माझे आणखी एक गणितीय सूत्र


९ ने तयार होणाऱ्या संख्येला इतर संख्येने गुणने

बाल मित्रांनो ९ या अंकाने तयार होणाऱ्या कोणत्याही संख्येला इतर एक किंवा दोन अंकी संख्येने सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करता येईल ते मी येथे दाखविणार आहे.

समजा ९९ ही संख्या आपण घेतली व तिला ८ ने गुणाकार करायचा आहे. तर काय करावे लागेल. सोपे आहे. तुम्ही फक्त एकच करायचे.  ९ x८ = ७२ होतात. य उत्तरातील ७ व २ हे अंक थोड्या अंतराने लिहायचे. म्हणजे ७     २ असे.

आता या  ७ आणि २ ची बेरीज करायची. ती येईल ९.  आता दिलेल्या संख्येत ९ किती वेळा आला आहे ते बघायचे. त्या संख्येत ९ हा फक्त २ वेळा आला आहे. म्हणून हा ९ अंक ७ व २ यांच्या मध्ये २ पेक्ष १ कमी म्हणजे १ वेळा लिहायचा. उत्तर येईल ७९२. हा आहे ९९ आणि ८ चा गुणाकार.

आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊ. ९९९९९ ह्या संख्येला  ७ ने गुणाकार करणे.

येथे ९ x७ केले तर मिळतात ६३. हे ६ व ३ थोडे अंतर ठेऊन लिहायचे. ६      ३. असे.

आता ६ व ३ ची बेरीज करायची. ती येईल ९. आता दिलेल्या संख्येत ९ अंक किती वेळा आला आहे ते मोजायचे. तो ५ वेळा आला आहे. म्हणून ५ पेक्षा १ कमी म्हणजे ४ वेळा हा ९ अंक ६ व ३ च्या मधे लिहायचा. आता चित्र असे दिसेल. ६९९९९३. तपासून पहा हेच दिलेल्या प्रश्नाचे  उत्तर आहे.

4 thoughts on “माझे आणखी एक गणितीय सूत्र

 1. ९ ने गुणाकार करायच आण्खी सोपं सूत्र : हाताची दहा बोट समोर धरायची आणी ज्याने गुणायचं अहे त्या क्रमाकाचे बोट मिटायचं. त्याच्या इकडे किती बोटं आणि तिकडे किती बोटं हे पहायच .. झालं तेच उत्तर.

  म्हणजे ९x३ असेल तर : दहा बोट पसरा. (पंजा खालच्या दिशेत), तिसरं बोटं दुमडा. एकाबाजूला २ बोटं आणि द्सऱ्या बाजूला ७ बोटं !!! हे हे हे

  Like

  • लय भारी. इतकी सोपी सूत्र कोणालाच सुचू शकत नाहीत. सुंदर . आणखी काही असतील तर जरूर सुचव मित्र.

   Like

 2. पोस्ट चांगली आहे पण मी मुलांना तसं का होतं याचं कारण सांगेन म्हणजे अश्या प्रकारचे सोपे नियम अजुन कुठे तयार करता येतात का ते त्यांना विचार करून शोधायला सांगेन. यमुळे त्यांची गणितीय विचार करण्याची पध्दत वाढीस लागेल. या विषयी एक पोस्ट टाकते आहे शतपावलीवर.

  Like

  • अपर्नाजी, आपण माझ्या मनावरील गणिताची सूत्र ळा इतके महत्व देऊन आपल्या ब्लोगवर जागा दिली या बद्दल धन्यवाद. इतकेच नव्हे तर आपण त्या सूत्राचे विश्लेषण ही केले आहे.
   मी म्हणतो आपण जर माझे हे सूत्र वाचले नसते तर हे विश्लेषण केलेच नसते. म्हणजे माझी पोस्ट वाचल्यावर आपणाला हे सुचले. असेच मुलांचे होते. त्यांना जर पालकांनी माझी पोस्ट वाचायला दिली असती तर त्यांनी त्या आधारावर नवीन सूत्र शोधून काढलिऊ असती.
   असो आपण माझ्या मनावर इतरही काही सूत्र दिली आहेत वाचली असतीलच.
   माझ्या Magic Maths या ब्लॉगला भेट ध्यावी. http://rnk1.wordpress.com

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s