तुम्हाला ह्या लेखाचे हेडिंग वाचून खूप आश्चर्य होत असेल. पण हे खरे आहे. काय झाले ते मी सविस्तर सांगतो. सॉरी सविस्तर सांगितल्या शिवाय तुम्हाला ते समजणार नाही आणि सविस्तर सांगितल्याशिवाय मला ही रहावले जाणार नाही. तर झाल अस कि काल २५/१०/२०१० रोजी सायंकाळी ७.३० दरम्यान मी बाहेर घराच्या शोधात ( या बद्दल वेगळे लिहिणार आहे) पडलो होतो. तेथून पडल्यावर मी मोबाईल तपासाला तर त्यावर अनुजाताई( अनुक्षरे) आणि श्रीयुत सुरुश पेठे साहेब यांचा मिस कॉल दिसला. मला आश्चर्य झाला कि ह्या मेडम अचानक आपल्या देशात कशा उगवल्या. मी लगेच त्यांना कॉल केला. “नमस्कार मेडम ………….”
“तुम्ही जसे आहात जेथे आहात लगेच निघून या. रिक्षाने या आम्ही वाट बघत आहोत.”
“अहो मेडम, तुम्ही मला दम देत आहात!” मी उत्तरलो.
“ते काही नाही, तुम्ही लागलीच येथे या!”
“हो आलो.” मी म्हटले.
मी लगेच घरी गेलो. बाईकची चावी घेतली घरी सांगितले मी अनुजा, पेठे साहेब व अनिकेत यांना भेटण्यासाठी जात आहे.
सांगितलेल्या जागी पोहोचलो अनुजाने पाहता बरोबर”ते पहा कोष्टी साहेब आलेत.” म्हटले आणि “तुम्ही माझ्या साब्दाला मान देऊन लगेच धून आलात याबद्दल आनंद झाला अश्या म्हणाल्या.”
पेठे साहेब होतेच. पण अजून एक तरुण मुलगा बसला होता. त्याची ओळख करून घेतली तेव्हा कळले तो अनिकेत समुद्र नव्हता. तो होता आपला अनिकेत वैद्य.
त्यांच्याशी खूप गप्पा केल्या. थोड्या वेळाने अनुजा म्हणाली,” आपण काही तरी खायला मागवू या.”
मी पटकन म्हणालो, ” मी नाही खाणार कारण माझा आज उपवास आहे. सोमवार.”
पुनः अनुजाची दमबाजी सुरु झाली.”ते काही नाही तुम्हाला आता काही तरी खावे लागेलच.”
खूप आग्रह करवून घेणे बरोबर वाटत नाही. शेवटी मी शेंडविच चे एक पीस खाल्ले.
ज्यांचा आप आपसात काही संबंध नाही अशी हि ब्लॉगवाली मित्र मंडळी किती प्रेमळ असतात हे त्याचे उदाहरण.
म्हणूनच याला मी नाव ठेवले आहे “बिन भिंतीचे घर!”