लग्न पत्रिका

लग्न म्हटली कि लग्न पत्रिका आल्याच. पूर्वी घरोघरी गो गावी फिरून अक्षदा वाटून तोंडी निमंत्रण दिली जात असत. साध्या  सुध्या पत्रिका वाटत असत. पण हल्ली पत्रिकेबद्दल होड लागली आहे असे वाटते. भला तुम्हारी साडी मेरी साडी से…………………या आविर्भावात माझी पत्रिका त्याच्या लग्न पत्रीकेपेक्षा सरस कशी राहील याबद्दलची चढाओढ लागलेली दिसते. दरवर्षी करोडो पत्रिका छापल्या जात असतील आणि क्षणार्धात त्यांचा उपयोग नाहीसा होत असेल. इतकेच नाही तर त्यांचा उपयोग संपल्यावर त्या कचऱ्यात फेकल्या जातात आणि त्या पत्रिकेवर छापलेले गणपतीचे फोटो………….

उद्या आमच्या नातेवाईकाकडे मुलाचे लग्न आहे. त्यांनी लग्न पत्रिका  छापल्याच नाहीत. मला याचा फार अभिमान वाटला. जर त्यांनी लग्न पत्रिका छापल्या असत्या तर कमीत कमी ५०० पत्रिका लागल्या असत्या. वजन झाले असते कमीत कमी एक किलो. कदाचित जास्त सुध्दा झाले असते कारण मुलगा आय. टी.  क्षेत्रातला आहे. म्हणजे पत्रिका साधी निश्चितच नसती. आता पत्रिका त्यात दोन जाडजूड पृष्ठे त्यावर लिफाफा. एक किलो कागदाला किती झाड लागले असते. पर्यावरणाचा किती ऱ्हास झाला असता.

कधी कधी असे वाटते आपले पूर्वज खरोखर समजूतदार होते. ज्या रीतीभाती त्यांनी सुरु केल्या आहेत त्या अतिशय योग्य आहेत.

सर्वांनी असा विचार केला तर खूप बरे होईल आणि पर्यावरणाचा र्हास सुध्दा होत नाही.

तरुण पुणे

शेवटी तो दिवस उजाडला आणि मी पुण्याला हजार झालो. तारीख २३ जून २०१०. पुण्यात पाय ठेवला आणि जोरदार पाउस सुरु. खूप मोठ्या काळानंतर पुण्यात प्रवेश केला होता. म्हणून सर्व नवीनच वाटत होते. बाहेर मोठा मोठ्या इमारती दिसत होत्या. बघितले तर चाकण . आता चाकण पासूनच पुणे जवळ आले आहे याची चाहूल लागायला सुरुवात झाली. आणि नाशिक फाट्यापासून तर पुणेच. एके काळी खडकी वगैरे भाग मोकळा दिसायचा. गावासारखे वातावरण असायचे. आज ते शहर बनलेले दिसले. नाही असे म्हणणे योग्य होणार नाही. खडकी हे शहराच्या चादरी खाली झाकले गेले आहे. एकूण म्हणजे पुण्याची कायापालट झाली आहे. अप्रतिम रस्ते आहे. कोठे हि घाण दिसत नाही. सर्वत्र शिस्तबद्धता दिसून येते.

कायापालट झालेल्या ह्या नव्या युगाच्या जवान शहरामध्ये आपले जुने ऑफिस कोठे आहे शोधून काढले. राहायची व्यवस्था एका पुणेरी पण अतिशय सुंदर स्वतः आणि मस्त लॉजमध्ये झाली मासिक तत्वावरच. मयूर कालोनी हा खुपच सुंदर परीसर वाटला. बघता क्षणी  मनामध्ये भरला. सकाळी आंघोळ आटोपून बाहेर फिरायला निघालो समोरच कर्वे रोड वर पेशवेकालीन शंकराचे पाषाणाचे देऊळ आहे.  तेथे झाडच झाड आहे. वातावरण प्रसन्न वाटते. देऊळात गेलो नमस्कार केला आणि बसलो ओंकार करीत. मग थोडा वेळा समाधिस्त झालो. वेळ कसा गेला कळलेच नाही. मन प्रसन्न झाले.

एक मात्र मला प्रकर्षाने जाणवले कि पुणे जे एके काळी पेंशनाराचे शहर म्हणून ओळखले जायचे ते आता तरुणांचे शहर बनले आहे. त्यापेक्षा असे म्हटले कि पुणे आता तरुण झाले आहे तर जास्त योग्य होईल. कारण जिकडे तिकडे तरुण मुल मुलीच दिसतात. शिक्षणाचे माहेर घर असल्याने जास्तीत जास्त तरुण  शिक्षणासाठी येतात. आय टी चे मोठे क्षेत्र असल्याने ही तरुण येतात( कारण ते क्षेत्र फक्त तरुणांसाठीच आहे असे वाटते.)

सांगायचा तात्पर्य असा कि पुणे तरुण झाले आहे व ते चिरतरुण राहो.

मला  मनापासून आवडले आहे  हे पुणे शहर.

मी पुणेकर होतोय!

चिमणी पाखर काही दिवस एका झाडावर घरट करुन राहतात. तेथील दानापाणी संपल की ते आपल गर सोडुन जेथे दानापाणी मिळेल तेथे जाऊन राहतात. पण नौकरदारांच अस नसत. नौकरी म्हटली की बदली ही आलीच. एकाच ठिकाणी जास्त वेळ रहाता येत नाही. माझे ही तेच झाले आहे. कालच कळले की माझी बदली पुण्याला झाली आहे. मी आनंदित झालो. पुण्यासारख्या शहरामधे रहाणे म्हनजे मागच्या जन्मी आपण काही तरी पुण्य केले असावे असेच आहे. नावाजलेले शहर आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणुन ही ख्याति प्राप्त झाली आहे ह्या शहराला.

१३ मे १९८५ रोजी मी खाजगी कंपनी सोडुन सरकारी कार्यालयात रुजु झालो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असल्याने पाट्बंधारे खात्यात जल विद्युत शाखेत नौकरी मिळाली. राजपत्रित अधिकारी म्हणुन नौकरी असल्याने अत्यानंद झाला. लहाणपणी मी जेव्हा अभियंत्यांकडॆ अटेस्टेशन करायला जात होतो तेव्हा मला त्यांचा हेवा वाटत होता. आज आपण राजपत्रीत अधिकारी होत अस्ल्याचा आनंद मिळत होता. म्हणुन लगेच नौकरी पकडली.

नौकरीला लागलो ते डिजाईन चे ओफ़िस होते. सुरुवात डिजाईन इंजिनिअर म्हणुनच झाली. मुळात पिंड काम करण्याचा. लहाणपणापासुनच कामे करुन घराला् हातभार लावला होता. खरे सांगायचे तर इंजिनिअरिंग सुध्दा ट्युशन करुन, कंपनीत नौकरी करुन पुर्ण केले होते. तोच कामाचा पिंड सुरु ठेवला. आज ही आहेच. याचा फायदा असा झाला की कामामध्ये कधीच अडचण आली नाही. कसे ही आणि किती ही कठीण काम असले तरी ते करू शकतो असे मला वाटते.

मुंबईचे आकर्षण कोणाला नसते. मला ही होतेच म्हणून पहिल्या प्रथम मुंबईमधील कार्यालातच नौकरी मिळाली. तेथूनच सुरुवात झाली. १९८५ ते २००३ मुंबईमध्ये कार्यरत होतो. नंतर नाशिक येथे बदली झाली. काम पूर्णतया वेगळे होते. तरीही successfully पार पडले.  आज सकाळीच मी नाशिक येथून सुटलो. २३ जून रोजी पुणे येथील कार्यालयात हजार व्हायचे आहे. तेथे सुध्दा चेलेन्जिंग जोब आहे असे आज मला एक सहकारी बोलून गेला. मनाची तयारी आहेच. मुंबई जसे आवडत होते तसे पुणे सुध्दा आवडीचे शहर आहे. त्यामुळे आता पुण्याला जायचे वेध लागले आहेत. नवीन कार्यालय असेल. नवीन सहपाठी असतील.

राहायची व्यवस्था अद्याप झालेली नाही. ती करावी लागेल. कसे होईल देव जाणे. असो देव आपल्या पाठीशी आहेच.

लहरी पाऊस?

खरच पाऊस आता लहरी झाला आहे असेच सर्वांचे मत झाले असावे, कारण तो पूर्वी सारखा येतच नाही. अचानक एके दिवशी खूप पडून जातो. अचानक शहरांमध्ये  रस्त्यांवर नद्या तयार होतात, लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसते. मुंबईमध्ये तर लोकांना पावसाला काढणे कठीण होऊन जाते. २६ जुलाई २००६ तंतर पावसाला आला कि सर्वांना चिन्ता होते.

पण हल्ली शहरांमध्येच जास्त पाउस का पडतो. हा विचार वारंवार माझ्या मनात येत असतो. परवा टी. व्ही. वर एक रिपोर्ट पहिले. कोंकणात मागच्या तीन वर्षापासून पाऊस कमीच पडतो आहे असे त्या रीपोर्टवरून  समजले. मला प्रश्न पडला कोंकण तर पावसाचे माहेर घर.

मग या विषयावर मी मनन सुरु केले. सुरुवात पाऊस कसा तयार होतो कसा पडतो या पासून केली. अचानक टी.व्ही. वर चेनल बदलत असतांना या बद्दल च एक कार्यक्रम सुरु होता. लहान मुलांना पावसाबद्दल सांगितले जात होते. पावसाचे ढग तयार होतात व हवे बरोबर उडत उडत रस्त्यात त्यांना जे अडथळे येतात तेथे ते थांबतात व पाऊस पडतो. असे अडथळे म्हणजे डोंगर. कोंकण पट्टी समुद्राला लागून असल्याने कोंकणात जास्तीत जास्त पाऊस पडत असतो.

जे ठिकाण डोंगराला लागून असते त्या ठिकाणी जास्तीचा पाऊस पडतो हे आपल्याला माहित आहे. त्याचे कारण पावसाचे ढग  डोंगराने  अडविले जातात. मग आता काय झाले कि पावसाचे ढग त्या डोंगरापर्यंत पोहचत नाहीत. याचा विचार केल्यावर कारण  लक्षात आले. माझ्या मते त्याचे मुख्य कारण असावे मुंबईतील मोठ मोठ्या इमारती. समुद्रावर तयार होणारे पावसाळी ढगांची  ह्या उंच इमारतींशी टक्कर होत असावी आणि त्यामुळे पाऊस मुंबईतच कोसळत असावा. ते पावसाचे ढग येथेच रिते होत असावे म्हणून कोंकणात पावसाचे प्रमाण कमी झाले असावे.

माझे विचार काही सुविद्य मित्रांना पटणार नाहीत याची मला खात्री आहे. त्यासाठी मी एक पुरावा देतो.

मुंबई येथून नाशिकला येतांना मध्ये कसारा घाट पडतो. पावसाळ्यात ह्या घाटात घट्ट धुके असते. प्रत्यक्षात ते धुके नसून ढग असतात. समुद्रावरून जे ढग कसारा पर्यंत येतात ते घाटातील डोंगराला आढळून कोसळतात आणि त्यातील थोडे पाणी वर इगतपुरी या ठिकाणी कोसळते. त्या पुढे घोटी भागात फक्त पाण्याचे तुषारच कोसळतात. कारण तेथ पर्यंत जी ढग पोहचतात त्यांच्यात पाणी शिल्लक राहताच नाही. म्हणून नाशिकला पाउस कमी पडतो. जो काही पाऊस येथे पडतो तो पश्चिमेकडून येतो.  नाशिकच्या पश्चिमेकडे डहाणू आहे आणि समुद्र आहे. त्र्यम्बकेशवर येथे खूप पाऊस पडतो.

आता तर मुबईमध्ये जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारत तयार होत आहे.

मला वाटते मानवाने निसर्गाशी खेळून खेळून आता निसर्ग कोपला आहे आणि म्हणून तो मानवाच्या जीवाशी खेळत आहे.

पूर्वी पाउस विखुरलेला असायचा. शेतीला भरपूर पाणी मिळायचे. आता जेथे गरज नाही तेथे पाउस पडतो आणि जेथे खरी गरज आहे तेथे तो दर्शन सुध्दा द्यायला नाकारतो.

यावरून विचार करायला हवा खरोखर पाउस लहरी आहे का?

का माणसाचा लहरीपणा निसर्गाला नडत आहे?

असो! हे माझे वैयक्तिक विचार आहे.

(All images from Google image)

किती दिवस?

प्रमोद देव साहेबांनी ऋतू  हिरवा ह्या  पावसाळी अंकासाठी बऱ्याच दिवसांपासून आप आपले लेख पाठविण्यासाठी विनंती केली होती. बऱ्याच लेखक आणि कवींनी आपल्या कविता/लेख पाठविले. काल रात्री १२ नंतर  देव साहेबांनी तो अंक प्रकाशित केला. मी रात्री उशिरा पर्यंत नेटवर बसलो होतो. तेव्हा तो अंक वाचला. अतिशय सुरेख मांडणी झाली आहे त्या अंकाची. याबद्दल देव साहेबांचे अभिनंदन! अक्षरश: पावसाला सुरु आहे कि काय असा  भास  होतो तो अंक वाचतांना.

रात्रीच मला ऋतू हिरवा वाचतांना माझ्या कन्येने ( जीवनिका कोष्टी) लिहिलेली कविता दिसली. आणि मग आठवले कि तिने एक कविता पाठविल्याचे मला सांगितले होते. पण हल्ली मी आपल्यात च नसल्याने विसरलो. माझी बदली पुणे येथे झाल्याचे कळल्यापासून मन जागेवर नाही. आता वेळ जवळ येत चालली आहे. त्यामुळे जास्तच मन उद्विग्न होत आहे.

असो. माझ्या मुलीची कविता “किती दिवस” या शीर्षकाने तिने पाठविली आहे. अप्रतिम कविता लिहिली आहे तिने. मी स्वतः कविता करीत असतो त्यामुळे मला कवितेत रस आहे. पण माझी सुकन्या इतकी छान कविता करू शकते हे मला माहित नव्हते. तशी तिने लहान असतांना म्हणजे ५-६ वर्षांची असतांना माझ्या तोंडून माझ्या कविता ऐकल्या होत्या. एके दिवशी आम्ही सहकुटुंब फिरायला गेलो असतांना तिने मला चालता चालता सहज एक कविता ऐकविली होती. पण मी ती लक्षात ठेऊ शकलो  नाही. त्यानंतर तिने लहान पाणीच स्केच काढायला सुरुवात केली होती. बरीच वर्ष मी ती स्केच सांभाळून ठेवली होती. पण कल्याण येथून नाशिकला शिफ्ट झालो तेव्हा ती हरवली. आता तिने स्केच काढायचा छंद पुनः जोपासला आहे. तसेच कविता लिहिण्याचा छंद  हि सुरु केला आहे. मला मनापासून आनंद होत आहे.

कालच तिची कविता प्रसिध्द झाली आणि मी ती माझ्या फेस बुक वर प्रसिध्द केली. आज सकाळीच मला माझे उज्जैन (मध्य प्रदेश) येथील एक मित्र श्री विनय वैद्य यांचा एक मेल आला. त्यांनी ती कविता हिंदी भाषेत भाषांतरीत करून मला पाठविली व ती कविता त्यांच्या ब्लोगवर प्रसिध्द करण्याची परवानगी मागितली होती. मी कन्येला विचारले आणि त्यांना होकार दिला. त्यांनी  त्यांच्या ब्लॉगवर ती हिंदीतील कविता प्रसिध्द केली आहे. त्यांच्या ब्लॉग ची लिक येथे देत आहे. जरूर वाचा कारण त्यांनी सुंदर भाषांतरण केले आहे.

मला माझ्या मुलीच्या प्रथम आणि अप्रतिम कवितेच अत्यानंद होत आहे. म्हणून ही पोस्ट टाकली आहे. जीवनिकेचे अभिनंदन!

आला पावसाळा

पावसाला आला कि मुंबईकरांची त्रेधा तीरपिट उडते.  या पावसाळ्यात २६ जुलाई झाली नाही म्हणजे मिळविली असे सर्वांना वाटत असते. सर्व मुंबईकर देवाला नमन करतांना ‘देवा, हा पावसाळा व्यवस्थित जाऊ दे रे बाबा गजानना.’ अशी विनवणी करीत असावेत. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आता पुढे काय होणार देवच जाणे.

पण फक्त आपल्याच कडे २६ जुलाई सारखे  होत नसते. इतर देशांमध्ये सुध्दा अशी परिस्थिती पाहायला मिळते. शेवटी माणूस येथून तिथून सारखाच आणि इतकेच नव्हे तर पाउस सुध्दा सारखाच.  तर मंडळी हे चित्र बघा आणि तुलना करा.

पाणीच पाणी चोहीकडे

तेरा भी जवाब नही दोस्त!

ह्यांच्या हिंमतीची दाद द्यायलाच हवी!

ह्याचा जीव केव्हढा, पाणी केव्हढे आणि गाडी केव्हढी !

हा भाऊ पाणी  नरड्यपर्यंत येण्याची वाट पाहत असावा  किंवा कंजूस तरी असावा!!!

अरे, सोड आता तरी सोड तिला!

खड्डे फक्त आपल्याकडील रस्त्यांवरच असतात असे तुम्हाला वाटत असेल तो तुमचा गैर समज आहे. या या रस्त्याकडे पहा जरा!

अरे हम भी कुछ कम नही!

मग आता तरी मत परिवर्तन झाले न! आपल्याकडेच आपले हाल होतात असे नाही न वाटत आता. दुसऱ्यांचे दुख बघून आपले दुख कमी वाटते न! मी मुंबईकरांना विचारला बर का हा प्रश्न !


वाटर हार्वेस्टींग

आता पावसाळा सुरु झाला आहे.  या वर्षी पाऊस चांगला येईल अशी अपेक्षा आहे. पण तरी ही आपले सामाजिक कर्तव्य म्हणुन शक्य तितके पावसाळी पाणी वाचविले तर चांगले. रेन वाटर हार्वेस्टींग हे योग्य पाईप लाईन टाकुन टाकी तयार करुन करता येते. पण असे काही ही न करता किंवा कोणता ्ही अतिरिक्त खर्च न करता ही रेन वाटर हार्वेस्टींग केले जाऊ शकते. मी स्वतः ते केले आहे. दोन वर्षा पुर्वी केले होते. मगच्या वर्षी पाऊसच आला नाही त्यामुळे करु षकलो नाही. या वर्षी मी घरी नसणार पुण्याला बदली झाली आहे न!

चला आता मी उपाय योजना सन्गतो.

शहरा मधे जवळ जवळ प्रत्येक फ़्लेट्ला टेरेस किंवा बाल्कनि असतेच. या टेरेस मधे आपण सहज पाणी साठवु शकतो. जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा या टेरेसचे ड्रेन पाईप्चे तोंड बंद करावे. कशाने करावे? काय राव आता हे सुध्दा मला सांगावे लागेल का? जे साधन मिळेल त्याने ते बंद करावे   आणि शक्य असेल तितके पाणी साठवावे.  अर्थात टेरेस्च्या क्षमतेप्रमाणे. मग हे पाणी घरातील एखाद्या प्लास्टिक च्या मोठ्या टाकीमधे ओतुन घ्यावे. हे काम मात्र जिकिरिचे आहे. एका वेळी २०० लिटरपेक्षा जास्त पाणि साठा होतो.  एका समजुतदार कुटुंबासाठी २ दिवस ह्या पाण्याचा वापर सहज होऊ शकतो.

वीज निर्मितीचे पर्याय

वीज निर्मितीचा सर्वात स्वस्त व मस्त मार्ग म्हणजे हायडल प्रोजेक्ट. कारण यासाठी कोणत्याही फ्युअलची आवश्यकता नसते. निसर्गाकडून उपलब्ध होणार्या पाण्याचा उपयोग केला जातो. पाणीच त्या प्रकल्पाचे फ्युअल असते. आणि आता कोळसा संपत चालला आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोळसा आयात करावा लागतो. कधी तरी कोळसा

Hydro Power

संपेल तेव्हा सर्व थर्मल प्रोजेक्ट बंद पडतील आणि आपल्याला २४-२४ तास लोड शेडींग मध्ये राहावे लागेल.

कोळ्स्याने प्रदुषण वाढते. त्याने ग्लोबल वार्मिन्ग होते. फार पुर्वीपासुन मानसाने जर जल विद्युत निर्मितीवरच भर दिला असता तर प्रदुषण व

Dam

ग्लोबल वर्मिंग ही झाले नसते आनि आज सुध्दा पाउस व्यवस्थित पडला असता. त्यमुळे आपल्याला पाण्याची चणचण भासली नसती. महत्वाचे म्हणजे जो पर्यत ही प्रुथ्वी आहे तो पर्यन्त पाणी म्हणजे पाऊस हा पडणारच. पाणी तर पंच महाभुतांपैकी एक आहे आणि कधी ही न संपणारे आहे. पण आपण त्याचा विचार न केल्याने आज आपणाला पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे.
जवळ जवळ सर्वच धरणांवर हायडल प्रोजेक्ट सुरु केले जाऊ शकतात. जेथे शक्य असेल तेथे धरणाच्या पायथ्यापासून  वीज निर्मिती व नसेल तेथे सायफन पद्धतीने पाणी घेऊन. कोल्हापूर बंधारे बांधून वेगळीच. नदीवर ती जितक्या लांब आहे तितक्या लांब पर्यंत जेथे हेड मिळत असेल तेथे बंधारे बांधून पाणी अडविले तर वीज निर्मिती व जमिनीचे जलस्तर तसेच पिण्याचे पाणी तिन्ही फायदे होऊ शकतात. आणि हो मुंबईच्या खाडी मध्ये सुद्धा. कारण ती दोन्ही दिशेला सतत

Buildings

वाहत असते. याशिवाय उष्ण पाण्याच्या झरयांवर सुद्धा वीज तयार केली जाऊ शकते. इतकेच नाही तर माझी एक आणखी कल्पना आहे ती अशी कि मुंबई मध्ये मोठ मोठ्या इमारती आहेत त्यातून रोज जे पाणी ड्रेन होते ते साठवून त्या पासून वीज निर्मिती केली जाऊ शकते. समुद्राच्या सर्फेसचे पाणी व तळातील पाणी यांच्या तापमानात खूप तफावत असते त्यापासून  सुद्धा वीज तयार केली जाऊ शकते. सोलर पेनल जर प्रत्येक मोठ्या इमारतीच्या  दक्षिण दिशेच्या भिंतीवर जर ह्या पेनल  बसविल्या तर भर्पुर प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकेल. असे वीज निर्मिती चे भरपूर मार्ग सापडतील. माझ्या कडे आहेत सुद्धा.

नो पार्किंग हिअर

लेखाचे हेडिंग वाचून धक्का बसला असेल. असला तर ठीक बसला नसला तरी ही ठीक. हा लेख वाचला तरी ठीक न वाचला तरी ठीक. पण मी काय म्हणतो तुम्ही हा लेख न वाचालेलाच बारा. सॉरी मला ‘बरा’ असे म्हणायचे होते. उगाच कोणाचे बारा वाजवायचे नाही हाय मला. जाऊ द्या उगाच विषय भरकटतो आहे. टाईम पास नको चला तर मग सुरुवात करू या!

या पृथ्वीवर माणूस कोणत्याही कोपर्यात राहत असला तरी तो माणूसच असतो. मग तो आपल्याकडील एखाद्या खेड्यात राहणारा असो कि शहरात! किंवा अमेरिकेतील एका खेड्यात राहणारा असो कि शहरात. शेवटी तो माणूसच न!आणि म्हणूनच अशा गमती जमाती घडत असतात.

बाप रे!

बहुतेक याचे सासू बाईंशी पटत नसेल! पण याची बायको याचे काय हाल करत असेल!

या पेक्षा कार नसलेली बरी.

ह्या जागेचा मालक बहुतेक माथेफिरूच असेल!

आज्ञा धारक बाळ!

थांबू का जाऊ?