एक अवाढव्य घर भाडेतत्वावर द्यायचे आहे. कोणी भाडेकरु आहे का? घर खुप सुन्दर आहे. वेल फ़र्निश्ड आहे. फक्त अंगावरिल कपडे घेऊन आलात तरी चालेल. अहो सध्या भाड्या बद्दल बोलु नका. आधी घर तर बघा. ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर घराचा फोटो पाठवित आहे तो बघा आणि तुम्हाला वाटेल तितके भाडे पाठवुन द्या. घर अप्रतिम आहे. नाव ठेवण्यासारखे काहीच नाही. चहु बाजुला निसर्ग सौन्दर्य! प्रदुषण तर नाहीच नाही. गर्दी नाही कि वाहनांची दगदग नाही कारण तेथे वाहने पोहोचुच शकत नाहीत. बघा विचार करा आणि कळवा. पत्ता मात्र विचारु नका ( मला कोठे ठाऊक आहे!! हा हा हा!!!)
Monthly Archives: एप्रिल 2010
.|| बाप्पा ||.
परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला,
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला ,
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस,
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक,
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो ,
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत,
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग ,
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग ,
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात,
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात,
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन,
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे?
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको,
परत येउन मला दमलो म्हणायला नको,
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षिस,
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप,
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं.
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं’,
‘हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव’,
‘प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव ‘,
‘देशील आणून परत माझी हरवलेली नाती ‘,
‘नेशील मला परत जिथे आहे माझी माती ‘,
‘इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं ‘,
‘आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं ‘,
‘भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार ‘
‘य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान’,
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, “सुखी रहा” म्हणाला
ज्वालामुखीचा उद्रेक -2
मागच्या महिन्यापासून आईसलेंड मधील ज्वालामुखीची काही यु ट्युब वर सापडलेली काही व्हिडीओ येथे देत आहे.
ज्वालामुखीचा उद्रेक
मागच्या महिन्याप्सून आईसलेंड मध्ये दोन शतकांपासून सुप्त अवस्थेत असलेल्या एका ज्वालामुखीने अचानक तोंड उघडल्याने सर्व जगाची झोप उडाली आहे. जगभरातल्या विमान कंपन्याना आपली विमान सेवा ठप्प ठेवावी लागली. आजच बातमी झळकली की आता विमान सेवा सुरु होत आहे. याच ज्वालामुखीची काही चित्रे प्राप्त झाली आहेत अर्थात funonthenet.com या वेब साईट वरून.
मला एक प्रश्न मात्र फार त्रास देत आहे. ह्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्या देशाचे नाव आहे Iceland. म्हणजे बर्फाचा देश. आता बर्फाचा देश म्हटल्यावर तापमान उणे २०-३० असावे. तरीही जमीनीखाली तांडव सुरु आहे. चारही बाजूला बर्फ असलेल्या प्रदेशात उष्णतेचा उद्रेक झाल्यावर तो बर्फ वितळणार हे नक्की. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पटली आणखीनच वाढणार.
ज्या साईट वर ही चित्र आहे त्या साईट वर या लेखाचे हेडिंग फारच गमतीशीर दिले आहे.
Volcano in Iceland – Amazing Photos!
इतकी कठोर तू कां आहेस ?
फुला सारखी नाजूक आहेस,
मधासारखी गोड आहेस
भाग्य जर सोबत नसेल तर
कांटयाचा बिछाना आहेस तू //१//
सर्वांच्या डोळ्यातील चमक आहेस
सर्वांच्या श्वासाची लय आहेस
श्वासाची संगत नसेल तर
हृदयाचा एक कांटा आहेस तू//२//
गरीबांच्या रस्त्यातील कांटे आहेस
श्रीमंताच्या घरातील शोभा आहेस
सर्वांना जीवनात सुख न देणारी
इतकी कठोर तू कां आहेस ?//३//
तू जीला सर्व जीवन या नावाने ओळखतात!!!
Never be……….
आयडीया फॉर ऑल
स्पेन मधील एक वेब साईट आहे नाव आहे “आयडीया फॉर ऑल” http://es.ideas4all.com/. आपल्या डोक्यात कोणत्याही विषयाबद्दल काही तरी नवीन कल्पना सुचत असतील तर त्या या वेब वर टाकता येतात. मग त्या इंजिनिअरिंग वर असो सामाजिक असो किंवा आणखी कोणता विषय असो.
मी माझ्या वीज निर्मिती वरच्या काही संकल्पना त्यावर टाकल्या आहेत. त्यांची लिंक देत आहे.
हाय टेक मुंबई
काल मी मुंबईला गेलो होतो अर्थात ऑफीस कामानिमित्त . पण खूप दिवसांनी ट्रेन व लोकल ने प्रवास केला त्यामुळे सर्व नवीन वाटत होत. बहुतेक वेळा शासकीय वाहनाने जात असल्यामुळे लोकलचा आनंद( ?) घेता येत नाही.
काल मी लोकल ने प्रवास केला व उभे राहून पेपर वाचत असतांना अचानक माझ्या कानावर गोड सुमधुर आवाज आला. “अगला स्टेशन …… ” मी प्रथम लक्ष दिले नही पण पुनः आवाज आल्यावर मला शंका आली व मी डब्यामध्ये स्पीकर कोठे आहेत का ते शोधून पहिले. स्पीकर पाहिल्यावर आनंद झाला. आपण विदेशात कोठे तर नही न अशी मला शंका वाटू लागली. मला जपान मधील लोकल ची आठवण झाली.तेथील लोकल ने मी १ महिन्याच्या मुक्कामात जवळ जवळ रोजच लोकल ने प्रवास केला होता. तेथून परत आल्यावर मी लोकल मध्ये बसलो होतो तेव्हाचा आपल्या लोकलचा अनुभव घेतल्या वर साहजिकच जपान मधील लोकलशी तुलना केली होती. तेव्हा मनात आले होते आपण त्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाही. पण
आज १२ वर्षानंतर वाटायला लागले आहे आपण थोड्या प्रमाणात का असेना बरोबरी करायला लागलो आहोत.
बेस्ट बस मध्ये गेलो तर त्यात सुद्धा मला खूप बदल वाटला. दोन दोन एलसीडी टी.व्ही. बसविलेली दिसली. आनंद झाला.
मनात म्हणालो मुंबई आता हाय टेक झालीय.
मी सुखी आहे देवा
आजच्या माझ्या पोस्ट चे टाईटल विचित्र वाटत असेल. मला आताच एक मेल आलेला मी पाहिला. प्रत्येकाला वाटते मी फार दुखी आहे. माझ्या इतके दुखी जगात कोणीच नाही. आपण देवाला मनापासून कोसत असतो “देवा, मला इतके दुख द्यायचे होते तर जन्माला का घातले?” पण आपल्या पेक्षा किती तरी पटीने दुखी असलेली अनेक लोकं या जगात वावरत आहेत. त्यामुळे आपले दुख विसरावे व त्यांच्या साठी देवाकडे प्रार्थना करावी. हाच त्यामेलचा भावार्थ. त्या मेल मधील फोटो मी येथे टाकत आहे.
जो मेल मला आला त्याचा संदेश असा आहे की “… अद्याप ही तुम्हाला वाटते की तुमच्या कडे पुरेसे नाही????????????”
yet you think you don’t have enough???????????????
हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे ?
माझ्या ब्लॉग मित्रांपैकी बरीच मंडळी ४० च्या पुढील आहेत. इश्वर करो कोणालाच कधीच हृदय विकार होऊ नये. पण आजार हा इश्वर सुद्धा टाळू शकत नाही. तो टाळावा लागतो. हल्ली तर २५ व्या वर्षी सुद्धा हृदय विकाराने मेला अशा बातम्या येत असता त. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक बाबतीत अनियमितता. अहो आपण निसर्ग नियमच बदलून टाकलेले
आहेत.
कॉल सेंटर वर काम करणारे फक्त रात्रीच काम करतात. अवेळी झोपणे, अवेळी खाणे, नको ते खाणे हेच तर कारणीभूत ठरते. असो आपल्याला हे टाळता येत नाही. उदरनिर्वाहासाठी, जीवन जगण्यासाठी नौकरी तर करावीच
लागते.