जगण्यासाठी मृत्यू


काही दिवसांपूर्वी बेंगलोर शहरातील एका भव्य इमारतीला आग लागली होती. त्याचे टी.व्ही. वरील दृश्य पाहून अंगाला कांटे येत होते. जीवन जगता यावे या साठी धडपड करणारी मानस ५व्या -६व्या माळ्यावरून उद्या मारतांना दिसत होती. एव्हड्या उंचीवरून पडलेला मनुष्य जगणे अशक्यच. एक जवान मुलगी पडतांना दाखविली होती. टे दृश्य ह्या व्हिडीओत दिसते.

आज पुनः तीच पुनरावृत्ती कलकत्त्यात झाली. तेथे ही माणसांनी उंचावरून उद्या मारल्या आणि प्राण गमावून बसले. पण धुराने गुदमरून तीळ तीळ मरण येण्यापेक्षा एकदम मेलेले बरे असा विचार करूनच त्यांनी मृत्यूला जवळ केले असावे. वाईट वाटते जेव्हा धनाढ्य वेतन मिळविणारी ती पोरं असे मृत्यू येऊन मारतात.

दोन्ही दृश्य पाहिली तर त्यात एक साम्य दिसून येते कि इमारती खाली हजारोने जनता जमा झालेली दिसते वर इमारतीत लोक अडकलेली दिसतात. मदद मागणारी ओक्साबोक्शी रडणारी, गुदमरणारी मानसे  दिसत असतात पण त्या जनतेत एक सुद्धा शहाणा माणूस दिसत नाही कि ज्याने परिसरातील कापड दुकानात जाउन मोठी ताडपत्री किंवा मोठ मोठ्या बेड शीट आणून त्या लोकांना मदद केली नाही. जनतेतील १५-२० लोकांनी मोठी ताडपत्री हातात घेऊन खाली उभे राहिले असते तर त्या अडकलेल्या लोकांना अलगद झेलता आले असते. बिचार्यांचे प्राण वाचले असते. हात पाय फ्रेक्चर  झाला असता तो विषय वेगळा. पण प्राण वाचले असते. त्यांनी व त्यांच्या घरच्यांनी दुआ दिल्या असत्या. पण असा एक ही माई का लाल त्या हजारो लोकांमध्ये दिसून आला नाही हे विशेष. किती  भावना शून्य झालेला आहे हा मनुष्य.

बर दोन्ही इमारती गजबजलेल्या व व्यावसायिक परिसरातल्या आहेत. मंडपचे दुकान अशा परिसरात असतेच. तेथून ही ताडपत्र्या मिळाल्या असत्या.

एक आणखी गोष्ट जाणवली कि ह्या भल्या मोठ्या टोलेजंग इमारती मध्ये फायर फायटिंग ची व्यवस्था नसेल असे वाटते का? असेलच पण आपणाकडे आग लागल्यावर जग येते तसे झाले असावे. सर्व यंत्रणा बंद असेल. या इमारतींमध्ये थोडा जरी धूर निघाला तरी सेन्स करणारी यंत्रणा लावलेली असते. व आपोआप होर्न वाजतात. टे वाजल्याने लोक जागृत होतात. ती यंत्रणा सुद्धा कार्यरत नसेल का? आग लागल्यावर विझवण्यासाठी पाण्याचे पंप प्रत्येक माळ्यावर असतात. ती सुद्धा कार्यरत नसेल का? नसेलच मुळी कारण जब होगा तब देखेंगे हे आपले तत्व. आज तो कुछ हुआ नही है न. जेव्हा मोठा हमला होतो तेव्हा सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट च्या घोषणा केल्या जातात. यंत्रणा जागृत होते. अरे ते  काय इतके बुद्दू असतात काय. तुम्हाला जागे करून घटना घडवायला. त्यांना माहित आहे कि आज घडले कि यंत्रणा जागृत होईल तो पर्यंत आपण पर्यटन करायचे. काही दिवसांनी यंत्रणा म्हणेल आता सर्व आलबेल आहे कसलीच भीती नाही आणि वातावरण  थंड झाले कि परत येऊन काही तरी घडामोडी करायच्या. जर आपण सतत सजग राहिलो असतो तर अशा घटना घडल्याच नसत्या.

इमारतीत आग विझविण्यासाठी बसविलेली  यंत्रणा अधून मधून कार्यरत आहे का हे तपासायला हवे. पंपाची मोटार व्यवस्थित चालत आहे का? नाही तर आग लागेल आणि पंप सुरु केला तर चालुच  होत नाही असे चित्र दिसेल आणि त्याला सुरु करता करता बिचारा तोच जळून खाक होतो. असो.

पण या सतत होणाऱ्या घटना आणि मरणारे लोक यावरून असे वाटते कि फायर यंत्रणा बसविणे पुरेसे नाही.या शिवाय अशी घटना घडली तर लोकांना बाहेर काढण्यासाठी इमारतीच्या दोन्ही बाजूला भिंतीला चिपकून कमीत कमी एक एक सिढी फिक्स करायला हवी. म्हणजे काही तरी व्यवस्था असेल लोकांना जीव वाचविण्यासाठी.

बहुतेक वेळा आग ही विजेच्या  शॉर्टसर्किट मुळे लागते  आणि यापासून बचाव सोपा असतो. चांगल्या एनर्जी ओडीटर कडून कंपल्सरी तपासणी करवून घेणे आणि त्याच्या सूचना तंतोतंत पाळणे. नाही तर केबल ची केपेसिटी कमी असते आणि त्यावर लोड भरमसाठ असतो. ती केबल किती दिवस तग धरणार. रोज गरम होऊन होऊन  आतल्या आत जळत जाते आणि एके दिवशी बर्स्ट होते व आगीचा भडका उडतो.

होते काय कि वायरिंग इमारत बांधतांना केली जाते त्यावेळी ते ऑफिस कोण विकत किंवा भाड्याने घेणार आहे हे माहित नसते. त्यांचे कडे काय काय यंत्रणा असेल हे माहित नसते. थोडा फार  डायवर्सिटी फ़ेक्टर गृहीत धरला जात असेल. एकदा का इमारत तयार झाली व ऑफिस थाटले कि मग हळू हळू गरज भासेल त्या प्रमाणे ए सी किंवा कम्प्युटर किंवा झेरोक्स मशीन प्लोटर लागेल ते आणले जाते. हळू हळू लोड वाढत जातो. आणि मग नको ते घडते. नव नवीन उपकरणे घेतांना आपल्या ऑफिस पर्यंत आलेली केबल सक्षम आहे का ते तपासणे आवश्यक असते. तसे केले जात नाही आणि अशा घटना घडतात.

बर होते काय कि इमारत बांधणारा वेगळा असतो तो आपले गाळे विकून निघून जातो. इमारत बांधणारा जो असतो त्याने विजेचा भार कंट्रोल करण्यासाठी योग्य क्षमतेचे ब्रेकर लावले तर भार वाढला सर्किट  ट्रीप होईल. ते चांगले पण त्याने वायरमेनला सांगितले कि त्या ब्रेकरला बायपास कर तर झाला गोंधळ. थोडे पैसे वाचविण्यासाठी आपण लोकांचा जीव धोक्यात घालत असतो.

3 thoughts on “जगण्यासाठी मृत्यू

  1. खरं आहे. बर्‍याचशा दूर्घट्ना ह्या ’देंगे-दिलायेंगे’ अशा वृत्तीमुळे घडतात. त्या खरंच टाळता येतात…पण एकूणच आपला कल हा आजचे काम उद्याकडे ढकलण्याकडे असल्यामुळे दूर्दैवाने हे होतच राहणार.
    दुसरी गोष्ट ..प्रसंगावधान. त्या बाबतीतही आपण खूपच कमी पडतो. घट्ना घडून गेल्यावरच आपल्याला नको ते शहाणपण सुचते.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s