निशब्द

जिकडे पहावे तिकडे

एकच चित्र दिसत आहे,

कोन्क्रीट च्या इमारतीच-इमारती दिसत आहेत,

माणसांचे लोंढेच लोंढे,

हिरवळ नाही

जंगल नाही

पशु नाही पक्षी नाही,

इतकेच काय पाणी हि नाही,

वृक्ष तोडीने हैराण

धरणीचा श्वास गुदमरलेला पाहून

शब्दच फुटत नाही तोंडातून

निशब्द होऊन जात आहे

मन माझे.

कल्लोळ भावनांचा

जेव्हा जेव्हा तुझी न माझी गांठ पडते

माझ्या मनात

असंख्य भावनांचा कल्लोळ उठतो

मनातील भावना

शब्द रूपात बाहेर येण्यास आतुर होतात

पण तू

माझ्या मनातील भावनांना

कोणत्या मापदंडाने मोजाशील

तुला माझ्या भावना पटतील का नाही

ह्या भावनेने

मी प्रत्येक वेळी निशब्द होऊन जातो

मग मला वाटते

तू माझ्या चेहर्यावरील

हाव भाव ओळखशील

वाचशील

आणि ह्या भावनेने

मी पुनः शांत होऊन जातो

तुझ्या चेहऱ्यावरील

हाव भाव वाचायचा

प्रयत्न करतो

पण तो निर्विकार चेहरा पाहून

मन विषण्ण होऊन जाते.

शब्द

माझ्या अंतर्मनातील कल्लोळ

त्याचा अंतर्नाद

तुला कधीच कळला नाही,

उलगडलाच नाही तुला कधी

माझ्या मनाचा भाव

मी

आपले विचार

आपल्या मनाच्या भावना

कधी मांडूच शकलो नाही

तुझ्यासमोर

अलंकृत शब्दात.

पण तू

तुही

कधी वाचून घेतले नाही

माझ्या चेहऱ्यावरील भाव

ज्यांना अलंकारांची गरजच नसते मुळी.

मी भोळा

मला सुध्दा

कळलेच नाही कधी

मनातील भाव

शब्दात व्यक्त कसे करतात ते

मला वाटायचे

तू माझा चेहरा वाचशील

आणि

माझ्या मनाला समजून घेशील

मी तुझ्या प्रतिसादाची वाट बघत राहिलो

आणि

एके दिवशी मला तुझ्या लग्नाची वार्ता कळली

आणि माझे मन विषण्ण झाले.

तेव्हा हि मला शब्दात

आपले दुख व्यक्त करता आले नाहीच

फक्त दोन अश्रू

डोळ्यातून वाहून गालावर घरंगळले

आणि मी

शब्द शोधात राहिलो

तू भेटल्यावर भावना व्यक्त करण्यासाठी.

40,000

४०,०००/-

अहो असे गोंधळून जावू नका. हे मी काही रुपये मोजत नाही आहे. तुम्हाला काय वाटले? मी ४०,००० रुपये वाटतो आहे. अहो हा आकडा तो आकडा पण नाही बर का. राम राम मी तर त्या आकड्याचा कधी  विचार सुध्दा केला नाही हो आयुष्यात. हा तर मित्र हो, हा ४०,०००/- चा आकडा आहे माझ्या चाहत्यांचा. माझ्या मनाला भेट देणार्या मित्रांचा. तसा हा आकडा इतर ब्लॉगर्स च्या आकड्यांच्या तुलनेत खुपच लहान आहे. पण तरी हि मन समाधानी आहे. आनंदी आहे.

मित्रांनो जेव्हा मी ब्लोग लिहायला सुरु केले तेव्हा कल्पना हि नव्हती कि आपण इतके मित्र जमवू शकू. आपले विचार लेखन रुपात प्रकाशित करू शकू.

मी आपण सर्वांचा आभारी आहे.

आता मनात एकाच इच्छा आहे. आपल्या कवितांचे एक पुस्तक प्रकाशित करावे.

डोकेदुखी

पुण्याला राहायला आलो आणि बी एस एन एल कडे फोन साठी अर्ज केला अपेक्षित नसतांना दुसरयाच  दिवशी घरी फोन लागला. ऑफिसमध्ये असतांना मोबाईलवर एक कॉल आला. लगेच कट झाल्याने मला मिस कॉल कोणी दिला असावा. असा विचार करत होतो आणि परत कॉल येण्याची वाट बघत होतो. पण तो न आल्याने मीच केला तर तो घरी लागला. कन्येने उचलला. लगेच मी नंबर सेव केला. सायंकाळी घरी आल्यावर मोबाईल वरून तो नंबर लाऊन बघितला तर लागत नव्हता. काही कळेना. मग लेंड लाईन वरून मोबाईलवर लावला तर नंबर वेगळाच होता. काही समजले नाही. नंतरचा नंबर मात्र अध्याप आहे.

पण तो नंबर एक डोकेदुखी ठरला आहे. त्यावर रोज फोन येतात. “प्रवीण भाई है?”

“प्रवीण भाई, शक्कर भेज दो १० किलो.”

रोज २-३ कॉल येतच असतात.  सौ. तर वैतागल्या आहेत. पण त्यांचा वेळ चांगला जातो. त्यांना मी म्हटलं फिरकी घ्यायची समोरच्याची.

“आपको क्या क्या चाहिये? लिस्ट बना दो. सामान घर पे पाहूच जायेगा.” असे म्हणायचे.

एकदा म्हणे एक फोन आला, “माझ्या कडे पाहुणे आले आहेत मुलीला बघायला. सामानाची यादी घ्या आणि लगेच सामान पाठवा.” सौ. णे रोंग नंबर म्हणून सांगितले. बिचारे किती त्रास झाला असेल त्यांना.

एकदा मी घरी असतांना असाच फोन आला. “प्रवीण भाई है?”

मला वाटले मी ऐकतांना चुकलो. त्याने माझेच नाव घेतले. “हा कहिये.” मी म्हटले.

“हा प्रवीण भाई वो फिनाईल की १० बोतल भेज देना जल्दिसे.”

“आपको कोण चाहिये?”

“प्रवीणभाई”

“मै रवीन भाई बोल रहा हू.”

“माफ करना भाई भूल हो गई.”

आणि मी फोन ठेऊन दिला. असा हा फोन म्हणजे एक डोकेदुखी असतो.

भविष्यकालीन जीवन

आपल्या संस्कृतीत एकदा लग्न झाले की आपली पत्नी, मग मुल, आपला संसार यात मनुष्य गुंतून पडतो. त्यांच्यासाठी झटणे हेच माणसाचे कर्तव्य असते. पण पुढे काय वाढून ठेवले आहे हे ह्या ज्योक वरूनच लक्षात येईल.

मी दोन मुलांना बोलतांना ऐकले. एक दुसर्याला मोबाईलमध्ये आलेला एस एम एस वाचून दाखवीत होता. तो मेसेज असा होता की बायको आपल्या नवर्याला सांगते. “ Honey, your kids and my kids are beating our kids.”