक्कीने बँटरी चार्ज होते आणि इन्व्हर्टर द्वारे घराचे दिवे पंखे लागतात.

   आपली कल्पना खरंच चांगली आहे. फ़क्त काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील:

   १. वापरलेले पाणी गाळवे लागेल नाहीतर टाकी खराब होईल.
   २. टाकी बान्धायला लागणारी जागा व खर्च.
   ३. शौचालय आणि बाथरुमचे प्लंबिंगचा खर्च.

   मी बंगला बांधताना ह्याचा विचार केला होता. म्हणुन लिहिले. बाकी एक समविचारी व्यक्ती भेटली ह्याचा आनंद झाला 🙂

   Like

   • निरंजन,
    मला पवन चक्की बद्दल जास्त माहिती हवी आहे.
    तुम्ही मला तुम्ही जेथून खरेदी केलेली आहे तेथील फोन देता का please ?
    दुसरे असे कि मला तुमच्या कडील पवन चक्की बघता आली तर चांगले राहील? मी आणि माझह एक मित्र आम्ही छोटी पावन चक्की बनविण्याचा प्रयत्न करत आहोत कि जी ग्रामीण भागात विक्री करता येयील.

    असो तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे? धन्यवाद!
    संदीप (sandeepautade@yahoo.com)

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s