कचरा- जरा विचार केला तर


आज कचरा हा प्रत्येक शहरासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोज  शेकडो टन कचरा शहरात तयार होत असतो. त्याची विल्ळेवात कशी आणि कोठे लावावी हि स्थानिक

 

कचरा

 

स्वराज्य संस्थांना डोके दुखी ठरत आहे. शरांचा दररोज विस्तार होत असल्याने कचऱ्याची शहराबाहेरील जागा शहरामध्ये येऊन जाते. पुनः नवीन जागा शोधावी लागते. पुनः शहर वाढते. असे चक्र सुरु आहे.

काही शहरांमध्ये कचऱ्यापासून खात निर्मिती केली जाते. काही ठिकाणी वीज निर्मिती करण्याचे प्रयोग होत असल्याचे समजते. पण यातून समाधानपूर्वक काही होऊ शकत नाही.

पण जर आपण थोडा विचार केला व सहकार्य केले तर खारीचा वाटा सहज उचलता येऊ शकतो. नाही नाही असे घाबरून जाऊ नका.  मी काही केर उचलण्याचे म्हणत नाही. माझे म्हणणे तर जरा ऐकून घ्या. मग विचार करा.

 

भाज्या

 

आज शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी टेरेस/ बाल्कनी किंवा गार्डन  असतेच. असेल तर त्यात झाडे लावली जातात.  आपण दररोज ज्या भाज्या आणतो त्यात पाले भाज्या असतात, फळभाज्या असतात. ह्या भाज्या कापल्यानंतर त्यातून जो केर कचरा निघतो तो चाकू ने बारीक कापून किंवा किसनी ने किसून ह्या झाडांना घातला तर झाडांना खात घातल्यासारखे होते. त्याने झाडांची वाढ चांगली होते. मी स्वतः हा प्रयोग केला आहे. येथे पुण्याला होत नाही. ह्याने अर्धा कचरा कमी होतो. समजा एका घरातून एका दिवसाला सर्वसाधारण पाने १ किलो कचरा निघत असेल तर त्यात भाजी

 

फळ

 

आणि फळे ह्यांचाच कचरा ६००-७०० ग्राम असू शकतो. हा आपण रोज फळ आणत असतो. त्यातील केळीची साल झाडांसाठी उत्तम खताचे काम करते. मी तर आंबयाची साल, पपई, टरबुज च्या सालीचा किस, चिकू ची साल, असे जवळ जवळ प्रत्येक फळाचे खत झाडांना घालत होतो.

तर मित्रांनो आपल्याकडे बाल्कनीमध्ये कुंड्या असतीलच, तर मी सुचविलेला प्रयोग कराच. खूप उपयोग होईल. झाडं चांगल्या प्रकारे वाढतील. त्यामुळे निसर्गाचे  रक्षण केल्यासारखे होईल.

6 thoughts on “कचरा- जरा विचार केला तर

 1. स्बच्छतेच्या नावाखाली आपण पुनर्वापर करण्यालायक असणाऱ्या अनेक वस्तू कचऱ्यात टाकून कचरा वाढवीत असतो.

  Like

 2. आम्ही चहा केल्यानंतर भांड्यात राहणारी पावडर झाडाच्या कुंडीत टाकतो. त्याने झाडाला चांगला बहर येतो. तुमचा उपाय देखील चांगला आहे, पण असा कचरा कुंड्यांमध्ये टाकल्याने दुर्गंधी नाही का येणार?? PLS अनुभव सांगावा …..

  Like

  • नाही येत दुर्गंधी. हा माझा अनुभव आहे. प्रयोग करून पहायला काय हरकत आहे प्रसिक. असो माझ्या मनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद!

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s