बुटका माणूस


आपल्या देशात पूर्वीच्या काळातील इतिहासाचे बरेच पुरावे किल्ल्यांच्या रुपात अस्तित्वात आहे. जसे मुरड जंजिरा, मुंबईतील सायन चा किल्ला, वसईतील किल्ला, मध्यप्रदेशातील अशीरगड किल्ला असे बरेच किल्ले आज हि अस्तित्वात आहेत. माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फ़ैज़पुर या गावचा आहे. १९६८ साली आम्ही सर्व, मोठे भाऊ नौकरी साठी नेपानगर या मध्यप्रदेशातील गावी गेल्यामुळे, राहायला गेलो. माझा जन्म १९५९ चा म्हणजे मी तेव्हा ९ वर्षाचा होतो.  नेपानगर या गावाजवळ बुऱ्हानपूर रस्त्यावर अशीरगड हा शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला आहे. त्या किल्ल्यावर आम्ही शाळेतील मित्र सायकल वर मला पूर्णतः आठवत नाही पण ८-९ मध्ये असू. माझ्या बरोबर माझे मित्र होते, प्रकाश चौधरी, कृष्णकांत किरंगे, रवींद्र पवार, विजय शाह आणखी हि असावेत पण नाव आठवत नाही आता.
किल्ल्यावर बर्याच आणि मोठ मोठ्या म्हणजे उंच असलेल्या पायऱ्या चढून जावे लागले होते. तेव्हा लहान असल्याने मजा येत होती म्हणून भराभर चढून ही गेलो. वर गेल्या वर त्या किल्ल्याचे स्वरूप व विस्तार बघून मी थक्क झालो. अबबबब किती उंच उंच भिंती, किल्ल्यावर विहिरी, मोठ मोठे दरवाजे. ते चित्र बघून माझे लहानसे मन थक्क झाले होते. विहिरीला  स्वच्छ व मधुर पाणी होते. विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते तरी ही  त्या किल्ल्यावरील विहिरीला पाणी होते. याचे आश्चर्य वाटत होते. त्या किल्ल्याचे जाड जाड व वजनदार दरवाजे.  इतकेच नाही तर त्यांच्या ज्या कड्या होत्या त्या ही  जाड होत्या. त्या दाराला आम्ही सर्व मित्रांनी हलवायचा प्रयत्न केला होता. पण नो सक्सेस. किल्ल्याचे मी प्रथमच दर्शन केले होते. त्यामुळे अचंभित होणे स्वाभाविकच होते. मला प्रश्न पडायचा की एव्हडी मोठीकडी, कुलूप अगडबंब दरवाजे कसे उघडले जात असतील. निश्चितच त्याकाळी मोठ मोठी ताकदवान आणि उंच मनसे तेव्हा असावीत. नाही तर किल्ल्याच्या भिंती कश्या तयार केल्या असतील. त्या ही डोंगरावर आणि एकावर एक दगड ठेऊन. हे काम तर आताच्या माशिनीने ही शक्य वाटत नाही. असे माझ्या बालमनाला तेव्हा वाटले होते.
तेव्हा पासून तो विषय माझ्या मनात होता. नंतर एकदा त्याबद्दल वडिलांकडे ह्या विषयावर चर्चा केली होती.  तेव्हा त्यांनी मला त्यांच्या लहानपणाची एक हकीकत सांगितली होती. त्यांचे वास्तव्य जळगाव जवळच्या पाळधी या गावी होते. खरे म्हणजे आम्ही मुळचे पाळधीकरच. वडिलांचा जन्म तेथीलच. त्यांनी सांगितले ते १०-११ वर्षाचे असतांना  जळगाव जवळील  एका किल्ल्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी तेथे एक राक्षसासारखा उंच आणि धीप्पाड मनुष्य बघितला होता. त्याने वडिलांना कडे वर घेतले होते. ते तर घाबरून रडत होते. सांगायचा तात्पर्य असा की पूर्वी खूप उंच अशी मनसे अस्तित्वात होती. पूर्वी म्हणजे खूप पूर्वी नव्हे तर आता १००-१५० वर्षापूर्वी. त्याचा हा दुसरा  पुरावा.

माझे इंदोर शहरात वास्तव्य असतांना मी देवी अहिल्या यांच्या राजवाड्याला भेट दिली होती. तेव्हा तेथे त्या काळातील हत्त्यार मी पाहिली होती.  त्यांचे वजन व उंची बघून आताचा मनुष्य ते हाताळू शकणार का हीच शंका मनात आली. कमीत कमी ६ फुटी भाले होते. तलवारी कमीत कमी ४ फुटी तरी असतील. मला वाटते मनुष्य आपल्या

चिलखत

उंचीपेक्षा जास्त लांबीचा भला हाताळू शकत नाही. यावरून असे वाटते की तेव्हा मानव खूप उंच असावा.  याशिओवाय तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखत घातली जात होती. ती लोखंडी होती. त्यांचे वजन ही खूप जास्त् असावे.  आताचा मानव ते परिधान करून लढू शकेल? अहो परिधान करून त्याचे वजन तरी पेलेल का हीच शंका वाटते.

मला वाटते हळू हळू मनुष्य लहान होत गेला असावा आणि पुढे ही त्याची उंची कमी होईल अशी शंका वाटते.

 

4 thoughts on “बुटका माणूस

  1. पिंगबॅक बुटका माणूस | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

    • ही कल्पना नव्हे हे सत्य आहे. पूर्वी मशीनी नव्हत्या तेव्हा मनुष्य किल्ला बनविण्यासाठी एकावर एक दगड ठेवण्यासाठी काय करत असेल? ह्याचा विचार करून मी स्वतः हे विश्लेषण केले आहे.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s