याचे कारण काय?


 

२-३ दिवसांपुर्वी टी.व्ही वर एक बातमी झळकली होती. ती अशी की दिल्ली मधे एक शाळकरी मुलगी शाळेच्या बस मधुन पडली आणि बस च्या चाकाखाली चिरडुन मेली. बातमी ऐकुन मनाला हळ्हळ वाटली. पण बातमी बघीतली आणि तसेच आपण टी.व्ही समोर बसुन बातम्या ऐकत राहिलो तर काही वेळाने ती बातमी नाहीसी होते. ते टी.व्ही. वाले ही विसरतात आणि आपण ही ती बातमी विसरुन जातो.

एव्हढा मोठा, अफाट जन्संख्येचा हा आपला देश त्यात रोज कित्येक लोक मरत असतील, कित्येक अपघात होत असतील प्रत्येकाची बातमी टी.व्ही. वाले देत राहीले तर २४ तास कमी पडतील. त्यांचा तो व्यवसाय आहे ते एकाच बातमीवर अडुन बसु शकत नाही, म्हणुन त्यांना पुढे शरकाव लागत. जनतेला ही वेळ नसतो, दैनंदिन कामं असतात. म्हणुन अशा बातम्या वाचतात ऐकतात आणि पुढे निघुन जातात म्हणजे आप आपल्या कामाला लागतात. अडकुन पडतो तो ज्याचे नुकसान झाले आहे. ज्याची मुलगी दगावली आहे त्या अपघातात. आयुष्याभर तो त्या मुलीची आठवण काढत असतो आणि रडतो. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, कर्माला दोष दे असेच करत असतो.

पण अशा घटना का घडतात ह्याचा विचार कधीच कोणी का करित नाही हा प्रश्न माझ्या मनाला कायम पडत असतो. वेडे मन माझे. आज टी.व्ही.वर बातम्या बघत होतो. देश भरामधील मोठ्या शहरांमधे शाळकरी विद्यार्थी शाळेत कसे जातात हा त्यांचा विषय.मुलांना रिक्षामधे कसे कोंबले जाते, व्हेन मधे किती मुल बसतात.यात दोष नेमका कोणाचा म्हणावा. रिक्षावाल्याचा कारण तो क्षमतेपेक्षा जास्त मुल बसवितो, पालकांचा कारण त्यांच्या समोरच रिक्षा मधे मुलं कोंबली जातात तरी ही ते काना डोळा करतात किंवा आपला खिसा मोकळा सोडुन रिक्षावाल्याला परवडेल इतके भाडे देऊन आपल्या पाल्यांना सुरक्षित शाळेत सोडण्यासाठी बाध्य करित नाहित व आपली जवाबदारी शाळेवर टाकायचा प्रयत्न करतात, किंवा त्या रिक्षावाल्यांना जे पालकांना कमीत कमी भाड्याचे आमिष दाखवुन जोखीम उचलतात.

पालकांनी एक विचार करायला हवा की आपण जेव्हा मिटर प्रमाणे रिक्षाने प्रवास करतॊ तेव्हा आपल्याला किती भाडे पडते? त्याप्रमाणे रिक्षावाल्यांशी बोलणी करुन ५-६ विद्यार्थ्यांमधे विभागणी करुन बंधनकारक करावे. मला वाटते रिक्षावाल्याला पुरेसे भाडे मिळाले तर तो कमीत कमी मुलांना घेऊन जाईन व आपली जोखिम कमी करिन.

आम्ही लहान होतो तेव्हा शाळेतील प्रत्येक वर्गात ३०-४० मुले असायची. जसजसे आम्ही मोठे होत गेलो व लहान वर्गातील मुलांच्या क्षमतेबद्दल माहिती मिळत गेली आम्ही हैराण व्हायला लागलो. ५०-५५-६० मग तो आकडा ८-९०-१०० पर्यंत गेला. आता तर म्हणे एका वर्गात कमीत कमी १२० मुल असतात. वर्ग तेव्हढेच पण विद्यार्थी दुपटीपेक्षा जास्त. म्हणजे वर्गात सुदधा मुलांना कोंबलेलेच असते असे म्हणावे लागेल. हि अवस्था आहे मोठ्या कॉलेजच्या वर्गांची. आपण भारतीय आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा कायम प्रयत्न करीत असतो. पण संकट येऊन नये यासाठी काहीच उपाययोजना करायचा प्रयत्न करीत नाहीत. मुलांची शंख्या वाढली म्हणून एक-एका वर्गात जास्त मुल बसवायला सुरुवात झाली.

पण या मागचे कारण काय? त्यावर काय उपाय करता येईल? याचा विचार कधीच होतांना दिसून येत नाही.

याचा विचार पालकांनी करायला हवा. अहो ज्या झपाट्याने जनसंख्या वाढते आहे त्यानुसार लवकरच एका वर्गात १५०-१७५ मुलांना बसवावे लागेल किंवा शाळांना शिफ्ट मध्ये चालवावे लागेल. सॉरी मध्यंतरी एका शाळेच्या प्राध्यापकाने असे सांगितले कि त्यांच्या शाळेत तीन शिफ्ट मध्ये विध्यार्थी येतात. त्याच प्रमाणे शिक्षकांना सुध्दा तीन शिफ्ट असतात, जर सर्व शिक्षक एकावेळी शाळेत आले तर त्यांना बसविणे शक्य होणार नाही.

तर मित्रांनो या परीस्थितीचा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि जनसंख्या कशी आटोक्यात राहील ते पहायला हवे.

लवकरच २०११ ची जनगणना प्रक्रिया पूर्ण होणार आहेच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s