वृक्षारोपण


कालच एका मोठ्या समारंभात

एका मोठ्या मानसाच्या हातुन

रस्त्याच्या कडेला एका मोठ्या

झाडाच्या छोट्या रोपटाचे रोपण झाले.

 

आज  त्या चिमुकल्या रोपट्याने

मान टाकलेली पाहुन मन विषन्न झाले.

त्याची ती कोमेजलेली पानं

पाहुन मला किव आली.

जणु तो मला खुणावुन सांगत होता

विनवणी करित होता

“कोणी तरी पाणी पाजा हो मला मरण्यापुर्वी,

मी जगलो तर मोठा होऊन

तुम्हाला घनदाट सावली देईन,

फळ देईन.

तुमच्या मुला बाळांनाच  नव्हे

तर

तुमच्या नातवंडांना ही

आपल्या घनदाट सावली खाली खेळविन

त्यांना चाखायला सुमधुर फळ देईन.

 

पण मी मोठा झाल्यावर

शहर ही मोठ झालेल असेल

जनसंख्या वाढली असेल

रस्त्यावर वावरणारी वाहनं

वाढली असतील

आणि रस्ता रुंदीकरण करतांना

माझा कोणी जीव घेतला

तर मला दोष देऊ नका हो.

जिवंत राहिलो तर मी

दिलेला शब्द जरुर पाळीन वचन देतो.

 

ह्या लोकांना कळत कसे नाहीहो

शहर अफाट वाढ्त आहेत,

गावं ओस पडत आहेत

गावं आता म्हातारी झाली आहेत

तेथे वडिलोपार्जित घर सांभाळायला

व शेतीची ओसाड  जमिन सांभाळायला

आता फक्त म्हातारी मानसच उरली आहेत.

 

शहरं जवान होत आहेत

गावकरी या शहरात

कॉक्रीटच्या जंगलात

येऊन उदर निर्वाह करीत आहेत,

कोणालाही भविष्याची काळजी वाटत नाही हो

शेतीच राहिली नाही तर

शहर जगतीलच  कशी?

 

मी अचानक भानावर आलो

आणि

त्या रोपट्याचे तत्वज्ञान ऐकून

लगेच तेथून पळालो

घरी जाऊन पाणी आणले

व त्या रोपट्याला पाजले

त्याची पाने लगेच टवकारली

रोपटे प्रसन्न झाले

मी ही आनंदलो

आणि त्याचे उरलेले

तत्वज्ञान सुरु होण्या पूर्वीच

मी तेथून काढता पाय घेतला.

4 thoughts on “वृक्षारोपण

  1. वृक्षारोपण ही कविता वाचून खुप आनंद वाटला.
    या पुढे अशाच कविता तुम्ही लिहिणार अशी अपेक्षा करतो.
    …………………………… सागर टोचे, सुनील हिवाले, अमित मालपुरे.

    Like

    • तुम्ही सर्व अजून हि माझी आठवण काढतात, माझा ब्लोग वाचतात आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देतात यातच मी धन्य झालो. मला तुम्हा सोबत आणखी काही दिवस काम करायचे होते पण… जशी त्याची इच्छा. असो असेच माझे लिखाण वाचावे व आपली प्रतिक्रिया देत राहावी हीच इच्छा.

      Like

    • आपण माझी कविता वाचली आणि मनापासून त्यावर प्रतिक्रिया दिली याबद्दल धन्यवाद. असेच ‘माझ्या मना’ला आपण भेट देत रहावे हीच अपेक्षा.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s