सेक्रीफाईस

हा विषय घेऊन मी मध्यंतरी माझ्या इंग्रजी ब्लोग वर काही कविता लिहिल्या होत्या.  सेक्रीफाईस म्हणजे बलिदान. एक दिवस, तो  सुटीचा दिवस होता, आमच्या कडे दैनिंग टेबल आहे पण मला त्यावर बसून जेवण जात नाही. आपली भारतीय बैठक बरी असते. पण त्या दिवशी आम्ही तिघे दैनिंग टेबल वर जेवण करत बसलो होतो. त्यावेळी माझे लक्ष कवितेकडे होते. कोणता विषय घ्यावा अशी खलबत मनात सुरु होती.  जेवण सुरु होते म्हणून माझ्या डोक्यात तोच विषय घेवून लिहावे असे वाटले. आणि अचानक कल्पना सुचली. कि दोघे पती पत्नी दैनिंग टेबलवर जेवण करीत बसले आहेत. वेळ रात्रीची आहे. केंडल लाईट डीनर सुरु आहे. आणि कवी व दयाळू मनाचा पती आपल्या पत्नीशी संवाद साधतो कि आपण रोज ह्या केंडल च्या लाईटमध्ये जेवण करीत असतो पण तू कधी तिने आपल्या साठी काय बलिदान दिले हे तुला कधी समजले आहे का? आणि पुढे ते महाशय म्हणतात की ज्या प्रमाणे हि केंडल आपल्यासाठी बलिदान करीत आहे आपण आज उपवास ठेऊन ह्या देशाच्या गोर गरीब लोकांसाठी एक वेळ बलिदान करू. हा माझ्या कवितेचा सार. कविता येथे लिंक केली आहे.

जगात असे कितीतरी जीवजंतू , झाडे झुडपे आहेत जे इतरांसाठी बलिदान देत असतात. आंब्याचे झाड आपल्याला आंबे देते, सावली देते,इ. त्यामुळे  हाच विषय घेऊन मी आणखी एक कविता तयार केली. यावेळी मी  झाडांचे बलिदान असा विषय निवडला व मला वडाचे झाड योग्य वाटले. कारण आमच्या शहरात रस्ता रुंदिकरणाने बऱ्याच वडा च्या झाडांची कत्तल केली आहे. हे झाड अनेक वर्ष जगते. त्या कवितेचा सार मी येथे देत नाही. फक्त लिंक देत आहे. ह्या कवितेने माझ्या त्या इंग्रजी ब्लोगला चांगली प्रसिध्दी मिळवून दिली. आज पर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांनी माझी हि कविता वाचली आहे. एप्रिल च्या सुरुवातीला माझ्या ब्लॉगचे वाचक फक्त २८३ होते. आज ती संख्या फक्त ह्या एकाच कविते मुळे १२५७ वर पोहोचली आहे. माझ्या मनाचे जगभरात पसरलेले वाचक व माझ्या इंग्रजी ब्लॉग “My Blog” चे जगभरातील वाचक किती आहेत हे दाखविण्यासाठी मी दोघांचे नकाशे येथे टाकले आहेत.

( आज १३ जून २०१० पर्यंत ही कविता १५६८ वेळा विजिट केली गेली आहे.)

My Blog चे जगातील visitors

माझ्या मनाचे जगातील visitors

आशा आहे आपणाला सुध्दा ही कविता आवडेल.  आवडली तर कॉमेंट द्यावी. कॉमेंट दिल्याने प्रोत्साहन मिळते. हल्ली कोमेत मिळत नसल्याने व वेळ ही मिळत नसल्याने लिहिणे कमी झाले आहे.

इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नल

बघा जग किती पुढे चालले आहे. आता माणसाची सॉरी म्हणजे ट्राफिक पोलिसाची गरज भासणार नाही. कारण आता येत आहेत इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नल.

ही माहिती मला याFeatured blogs from INDIA. indiarss.net लिंक वरून सापडली. झाले असे कि हल्ली माझ्या मनावर या साईटवरून बेक लिंक  येत आहे.

म्हणजे माझ्या ब्लॉगवरच्या पोस्ट त्या साईटवर प्रकाशित होत आहेत. असो, पण ह्या सैत्वरून  मला एक माहिती मिळाली की चेन्नई शहरामध्ये इतर शहरांप्रमाणे ट्राफिक जाम होत असतो म्हणून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या   इम्बुलेंसला मार्ग सापडत नाही. यासाठी एक शक्कल लढविली गेली आणि अशा प्रकारचे इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नल बसविण्याचे ठरले. हे सिग्नल महत्वाच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा करून देतील म्हणे. ( हा हा हा ) ही बातमी द हिंदू या दैनिकात आलेली आहे. त्याच्या लिंक साठी येथे क्लिक करा.

ही बातमी वाचून मला हसू कोसळले. ह्या बातमी मध्ये शहराच्या ट्राफिकचा  एक फोटो दिला आहे तो मी येथे टाकला आहे. फोटो बघितल्यावर हसवल्यापासून मला तरी राहवले गेले नाही. कारण ज्या रस्त्यांवर इतका ट्राफिक असेल त्या रस्त्यावर किती ही इंटेलिजेन्ट सिग्नल बसविला तरी इम्बुलेंसला रस्ता कसा मिळेल हा प्रश्नच आहे. जेथे पोलिसाला जुमानत नाही तेथे ह्या इंटेलीजेन्ट ट्राफिक सिग्नलला कोण जुमानणार हा प्रश्नच आहे!!!!!

Set to change: A scene at one of the junctions on Kamaraj Salai. The new area traffic control system will help ensure smooth flow of vehicles. ( The Hindu)

पाऱ्याला ताप आलाय!

मित्रांनो सध्या तापमापकातील पाऱ्याला ताप चढला आहे असे वाटत आहे. जम्मूचे तापमान ४५ डिग्री ? म्हणजे काय. पारा पार त्या हिमालयापर्यंत पोहोचत चालला असल्याचे जाणवत आहे. ( हिमालय एव्हढा उंच चढला नाही म्हणजे मिळवली)आपल्या येथे ४०-४२ डिग्री मधेच जीवाची लाही लाही होते तर ५० डिग्री मध्ये काय होत असेल? कसे जगात असतील ती लोकं? त्यावर विजेचा कहर! प्यायला पाणी नाही!  म्हणजे चारी बाजूंनी घेरलेला मानव. काय करत असेल तो.

या अशा वातावरणात कमीत कमी डोळ्यांना थोडी ठंडक मिळाली म्हणजे गार वाटते. म्हणून मी येथे काही गारवा देणारी फोटो टाकत आहे. व्हा! थोडे गार व्हा! डूबते को तिनके का सहारा!

ग्लोबल वार्मिंगची झलक

मध्यंतरी बातमी वाचण्यात आली होती की सन २०१० हे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. तापमानाला काही पारावर उरला नाही. ५० डिग्री सेल्सियस पार करून झाले  आहे. आता पार कोठे जाऊन थांबतो याचीच वाट पाहायची आहे.

ही सुद्धा ग्लोबल वार्मिंग चीच एक झलक आहे असे माझे मन सतत म्हणत असते. कोठे ही विनाकारण पाणी वाया जात असेल, विनाकारण वीज खर्ची पडत असेल तर मन विषण्ण होते. शक्य असेल तेव्हा नळ/ दिवे पंखे स्वतः बंद करण्याची काळजी घेत असतो. पण प्रत्येकाने अशी काळजी घ्यावी असे मनापासून वाटते म्हणून वारंवार या विषयाची पोस्ट टाकत असतो.

मित्रांनो वीज निर्मिती करण्यासाठी प्रचंड कोळसा खरी जातो. त्याने उष्णता निर्माण होते. गेसेस निर्माण होतात. प्रदूषण पाठोपाठ ग्लोबल वार्मिंग होते. म्हणून वीज बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण विनाकारण नेटवर बसून काही तरी सर्फिंग, बझ, ब्लॉगवर लिहणे करीत असतो. अत्यंत आवश्यक नसेल तर ते टाळावे.

मला वाटते आपण सर्व ब्लॉग मित्रांनी दिवसातून एक तास जरी संगणक अर्थात खाजगी कामासाठी वापरणे थांबवून एनर्जी सेविंग मध्ये हात भर लावला तर खारीचा वाट ठरेल.

काय वाटते याबद्दल  आपल्याला. जर योग्य वाटत असेल तर प्रतिक्रिया जरूर कळवा व सोयीस्कर वेळ ही.

दुसरे असे की हल्ली उष्णतेमुळे सर्व हैराण आहेत व एसी मध्ये बसने झोपणे छान  वाटते. पण त्यामुळे खुपच वीज खर्ची पडते. याशिवाय एसी मधून बाहेर आल्यावर प्रचंड त्रास होतो. मी काल मंत्रालयात गेलो होतो. एक तास एसी रूम मध्ये बसलो होतो. त्या थंड वातावरणातून बाहेर आल्यावर मला असे जणू लागले की माझ्या शरीरातून वाफा निघत आहेत. काही वेळ स्वास  घेणे सुद्धा अवघड जात होते. टेम्परेचर डीफरेंस  खूप जास्त असल्याने हा त्रास जाणवतो. मग आपण एसी न वापरणे बरे नाही  का?

घरी आपण एक साधा घरगुती एसी वापरणे शक्य आहे. एखादी बेड शीट घ्यावी. तिला पाण्याने ओळी करावी. ओळी बेड शीट बेड रूम मध्ये सध्या खुर्चीवर जरी टाकली व पंख सुरु केला तर रूम टेम्परेचर कमी होते. मधून मधून त्या बेड शी ट वर पाणी टाकले तर घरात गारवा राहतो. की महिलांनी कपडे धुतल्यावर ते ओले कपडे टेरेसवर न टाकता रूम मध्ये सुकवायला ठेवले तरी छान वाटते. एसी ची गरज भासत नाही.

तर मित्रांनो वीज बचत अवश्य करा.

आजची ताजा खबर

१. विमानातील १८६ प्रवासी बालंबाल बचावले. – बाप रे! आता  विमान प्रवास ( कोणताही प्रवास) टाळायलाच हवा.

२. मातेच्या दुधामध्ये ‘स्टेम सेल्स’ चा शोध.– हि  फारच छान, कौतुकास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे.

विमान अपघात

काल मेंगलोर विमानतळावर झालेल्या विमान अपघाताने मनाला एक मोठा शॉक बसला आहे. मला १ जाने. १९७८ रोजी झालेल्या बोईंग च्या अपघाताची आठवण झाली. मी तेव्हा ११ वि करून  नुकतेच  इंदोर येथे इन्जिनिअरिंगला एडमिशन घेतले होते.

मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यावर सरळ ते विमान समुद्रात जाऊन पडले होते. क्षणार्धात ३५०-३६० प्रवाशी जाल्सामाधिस्त झाले होते. त्यांची बिचाऱ्यांची काय हो चूक असेल. काय पाप केले असेल त्यांनी कि काळाने एकदम एकाच वेळी त्यांच्यावर झडप मारली असेल.

असे अपघात होतच असतात. आणि जी गोष्ट सतत होत असते त्याचे महत्व कमी होत जाते. रोज रोज मुलाला रागवले तर तो कोडगा होऊन जातो आणि नंतर आपण रागावलो कि त्याला भीती वाटत नाही तो हसतो. तसे ह्या गोष्टींचे असते. आये दिन यदी कुछ  न कुछ घटना होती रही तो कौन ध्यान देगा भाई.

आपण अशा भयंकर  अपघाताच्पासून काही शिकत नाही ( असे माझे मत आहे) म्हणून असे अपघात होत असतात.  आता परवा तेच झाले मेंगलोर विमानतळ जे डोंगर माथ्यावर तयार केले आहे विमान अपघात झाला.

यात सर्वात मोठा प्रश्न मला पडला तो हा कि विमानतळ डोंगर माथ्यावर कसे काय तयार केले गेले. विमानाला रनवे लहान जरी लागत असला तरी तारण घेणे साठी जागा लागतेच. आणि ज्या महाभागाने येथे विमानतळ बांधायचा विचार केला असेल त्याला किंचित हि अशी शंका आली नसेल का एव्हढ्या लहान जागेत विमान उतरविल्याने अपघात होऊ शकतो. मला वाटते आपण आता भावना शून्य झालो आहोत किंवा मानवाचे जीवन कौडीमोल झाले आहे. त्याला काही किंमतच राहिली नाही.

असे कधी होते. जेव्हा एखादी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध होते तेव्हा त्या वस्तूचे महत्व कमी होते हा तर वाणिज्य नियमच आहे. परवाच कोणत्यातरी विषयवरून आम्हा मित्रांची चर्चा चालली होती तेव्हा एक मित्र म्हणाला आपल्या देशात जनसंख्या अफाट असल्याने माणसाचे अवमूल्यन झाले आहे. त्याचे म्हणणे अगदी बरोबर आहे.

शनिवारवाडा

हल्ली कन्येला सुट्या आहेत. एम एस सी च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली आहे. काय करावे म्हणून तिने लायब्रेरी  सुरु केली. पहिलं पुस्तक ऐतिहासिक. रणजित देसाईंच ‘स्वामी’.  तिला इतक आवडल की तिने  दोनच दिवसात संपवलं.

मग तिचा मोर्चा तिच्या आईकडे वळला.

“अग आई तू वाच ही कादंबरी खुपच सुंदर आहे.” असे तिने माझ्या देखतच आईला म्हटले.

मी ऐकून ही न ऐकल्यासारखे केले.

सौ. म्हणाली,” बेटा मला वेळ कोठे मिळतो वाचायला.”

पण तिला राहवले गेले नाही. तिने माझ्याकडे पाहून ( मी हेतूपुरस्कर दुसरीकडे बघत होतो),”पप्पा, तुम्ही सांगा न आईला ही कादंबरी वाचायला.”

मी सुटकेचा स्वास  टाकत सौ.ला म्हटले,” अग वाच न ती कादंबरी. तितकाच आनंद मिळेल आणि वेळ जाईल.”

तिने माझ्याकडे एक खतरनाक कटाक्ष टाकला आणि मी इकडे तिकडे पाहू लागलो.

“अहो इकडे तिकडे काय पहाताय. माझ्याकडे पहा जरा. मला वेळ तरी मिळतो  का?  हे तुमचे घर सांभाळता सांभाळता नाकी नौ येऊन जातात. मग माझे बारा का वाजवून घेऊ हे पुस्तक वाचून.”

आणि मी रंग ओळखून तेथून काढता पाय घेतला.

सायंकाळी घरी आलो. बेल वाजविली. सौ.ने दार उघडले आणि ,”या श्रीमंत.” असे उद्गार काढले. मी एकदम घायाळ. असे काय झाले आज. विचार करू लागताच मला आठवले कि बहुतेक सौ.ने प्रमोद देव साहेबांचे बझ वाचले असावे. कारण ते महिंद्र कुलकर्णींना श्रीमंत या नावाने संबोधतात. पण मी डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही असा  विचार करून विषय सोडून दिला. कारण आज ऑफिसमधून यायलाच ८ वाजले होते. शरीराने थकलो होतोच डोक्यानेही  थकलो होतो.  तिने सुद्धा पुढे विषय काढला नाही.

५ मिनिटांनी मी पाहिले सौ.च्या हातात स्वामी. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.  तेव्हा मला जाणवले की आज  घरी आल्यावर सुद्धा ‘अहो, काही तरी बोला की.’ असा लकडा का लावला नाही त्याचे कारण काय.

मोठ्या मुश्किलीने जेवण मिळाले. जेवण सुरु करण्यापूर्वी ५ मिनिट व नंतर लगेच पुस्तक तिच्या हातातच होते. टी.व्ही. सुद्धा बघितला नाही. पण जेवण सुरु करण्यापूर्वी सौ.चा मोर्चा किचनकडे वळला त्यावेळात कन्येने माझ्या कडे मोर्चा वळविला होता. ‘पप्पा तुम्ही सुद्धा वाचा ही कादंबरी.’

‘बेटा, मला वेळ कोठे असतो वाचायला?’ मी बचावाची भूमिका घेत म्हटले.

पण ती कोठे ऐकणार होती. ‘मी  आता छडी घेऊन बसते.’ असे म्हणून तिने माझ्या समोर पुस्तक ठेवले आणि मला पुस्तक वाचायला भाग पाडले. मी मधूनच एक पान उघडले. तिने परत पुस्तक घेऊन पहिल्यापासून  वाचायला लावले.

आता मी वाचला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य मी वाचण्यात मग्न झालो. खरच अप्रतिम कादंबरी आहे ती.  मी ११ पाने वाचून काढली आणि सौ.ने माझ्या हातून पुस्तक हिसकाउन घेतले आणि वाचायला सुरुवात केली.

थोड्यावेळाने ती म्हणली,” अहो मला शनिवारवाडा बघायचा आहे.”

मी,”अग, अती झोकून घेऊ नको तू स्वत:ला त्या कादंबरीच्या कथानकात.”

मी कन्येकडे बघून म्हणालो,” बरोबर आहे न बेटा. आता ही स्वामी कादंबरी वाचून शनिवारवाडा पहायचा म्हणते आहे. उद्या मी हिटलर ही कादंबरी आणली व तिने ती वाचली तर म्हणेल मला ……………………”


हा हा हा

मध्यंतरी एक बातमी वाचल्याचे आठवते. बातमी अशी होती कि आता नौकरीला लागणरांचे ब्रेन मेपिंग टेस्ट केले जातील. ह्यावर आमची चर्चा सुरु होती तेव्हा माझी कन्या म्हणाली “मग त्या शोले तील जेलर सारखा प्रसंग घडेल ” आधे बायी तरफ जाओ, आधे दायी तरफ जाओ और बाकी मेरे पिछु आओ.”

समजले असेलच, अहो जे हुशार आहेत ते चांगल्या पगाराची नौकरी करतील. आणि जे नको आहेत ते येतील आणि सेलेक्ट होणार नाहीत.

चला हसा बर

आज बोर झालो आहे. थोडा विरंगुळा म्हणून नेटवर काही हसवाहसवीची चित्र शोधली. ती येथे टाकत आहे. पहा व हसा.

अहो पोलीस बुआ मला हि तपासा हो!

कृपया सिगारेट ची थोटकं खाली फेकू नका त्याने आमच्या झुरळांना केंसार होऊ शकतो.( पाहिजे तर खून टाका किंवा खिशात घेऊन जा)

उशिराने सुचलेलं शहाणपण

मला तेथे जायला हि वेळ मिळत नाही हो म्हणून हा खटाटोप

हम भी किसी से कम नही. या पार्ट्यांवर फक्त तुमचीच मक्तेदारी का?

बायकांना काहीही अशक्य नाही हे मात्र नक्की.

अरे आणखी काही शिल्लक आहे का रे तिकडे? आणा बर!

अहो आता कार पार्कींगला जागाच मिळत नाही. म्हणून काय आम्ही कार पार्क करू नये!

‘रवि’ चा प्रकोप

मागील जवळ जवळ महिन्याभरापासून देशातील जवळ जवळ सर्वच ठिकाणांचे तापमान प्रचंड वाढले आहे. याबद्दल रोज बातम्या झळकत आहेत. नाशिक सारख्या ठिकाणाचे तापमान सतत ४० डिग्री पेक्षा जास्त आहे. सकाळी ८ वाजता सुद्धा असह्य उष्णता असते. काल बातमीपत्र माझ्या जन्म गावाचे नाव झळकले होते. ते म्हणजे फैजपूर, जिल्हा-जळगाव. सर्वाधिक तापमान ४८.९ डिग्री.

मी मुंबईला गेलो होतो तेव्हा मित्रांना म्हणालो होतो कि आपल्या भावी पिढीला ५० डिग्री ते ५५ डिग्री तापामानात जगावे लागेल. आणि अहो  काय आश्चर्य काल तापमान ४८ .९ म्हणजे ४९ झाले. आज तर मला एका ने चेट करतांना सांगितले कि महाराष्ट्रातील एका शहराचे तापमान आज ५० डिग्री नोंदले गेले. म्हणजे आपली पुढील पिढी नव्हे आपल्यालाच ५० पेक्षा जास्त तापमानात जगावे लागणार असे दिसते आहे.

येथे एक बातमी देत आहे.

आता पर्यंत पृथ्वीतलावर सर्वात जास्त तापमानाची नोंद आफ्रिकेमधील  लीबियातील अल अझीझिया या ठिकाणी  दि. १३.०९.१९२२ रोजी झाली आहे. आणि नोंदवलेले तापमान होते ५७.८ डिग्री सेल्सियस. आपल्या भारतातील सर्वात जास्त तापमानाची नोंद १०-०५-१९५६ रोजी ची अलवार राजस्थान येथील आहे तापमान ५०.६ डिग्री सेल्सियस.

या बद्दल येथे वाचा

ग्लोबल वार्मींगचे परिणाम आता चांगलेच जाणवू लागले आहेत.  मोठ्या प्रमाणात जन्संख्येची वाढ, त्यामुळे जागेची व्याप्तीत झालेली वाढ, नाव नवीन घरांची निर्मिती, त्यांच्या सुख्सुविधात वाढ जसे रस्ते, वीज, विजेच्या निर्मितीसाठी रोज जळणारा लाखो टन  कोळसा, त्यासाठी लागणारे पाणी, जळालेल्या कोलास्याची लाखो टन राख, व यासार्वांसाठी नाहीसे होणारे जंगल आणि सर्वात शेवटी माणसाची कधी न संपणारी हव्यासी प्रवृत्ती माझ्या मते हि मुख्य करणे आहेत ह्या ग्लोबल वर्मिन्ग्ला कारणीभूत.

त्यामुळे आपल्या हातात ह्यांना कंट्रोल करणे अशक्य आहे. म्हणून ह्या अत्याधिक उष्णते पासून बचाव करणे, विजेची बचत करणे, झाडे न तोडणे, पाणी बचत करणे हे उपाय आपण योजू शकतो असे मला तरी वाटते.

आणि हे केले नाही तर आपली भावी पिढी आपल्या कोसणार आणि आपली आत्मा सुद्धा ह्या उकाड्याने हैराण होणार हे नक्की.